MOHIT DHOLE

Others

2  

MOHIT DHOLE

Others

कोरोना नंतरचे जग

कोरोना नंतरचे जग

7 mins
2.4K


२०१९ मध्ये कोरोना व्हायरसचा एक उपप्रकार चीनमधील “वूहान” शहरात आढळून आला . याला कोव्हिड-१९ असे नाव देण्यात आले . हळूहळू या रोगाचा प्रसार जगातील इतरही देशात होऊ लागला . जगात शंभरहून अधिक देशात या रोगाची लागण झाली असून बर्याच जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच हे संकट जागतिक स्तरावर ओढवलेल आहे . ज्यामध्ये अमेरिका, स्पेन, इटली,ब्रिटेन ,फ्रांस ,यासारख्या युरोपियन देशांमध्ये संपूर्ण आर्थिक सुबत्ता असूनही या देशांना या साथीच्या रोगाने नाकात दम आणला आहे . आपल्याकडील आर्थिक सुबत्तेच्या जोरावर आपण कोणत्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतो . या अति आत्मविश्वासात हे सर्व देश राहिल्यामूळे या सर्व देशांना आता अत्यंत बिकट परिस्थितिला सामोरे जावे लागत आहे . कोरोंनाची बाधा वाढत असल्याने देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे .कोरोंना या संसर्गजन्य रोगाने जगभरात दहशत माजवली आहे .कोरोना व्हायरस हा विषाणूचा एक गट आहे . या विषाणूचा प्रसार मानवामध्ये श्वसन संसर्गाने होतो . एकमेकांच्या संपर्कात आल्यानेही या विषाणूचा प्रसार होतो . तसा तर हा रोग म्हणजे सामान्यतः सर्दी, परंतु श्वसन मार्गात संक्रमण झाल्यास याचे परिणाम घातक ठरतात . या आजारावर निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही.

   

“लॉकडाऊन” चा शाब्दिक अर्थ ताळाबंदी ....ज्याप्रकारे एखाद्या फॅक्टरीला बंद केले जाते आणि तिथे कोणीही आत जाऊ शकत नाही . अगदी तसच देशावर ओढवलेल्या बिकट प्रसंगी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जातो. लॉकडाऊन नागरिकांच्या जीविताची काळजी घेण्यासाठीच घेतला जातो. आता तर संपूर्ण देशावर लॉकडाऊन घोषित केल्यामुळे लोकांना घरातून बाहेर पडण्याची मनाई आहे . केवळ धान्य , औषधी , दूध , भाज्या , किराणासामान , अशा गरजेच्या वस्तूंसाठीच बाहेर पडण्याची परवानगी आहे . शाळा –महाविद्यालये बंद , ऑफिसे , दुकाने बंद , हॉटेल, रेस्टोरंट आणि बार सुद्धा बंद ,पब्लिक ट्रान्सपोर्ट अर्थात बसेस बंद व रेल्वेच्या फेऱ्याही रद्द केल्या आहेत .म्हणजेच या काळात जमावबंदी असते , परंतु या लॉकडाऊन मूळे लोकांना घरात बसून मानसिक तणाव येऊ लागला आहे . म्हणजे ताळाबंदीत माणसाच मनच बंदिस्त झालय . घरात तीन ते चार आठवडे बंदिस्त राहावे लागतेय हे लोकांसाठी बरीच अस्वस्थता निर्माण करणारे ठरत आहे .महाराष्टात मार्च महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात लॉक डाऊन सुरु झाला . हा लॉक डाऊन पुढे वाढतच गेला . उन्हाळा सुरु झाला होता . बर्याच लोकांकडे लग्न कार्य होणार होते . पण या लॉक डाऊन मुळे हे कार्यक्रम पुढे करावे लागले . तसेच लग्न समारंभा साठी लागणाऱ्या व्यवसाया मधील लोकांचे खूप नुकसान झाले. फुलांचे पिक वाया गेले , हाल तर रिकामे राहिले , बंड मधील लोकांना घरीच राहावे लागले , टोपली सूप तसेच विविध साहित्य निर्माण करण्यार्या लघु उद्योग कडे पाठ फिरविल्या गेली . संसर्ग टाळन्यासाठी वेळोवेळी हात स्वच्छ साबणाने धुणे , सानितेझार चा वापर करणे , वारंवार चेहर्याला हात न लावणे , मास्क लावणे तसेच बोलनाता एक मीटर अंतर ठेवून बोलणे , इत्यादि नियम शासनामार्फत देण्यात येत होते. सर्व लोकांनी काळजी घेत नियमाचे काटेकोर पालन केले . घराबाहेर फिरू नका , घरीच राहा , सुरक्षित रहा असे संदेश मध्यमा द्वारे देण्यात आले होते . याचा च परिणाम रसे निर्मनुष्य झाले , होळीची कर किवा पोळ्याची कर मध्ये जशी रस्त्यावरती शांतता असते तसाच काहीसा आभास ह्यायला लागला . गर्दी करण्याचे ठिकाण जसे मोठे मोठे माल , सिनेमा गृह , कारखाने पूर्णतः बंद करण्यात आले होते . घरी बसायची सवय नसल्या कारणाने सुरुवातीला सर्व लोकांना जड गेले पण काही दिवसांनी त्या दिवस घालविण्याची सवय लोकांना लागली. कोरना संदर्भतील कोणतीही बातमी वाचायला उत्सुकता निर्माण होत असे . टी.व्ही. वरील बात्मायचा ओघ पाहण्याकरिता सर्व मंडळी सोबत बसायची . वेळ घालविण्या करिता बरेचशे खेळ बाहेर निघाले जसे चेस , कॅर्रोम बोर्ड , सापशिडी इत्यादी . लॉकडाऊन संपे पर्यंत रोज काहीतरी विशेष व्हायला हव या कारण निमित्त वेगवेळ्या पदार्थानि मेज सजत असे . महिला वर्गामध्ये फोटो काढून स्टेटस ठेवायची ओढ वाढली. कधी इडली , डोसा, पानिपुरी , चायनिज , आईसक्रीम वैगेरे वैगेरे . ‘ शेजार च्या शहानी नि आज मंचुरीअन चा बेत केला काय ,मी पण तेच करणार ’ काही प्रमाणात अश्या प्रकारची उपरोधिक स्पर्धा बघायला मिळाली . हॉटेल बंद असल्या कारणाने बाहेर जावून खाणे बंद झाले . या बाबतीत सगळ्याचा हिरमोड झाला .


कुटुंब एकत्र आले बाहेर गावी असणारे मुल मुली घरी परतले . घरी च राहावे लागत असल्या कारणाने एकमेकानबद्दल स्नेह वाढला . जेवण सोबत सोबत व्हायला लागले , खूप वेळ वेगवेगळ्या विषयावर चर्चा कुटुंबा मध्ये व्हायला लागली. चित्र वाहिनीवर रामायण , महाभारत पुन्हा सुरु झाल्याने काही काळ मागे गेल्या सारखे वाटायला लागले . नवी पिढी ला पूर्वी चे राम , कृष्ण असे असायचे ते त्यांना बघायला मिळाले . फार मोठा बदल म्हणजे हवा शुद्ध झाली. प्रदूषनाचा विपरीत परिणाम निसर्गावर झाला होता . शुद्ध हवेची प्रचीती आली . पाणी स्वच्छ झाले . शाळा बंद केल्या कारणाने तिमाही परीक्षा घेण्यात आली नाही . विद्यार्थाना पुढील वर्गात प्रवेशित करण्यात आले . आता शाळा चालू केव्हा होईल ह्या बद्दल कोणत्याही सूचना आल्या नाही . बर्याच इंग्लिश मिडीअंम शाळेनी ऑन लाईन शिक्षण चालू केले आहे , वर्कशीट च्या माध्यमातून विद्यार्थान चा अभ्यास करून घेणे . ऑन लाईन क्लास घेवून विद्यार्थान च्या समस्या चे निराकरण करणे . पर्यायी बदल शिक्षणात दिसून येवू लागले . मुलांनी सुद्धा ऑन लाईन शिक्षनाला उत्साहानी स्वताला गुंतवून घेतले . बर्याच वेळी ऑन लाईन कामे करण्यात येवू लागली . वर्क फ्रोम होम संकल्पना रुजू होऊ लागली . खाजगी आणि शासकीय कर्मचारी वर्क फ्रोम होम करू लागले . वीज बिल ऑन लाईन भरता वेऊ लागले .कवी संमेलन ऑनलाईन आयोजित केल्या गेले . ऑन लाईन चा सोपी मार्ग स्वीकारत लोकांनी बाहेर जाण्याचे टाळले . एस.टी. बस बंद असल्या कारणाने लहान मुलांना मामा च्या गावाला जायचे टाळावे लागले . करमणूक म्हणून सोशल मिडिया चा वापर बहुतेक प्रमाणात वाढला दिसून आला . वेगवेगळ्या प्रकारचे गंमतीदार व्हिडीओ बघायला मिळाले . बहुतेक लोकांनी मोर्निंग वाक साठी जीना हा पर्याय निवडला . शतपावली सुद्धा जिन्यावरती व्हायची आणि चार एक लोकांचा समुदाय सद्य परिस्थिती वर चर्चा करताना दिसून यायचा . मंदिर बंद असल्या कारणाने आजी आजोबा सारख्या वयोवृद्ध ना घरीच पूजा , कीर्तन , करावे लागले . शरीर आणि मन चार चौकटीत बंद करून घ्यावे लागले. आकाशात निर्भिस्त फिरणाऱ्या पक्ष्यांच्या घीरट्या बघून हेवा वाटायला लागला . मन मोकळ पनाने बोलणे आपेष्टांनचा सहवासात काहीवेळ राहणे वयोवृद्ध लोकांची आजची गरज पण मनाला जन्मठेप मिळावी असा काही लोकांची प्रतिक्रिया .

   

छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागला . हात चे खाणार्या लोकांची परवड झाली . लॉक डाऊन वाढतच गेल्या कारणाने अन्नधान्य संपून गेले . काम बंद तर पैशा येणार कसा .चिंता वाढली . शासनाने रेशन देनायचं जाहीर केल. पण फक्त रेशन नि कस होणार जेवण म्हटल तर सगळच लागत . तिखट , मीठ , तेल ची सोय करायला वेगळी मदत भेटली नाही . करिता स्थलांतरीत मजूर आपआपल्या गावी परत जायला निघाले . दुख म्हटलं तर चारही बाजूनी येत. रेल्वे बंद , बस बंद , ऑटो बंद , रिक्षा बंद . गरीब बिचार्या मजुरांनी पायी वाट धरली. शहरा पासून गाव हजार किलोमीटर लांब , पण नाईलाजस्त्व त्यांना घर गाठावे लागले. रोजगार बंद झाल्या मुळे आणि लॉक डाऊन मुळे कुठेही काम नसल्या कारणाने मजूर वर्ग खूप भरडल्या गेला. डोक्यावर ऊन चढलेल कडेवर लहान लेकरू आणि पायी पायी जाणारे मजूर . दिसणार चित्र इतक विदारक होत कि डोळ्यात अश्रू यायचे . मृत्यू नि दार थोटाविणे थांबवीले नाही , याच स्थलांतरीत मजूरा वर अपघाताची मालिकाच सुरु झाली . जाण्याऱ्या मजुरावर अपघात होऊन मृत् पावले . कोरोना तर जीव घेतच होता . रस्त्यावर मृत्यू चे प्रमाण सुद्धा वाढले होते . जबाबदारी चे काम करून बरेच पोलीस , डॉक्टर सुद्धा ह्यातून वाचले नाही . देवदूत बनून काम करणाऱ्या पोलीस , डॉक्टर , परी चारीका यांना सुद्धा कोरोना चा संसर्ग झाला . कोरोना झालेल्या व्यक्तीला तसेच त्याच्या संपकार्त आलेल्या सर्व लोकांना १४ दिवस बंद रहावे लागायचे . व्यक्तीला घरी तसेच नातेवाईक यांच्यशी कोणताही संबध ठेवता येत नव्हता. रुजू असणार्या शासकीय कर्मचारी त्या व्यक्तीचा सांभाळ करत असे. प्रशासना वर सर्व बाबीचा ताण वाढला . त्यांना रुग्णा ला पण सुरक्षा द्यावी लागली आणि नवीन कोणताही रुग्ण वाढू नये याची काळजी घ्यावी लागली . धर्याने आणि परिस्थिती चा सामना करीत या संकटाला सगळ्यांनी साथ दिली . काही रुग्ण बरे व्हायला लागले . ९० वर्षाचे आजोबा असो किंवा ५ वर्षा चा मुलगा असो , कोरोना संसर्गा तून बरे होऊ लागले . प्रोसाह्न म्हणून बरे झालेल्या रुग्णाचे स्वागत करण्यात येवू लागले. पोलीस , डॉक्टर ह्याचे सुद्धा कौतुक होऊ लागले . मदती करिता अनेक सामाजिक संस्था समोर आल्या . गरीब लोकांना मास्क देण्यात आले , दोन वेळच जेवण देण्यात आले . तरुणांना नी घरपोच डब्बे नेवून देण्याचे कार्य केले . जेवणाची तयारी करण्यासाठी सकाळ पासून हि तरूण मंडळी कामाला लागायची , कोणी कांदे चिरून देत , कोणी पोळ्या ला आकार देत तर कोणी डब्बे भरून देत . निमित्त कोरोना असो ना या संकटाला मात देण्यासाठी सर्व वयातील लोकांनी मदत केली . लॉक डाऊन हा चार ते पाच टप्प्यात लावण्यात आला . पहिला आणि दुसरा टप्पा हा कडक होता . सर्व बाबतीत निर्बंध. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याला काही नियम शिथील करण्यात आले . काम करायला मुभा देण्यात आली . विषमतेत दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली . विशिष्ट वेळेची नियमावली तयार करण्यात येवून उद्योग सुरु करण्यात आले . देशाची आर्थिक स्थिती सबल करन्यासाठी तसेच लोकांचे रखडलेल्या कामाना गती देण्यासाठी विविध बाबतीत मुभा देण्यात आली. दवाखाने , मेडिकल चौवीस तास सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली . लग्न कार्य होवू लागले, नवरा नवरी सामाजिक अंतर ठेवून आणि मास्क लावून कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करायला लागले . पोलीस , डॉक्टर तसेच या संकट समयी काम करणाऱ्या सर्व लोकानसाठी घंटी चा , थाळी चा नाद करण्याचे तसेच दिवे लावण्याचे आवाहन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी देशातील लोकांना केले . पाचव्या टप्पा येता येता देशाच्या माननीय पंतप्रधाना नि देशातील लोकांना आत्मनिर्भर तेचा संदेश देत , सर्व समुहातील लोकांना प्रोत्साहित केले. राष्ट्र प्रमुख , राज्य प्रमुखांनी वेळोवेळी देशातील नागरिकांना संबोदित करीत कोरोना विषयी माहिती देत राहिले. हि लढाई आपण जिंकू असे आत्मविश्वास रुपी बळ सर्व जनतेला मिळत राहील हीच सदिच्छा. 

    


Rate this content
Log in