MOHIT DHOLE

Others

2  

MOHIT DHOLE

Others

'अप्पे'

'अप्पे'

2 mins
577


मनोहर सकाळी लवकर उठून मैदानावर व्यायाम करायला गेला. व्यायाम करत होता , पाणी पीत होता. संपूर्ण व्यायाम झाल्यावर मनोहर घरी गेला. आंघोळ केली. ऑफिस ला जायला उशीर होत होता म्हणून घाई घाई तयारी करून तो टीफिन घेवून ऑफिसला गेला. सगळे मित्र गोळा झाले एकमेकांना गुड मोर्निंग गुड मोर्निंग चालू होत. रमेश कामाची आठवन करून देत होता. "मनोहर सर ती फाईल पूर्ण करून द्या ." मग आता कामात लक्ष द्यवे या हेतूने मी ती फाईल घेतली.

अतिशय महत्वाची फाईल होती. पूर्ण करत बसलो. बॉस चा फाईल पूर्ण करण्यावर डोळा होता. काम पूर्ण झाले . आता सी.ई.ओ. ची सही घ्ययची आहे . बॉस ने मलाच पाठविले. त्या सी.ई.ओ. ला फुरसत नव्हती मिळत. दुपारचे दोन वाजले. जेवनाची वेळ झाली.' माझे सगळे मित्र जेवायला बसले असेल. मला पण खूप भूक लागली होती. आज रेवती ( माझी पत्नी) म्हणत होती कि डब्यामध्ये स्पेशल देणार आहे म्हणून .काय दिल असेल तिनी. आता काय करावे कारण हि फाईल पण खुप महत्वाची झाली आहे. असाच गेलो तर माझा बॉस रागावेल. हे सही चे काम पूर्ण करावेच लागेल. पोट पाणी पिवून भरणे चालू होते. सी.ई.ओ. काही मला वेळ देत नव्हता. सी.ई.ओ. सुधा जेवायला गेला. पण मला जागेवरून काही हलता येत न्हवते . नट सम्राट डोळ्यासमोर दिसत होता ' जगावे कि मरावे हाच सवाल आहे'. मी म्हणालो "जेवावे कि निघून जावे हाच सवाल आहे, या भूकेच्या वेळेवर काम करावे आणि काम पूर्ण होण्याची वाट पहावे. विध्यात्या तू इतका निष्ठुर का झाला'. व्हात्स अप्स फेसबुक सगळे बघून झाले. मोबईल हातात फिरून फिरून कंटाळून गेला होता .

भुकेच्या नादात पोटातील कावळे काव काव करून कोमात गेले होते. अन्न हे पूर्णब्रह्म आज समजले. शेवटी काय सी.ई.ओ. आला मला आत बोलाविले विचारपूस केली , आणि स्मित करत सही केली. आज खुप मोठी लढाई जीकल्यासारख वाटल. फाईल बॉस ला न देता मी सरळ टिफिन घेवून स्टाफ रूम मध्ये गेलो . टिफिन उघडला त्यात बगतो तर काय फक्त वरण दिसत होत , पोळी किवा त्यासोबत विशिष्ट देण्यात येणारा पदार्थ दिसत नवता. रेवती ला फोन केला तर ती म्हणे ' टिफिन मध्ये सगळे दिले आहे मन्हे मुकाटायने खावून घ्या ' माझा फोन बंद केला. मला काही सुचत नवते . मी ऑफिसमधून सदानंद हॉटेल मध्ये गेलो , एक प्लेट अप्पे मागितले आणि मस्त ताव मारला. पोट काही भरले नवते पुन्हा एक प्लेट अप्पे संपविले. आता कुठे बरे वाटायला लागेले होत. काही वेळानी रेवती चा फोन आला , ती म्हणाली ' अहो काय हो मी तुम्हाला अप्पे तर दिलेच नाही ' तुहाला फोने करून सांगता पण येत नाही का ' मग मी म्हटले 'अ रे तर मी फोन कशाला केला होता. तेच सांगायचे होते मला'. रेवती म्हणाली बर बर ठीक आहे आता घरी या आणि ते तुमचे राहिलेले अप्पे संपून टाका.' महोहर निशब्द !


Rate this content
Log in