MOHIT DHOLE

Others

3  

MOHIT DHOLE

Others

चिऊताई

चिऊताई

1 min
377


एकदा एक चिऊताई दारात आली.

एक नवीन चित्र रेखायला

वेलीवरती फुल सजवायला

सात सुंदर रंग भरायला !


एकदा एक चिऊताई दारात आली.

नवे भाव गीत रचायला

शब्द सूरातले ओठावरती गायला

साज सुमधुर करायला !


एकदा एक चिऊताई दारात आली

नवे सुंदर दिसायला

खळी गालावरची सजवायला

सर्वाना मोहित करायला !


एकदा एक चिऊताई दारात आली.

स्वप्न नवे बघायला

पंख पसरुनी उंच उडायला

नवे प्रीती युग बघायला !


एकदा एक चिऊताई दारात आली.

नवीन संसार मांडायला

वैभव नित नवा फुलवायला

स्वर्ग सुखी करायला !


Rate this content
Log in