MOHIT DHOLE

Others

2.6  

MOHIT DHOLE

Others

आई

आई

3 mins
422


आई म्हणजे आधार, आई म्हणजे संस्कार, आई म्हणजे ईश्वर, आई म्हणजे चैतन्य. आईला जितक्या उपमा द्याव्या तितक्या कमीच. या विश्वात आई आपल्यला जन्म देउन आपला सांभाळ करते. मुलामध्ये दिसणारे सद्गुण आणि मुलामध्ये होणाऱ्या गुणाची वाढ हे आईचेच संस्कार असतात. आयुष्यातील यशामध्ये जे चैतन्य आईकडून मिळते ते अनुपम, अनमोल असते. आईची माया चैतन्यरुपी संस्कारतून मिळत असते. आईकडून मिळालेल्या अमूल्य क्षणाचे आपण सर्व ऋणी आहोत. कारण कधी एकांत क्षणात आईची आठवण काढून बघा.. नक्की आईच्या साडीचा पदर आठवेल कधीतरी त्या पदराने आईने आपला चेहरा पुसला असेल, आपल्यला गोंजारले असेल आणि आपला खूप खूप लाड केला असेल. आईची प्रत्येक आठवण म्हणजे एक सुंदर स्वप्न कधी न विसरता येण्यासारखं. लहानपणपासून ज्या चांगल्या गोष्टी आई कडून शिकविण्यात येतात त्या मुलांमध्ये कायम टिकून राहतात. आई मुलांना गोष्टी सांगतात. शाळेत जायची तयारी करून देतात. शाळेचा टिफिन, बुक्स, इत्यादीची तयारी हि आईच करून देते. मुलांच्या वाढीप्रमाणे आई यथोचित मार्गदर्शन करतात. मुलं यदाकदाचित समस्या सोडविण्यासाठी डगमगतात पण ती आईच असते जी खंबीरपणे मुलांच्या पाठीशी उभी असते. यशोदा मातेपासून तर जिजामातापर्यंत आणि सावित्रीबाई फुले पासून तर सिंधुताई सपकाळ पर्यंत. पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरु करून मुलांच्या शिक्षणात फार मोठी भर घातली आहे. अनाथाची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा जेवडा उल्लेख करावा तेवढा कमीच. आईच आईपण हे त्यांच्या कामातून सुद्धा दिसून येत. एक आई हि आईची भूमिका तर पार पाडतेच ती एक शिक्षिका असते, एक डॉक्टर असते, नर्स, इंजिनियर, मदतनीस, शेतात काम करणारी, बस कंडक्टर,इत्यादी पर्यंत काम करणाऱ्या असतात. एक आई हि राष्ट्रपती बनते तर एक आई हि लोकसभा स्पीकर. ती क्रिकेट पण खेळते, टेनिस पण खेळते, बॉक्सइंग करायला मागे पुढे न बघता देश्या करिता मेडल आणते. एका आई हि चार मुलांना जन्म देते त्याचं पालन पोषण करते तसेच मुलांना मोठ करून त्यांना त्याच्या पायावर उभ करते.घरात असताना एकाच वेळी दहा कामच नियोजन करून सगळ्याचा सांभाळ करते. मुलांन च अस्तीत्व निर्माण करणारी ही आईच असते.


आज देश प्रगत होत चाललेला आहे. आज मुल मुली मोठ मोठ्या पदावर काम करताना दिसतात. कोणतच असे क्षेत्र नसेल जिथे मुली दिसत नाही. आज मुलींचा जन्म झाला तर आनंदाने हत्तीवर बसून साखर वाटणारे सुद्धा आपल्यला दिसतात."मुली घराची शान." ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा होतो. महिलांना विविध पुरस्कारांनी

सन्मानित करण्यात येते. आई हि घरी काम करत असते. ती मुलां साठी, घरासाठी सतत झटत असते. तिचा पण सन्मान व्हावा हीच अपेक्षा. तिचा पण वाढदिवस खूप आनंदात साजरा व्हावा. तिला पण आकस्मित भेटवस्तू द्यावी. तिला पण फिरून आणावे, तिला पण चित्रपट, नाटिका दाखविण्यात आवे. चार भिंती च्या चौकटीत असेलल्या आईच्या प्रपंचाला आनंद द्यावा. आनंद हा जेवडा अधिक दुसऱ्याला दिला तर तोच आनंद आपल्याकडे परत येतो. आईने केलेले बटाटे वडे किवा एखाद्दी पदार्थ जेव्हा आपण कौतुकाने खातो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो हा गगनात मावेनासा असतो, आणि परत एक खायचा आग्रह.


स्वामी विवेकानंद एक प्रसंग सांगतात.एका मुलाचा आग्रह होता की त्याला मोठे झाल्यावर टांगेवाला ह्वायचं होते, त्याची आई म्हणाली बेटा जरूर हो पण असा हो कि तुझ खुप नाव झाल पाहिजे, श्री कृष्ण पण टांगेवाला होता पण ते काम करताना त्यांनी भगवतगीता रचली. कोणत्याही व्यवसायाला कमी न लेखता आईने मुलाचा आत्म विश्वास वाढविला. आई म्हणजेच गुरु, आयुष्यातील वेगवेगळ्या वळणावर मार्गदर्शन करणारी जी कोणी व्यक्ती असतात त्यात आईचा वाटा हा खूप मोठा असतो. "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" दिलेल्या ओळीवरून आईची महती कळूनच येते की आपण किती श्रीमंत आहो. "धाव माझी आई", "विठू माझी माऊली", "ज्ञानेश्वर माऊली",

इत्यादी स्तुती करताना आपणा आईची उपमा देतो कारण आई ह्या शब्दात जेवढा प्रेमळ पण आहे तो इतर शब्दात दिसून येत नाही. आई आपला लाड, हट्ट लगेच पुरविते तसाच भगवंताच्या स्वरुपात आई बघितल्याने भक्तांच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात असे त्या मागील काही अनुग्रह. "बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई" सुंदर असे हे भंजन विठूमाऊलीवरती लिहिले आहे. सुखद वाटते जेव्हा भजनात सुद्धा आई ह्या शब्दाचा उल्लेख होतो. चराचरात आईचे अस्तित्व आहे. आईचे आशीर्वादरुपी प्रेम असेच आपल्याला भेटत राहो हीच सदीच्छा !


Rate this content
Log in