गोडवा
गोडवा


गोडवा किती सुंदर शब्द आहे. जे पदार्थ गोड असतात , जसा शिरा , श्रीखंड , जिलेबी , रसगुल्ला , गुलाबजामून इत्यादी ह्यांच्या नावातच गोड हा शब्द ठासून भरला आहे . हे पदार्थ दिसले जरी किवा आठविले तरी तोंड रसाळ होवून येत. तुपातला मुंगा चा हलवा किती गोड असतो त्याचा एक घास जरी खाला तरी अंगात झिंगाट गाण वाजायला लागत . गोड पदार्थ खाणारे प्रेमी सुद्धा खुप पाहायला भेटतील . घरी नाही तर बाहेर जावून त्य विशिष्ट पदार्थचा आस्वाद घेणारे दिसतात . जेवण झाल्यवर काहीतरी स्वीट खाणारे किवा त्याची मागणी करणारे पाहायला मिळतात . हि एक परंपरा आहे कि काय असे बर्या पैकी निदर्शनात येते. आमचे आजोबा होते जे कि जेवणासोबत नेहमी काहीतरी गोड खायला मागायचे. गोड पदर्थाचे खूप मोठे भक्त .कोतुकाने रसग्रहण करायचे आणि त्या पदार्थाची तासभर चर्चा करायची . काही नाही तरी पाणी आणि साखर आणि त्यात भात मिसळून खायचे . आंब्याच्या रसाची दर वर्षी आवर्जून वाट पहायचे . तसेच सणाला पूरण पोळी विशेष करून त्यांना लागायची . सर्व पदार्थाचे मनसोक्त आस्वाद घ्यायचा आणि आयुष्य कसे मजेशीर जगायचे . वयाच्या ८०व्या वर्षी सुद्धा चेहरा ताजा आणि टवटवीत दिसे. मला गोड खायला जमत नाही, हि बिमारी आहे , ती बिमारी आहे. डॉक्टर नी मनाई केली आहे . मधुमेह आहे, अतिरेक होत असेल तर गोड खाणे पण नियत्रणात आणावे लागेल. मनाला समजावे लागेल . एखांदी नवकोट नारायण असेल तरी त्याला गोडव्या पासून दूर राहावे लागेल .
सांज वेळी शांत ठीकाणी सूर्यास्त होत असताना जेव्हा एक नजर आकाश कडे जाते तेव्हा ते विहंगम दृश पाहून किती सुंदर वाटत. पक्षी फिरताना , निळेशार आकाश , ह्व्याची ती परत परत येणरी झुळूक. मनाला किती गोड करून जाते. निसर्गात सुद्धा गोडवा जाणवतो . सुंदरते त सुद्धा गोडवा असतो . भाषे मध्ये सुद्धा गोडवा जाणवतो. मराठी भाषा साधी सोपी आणि बोलण्यास अप्रतिम . वेगवेळ्या प्रकारचे शब्द आणि त्याचे उच्चार हे भावना प्रधान होत असेल तर ते शब्द कानाला गोड वाटतात. 'अ ग ' किंवा 'अ हो ' शब्दाला सूर भेट त असेल तर हे शब्द सुद्धा ऐकण्यास गोड वाटतात . एखांदी सुमधुर मराठी गीत ऐकताना कानाला खूप रोमांचीक वाटतात. गायकाचा तो आवजच खूप गोड असणार.
प्रेरणा देणारे कीर्तन , कीर्तनकार जेव्हा बोलतो तो वेगवेळ्या उदाहरणा दाखल कीर्तन करीत असतो. दैनदिन जीवनातील प्रसंग ऐकताना ते कीर्तन सुद्धा आपल्याला गोड वाटत. खूप गोडवा असतो त्याच्या बोली मध्ये . वाक चातुर्य त्यालाच म्हणतात कदाचित .कोणत्याही विषयावर मुद्धेसूद मार्ग दर्शन करणे . विषयातील गाडे अभ्यासक असल्या शिवाय ते श्यक्य नाही. सतत ऐकावेसे वाटणे ह्य्लाच त्या भाषेतील गोडवा म्हणावा. कीर्तन ऐकायला बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तो गोडपणा असायला हवा. तो रसिक तसा स्वारस घेणारा असावा. वेगवेगळ्या विषयावर प्रवचन करणारे , भाषण देणारे , संभाषण करणारे बरेच असतात .पण संभाषण करताना जो गोडपणा श्रोत्यांन्या आपलेसे करतो तो खूप म्हत्वाचा.नाटक , चित्रपटातील शेवट आनंद देणारा असेल तर शेवट गोड झाला असे म्हणतात . शेवट गोड व्हायलाच हवा.
आज नात्यातील गोडवा शोधावा लागतो . पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती , दहा ते बारा सद्यस एकाच घरी असायचे . आजी आजोबा , काका काकू , आत्या सर्व एकत्र राहायचे , एकत्र जेवण करायचे . आजी आजोबा नातवाना गोष्टी सांगून करमणूक करीत असे . पाटावर खेळ सजत असे. सण आनंदाने साजरा होत असे . आजी आजोबा ना टीका लावून नमस्कार करण्याची परंपरा होती. काही ठीकाणी गौरी गणपती सणाला कुटुंब एकत्र येतात देवी देवता ची स्थापना करून आरती करून प्रेम भोजनाचा कार्यक्रम होतो . सर्व कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन काम करतात . या सणातील उत्साह सर्व घरातील मंडळीना एकमेकाबद्ल स्नेह भाव निर्माण करतो . प्रत्येकाचे प्रेम भेट त असतात . नात्यामध्ये गोडवा तयार होता , आदर होतो . दसरा सन साजरा करताना आपण एकमेकांना भेट तो , सोन देतो तेसेच '' सोन घ्या सोन्यासारखे रहा '' म्हणून आदर व्यक्त करतो. तेच प्रेम आपण तिळगुळ देताना ''तिळगुळ खा गोड गोड बोला '' ह्या सुंदर ओळी प्रेमाचा , आनंदाचा गोडवा निर्माण करतात . तिळगुळ मधील गोडवा कायम असाच सर्वाना मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !