The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Neha Khedkar

Others

1.3  

Neha Khedkar

Others

वाढदिवस माझ्या बाबांचा...!

वाढदिवस माझ्या बाबांचा...!

2 mins
1.3K


कधी कधी आपल्याला भावना बोलून व्यक्त करता येत नाही तेव्हा आज हे सगळं लिहण्याचा प्रपंच..! 


माणूस जगाच्या पाठीवर असतो तेव्हा त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन, कौतुकाचा वर्षाव सगळे अगदी आवर्जून करतात...पण आज मी ज्या व्यक्तीला शुभेच्छा देणार आहे जी ह्या जगात प्रत्तक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे माझ्या हृदयात नेहमीच असते...ज्यांची आठवण आली की सहजच डोळ्याची पापणी ओली होते...ज्यांच्याबद्दल मनात आभाळा येवढा आदर आहे... ज्यांच्याबद्दल माझ्या मनातलं माझं प्रेम व्यक्त करणार आहे ते म्हणजे... माझे बाबा..!


आई म्हंटल की सहजच शब्द सुटे होतात... पण बाबा म्हटलं की विचार करावा लागतो काय लिहावं म्हणून..! 

काळा सावळा रंग, बोलके डोळे , तरतरीत नाक , शरीरयष्टी उत्तमच असे तुम्ही होतात "बाबा". मला जेवढं माझ्या बाबांना ओळखता आला त्यात सगळ्यात महत्वाची बाबा म्हणजे त्यांचा " स्वभाव ".! 

हसतमुख, कोणाबद्दल कधी वाईट ना बोलायचे ना चिंतन करणारे, पट्कन कोणालाही आपलसं करुन घेणारे, मोठ्यांशी आदराने तर छोट्यांशी त्यांच्या सारखं होऊन बोलणारे... अगदी घरी येणारे प्रेसवाले काका असो किंव्वा त्यांच्या व्यवसायातील मोठा व्यक्ती...! वागणूक एकच..स्वतः बोलण्यापेक्षा लोकांना बोलतं करणं हे त्यांना चोख जमे...आपण आपल्या बद्दल सांगण्यापेक्षा लोकांकडून त्यांना जाणून घ्यायचं.. मी कशी आहे..? हे सांगण्यापेक्षा तुम्ही कसे आहात..? हे विचारले गेले पाहिजे ..असे ते सांगायचे.. 

अत्यंत समाजशील व्यक्तिमत्व ...कुठलेही कार्य असो ,ते आवर्जून उपस्थिती राहायचे...

आणि जगातल्या प्रत्येक नात्याला आदराने वागवणारे ..माझे बाबा!

तसे ते खवैयेच. कुठे बाहेर गेल्यावर वस्तू विकत घेण्यापेक्षा नवीन काय खायला मिळेल ह्याचा शोध ते नक्की घ्यायचे. दुधावरची साय, कांदे पोहे आणि आईस्क्रीम म्हणजे त्यांना अगदी जीव की प्राण...टीव्ही ,सिनेमा फार काही आवडायचा नाही त्यांना ,पण बॉबी देओलचे जाम चाहते... कुठलाही सिनेमा लागला तरी आवर्जून बघायचे...बाहेर फिरायला जाणे म्हणजे त्यांचा stress buster...रात्री कितीही थकून आले तरी त्या रात्रीच्या किर्रर्र अंधारात रोज बाहेर एक फेरफटका मारणे त्यांना फार आवडायचं...

देवाची भक्ती सुद्धा तेवढीच तल्लीन होऊन करायचे...नेहमी ते एकच सांगायचे आपण आपली चादर पाहून आपले पाय पसरायचे. उगाच लोकांना दाखविण्यापेक्षा आपल्या जवळ जे आहे त्यात समाधान मानायचे...आपल्या सोबत घडत असलेल्या प्रत्येक गोष्ट होण्यामागे आपली पाप पुण्याई लपली असते. तेव्हा खूप विचार न करता समोर बघून जगायचे...लग्नाच्या वेळी जवळ येऊन " तू खुश आहेस ना..?" विचारणारे तुम्हीच होते..बाबा मला निरोप देतांना ओठ दाबत आपले अश्रू लपवणारे तुम्हीच होते ..बाबा रोज फोन करुन " तू कशी आहेस? जावई छान ना ..?" म्हणतं फक्त दोन मिनिट बोलणारे तुम्हीच होते..बाबा " तुझ्याजवळ patience नाही , तो ठेवायला शिक . देव हळूहळू सगळं सुख देतो .." सांगत जगण्याचा मंत्र देणारे तुम्हीच होते...बाबा " कितीही मोठी झाली तरी आपले पाय जमिनीवर असू दे.." हे सांगणारे तुम्हीच होते.. बाबाजीवनात आपण असं कार्य करत राहायचं की आपण नसतांना सुद्धा लोकांनी आपल्याला आठवाव असं आपल्या लोकांवर जीवापाड प्रेम करत आपल्या आजूबाजूला सतत लोकांना जोडून ठेवणारे तुम्हीच होते..बाबा!😢😢

स्वतः आधी दुसऱ्यांच्या हिताचा विचार करणारे सुद्धा तुम्ही होते बाबा..!

माझ्या शब्दात तुम्हाला अजून काय वर्णू...

तुमची कमी सतत भासत असते मला जणू...!🙏🕯Rate this content
Log in