डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

4  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

उपहार कौटुंबिक सौख्याचा

उपहार कौटुंबिक सौख्याचा

2 mins
301


आज एक आघाडीची नायिका म्हणून नाट्य अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार कांचनला जाहीर झाला होता.

तिने केलेल्या अविरत अभिनय सेवेची ती पोच होती.


हा अत्युच्च पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला होता तिला.


सगळी कडून कौतुकाचा वर्षाव सुरू होता कांचन वर.


मित्र ,मैत्रिणी ,नातेवाईक ,सगळ्या ओळखीच्यांनी वेळात वेळ काढून आवर्जून फोन केला होता तिला.


अगदी भरून पवल्यासारखं वाटत होतं तिला..!


पलीकडून अतिशय जिवलग मैत्रीण कविता होती फोनवर .


" काय मग मॅडम चं तर काय विचारता? भारीच हो!

काय ग ,हा सर्वात आवडता उपहार असेल ना तुझा जीवनातला?" तिने विचारले


" हो ग, पुरस्कार खूप मोठा आहे पण जीवनातला सर्वात मोठा नक्कीच नाही ह! माझ्यासाठी माझ्या जीवनातील सर्वात मोठा उपहार आहे माझे कुटुंब.", कांचन


"अगं ते तर सगळ्यांनाच असते ना! मग तुला तुझे आवडते प्रेझेंट हे कुटुंब का वाटतेय ?" कविता



" बघ कवी,माणूस जसा जन्माला येतो त्याला आधी हातात घेतात ते डॉक्टर किंवा नर्स. त्यानंतर ते त्याला बाळाच्या आजीला किंवा घरच्या कोणाला तरी सोपवतात.


तसेच घरी मुलं वाढतात तेव्हा त्यांना आई बाबा सोबतच घरचे आजी आजोबा ,काका काकू आदी सगळ्यांचेच हात लागत असतात वाढीत. तेव्हाच ते सगळ्यांच्या सहकार्याने वाढते, बाळ से धरते. म्हणजेच हस्ते , परहस्ते प्रत्येकाचाच हातभार असतोच की ग त्याच्या वाढण्यात जडणघडणीत.आणि हे सगळं त्याला उपहारस्वररुप मिळालेलं असतं ग.


तसेच माझ्या बाबतीत माझे कुटुंब. माझे आई वडील ज्यांनी संस्कारांची शिदोरी देऊन मनाची उत्तम मशागत करून मला लहानाचे मोठे केले. त्यांच्या संस्कारांचे पाठबळ इतके मोठे आहे की मी आयुष्यात कोणत्याच प्रसंगी अडत नाही. माझे लग्न झाले अन् पतीच्या रुपात मला दुसरा उपहार मिळाला ज्याची भक्कम मोलाची साथ अन् अडचणीत दिलेला हात सदैव माझ्यासोबत असतो.

लग्न झाले म्हणजे नवरा अन् बायको ही दोनच नाती नसतात, तर सोबतच त्याचे कुटुंब तिचे अन् तिचे कुटुंब त्याचे होऊन जाते. तसेच माझ्या सासू सासर्यांचे मोलाचे अनुभवी मार्गदर्शन, त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास.माझ्या मागे माझ्या मुलांची घेतलेली काळजी या गोष्टी मला प्रोत्साहनच देत गेल्या.

अन् माझी ती गोंडस बछडी ज्यांच्या ओढीने माझे पाय घराकडे ओढले जायचे,वाटायचे सोडून द्यावे सगळे...

पण तिच चिल्ली पिल्ली जेव्हा म्हणायची ना " आई तू जा,इथली अजिबात काळजी करू नको " एक नवं बळ वमिळायचं. या माझ्या माणसांची साथ माझ्यासाठी मोठा दैवी उपहार आहे. आज माझे हे कुटुंब माझ्यासोबत आहे म्हणून हा पुरस्कार आहे ग.

या उपहाराची अशीच साथ असली तर असे अजून कितीतरी पुरस्कार मिळवू शकेन मी!


म्हणूनच ग म्हणूनच म्हणते मी ,"माझ्या जीवनातले सर्वात आवडते प्रेझेंट माझे कुटुंब आहे ,माझे कुटुंब आहे!"


Rate this content
Log in