उंदीर आणि साप
उंदीर आणि साप
एक साप होता. तो उंदरांमध्ये दहशत माजवत होता. त्यांनी एक-एक करत पुष्कळसे उंदीर गळप केले होते. रोजचा एक उंदीर कमी होत असे. त्या बिचाऱ्यांचे बिळातून बाहेर पडणे अति धोक्याचे झाले होते. एकदा योग्य वेळ साधून, सर्व उंदीर एका घराच्या छतावर जमलेत व तिथे विचार-विमर्श करू लागलेत. जर आपण याला प्रत्युत्तर म्हणून काही केले नाही तर आपली उंदीर जमातच उरणार नाही.
काहीतरी उपाय करायलाच पाहिजे; असा सूर सर्वानुमते साधक-बाधक चर्चेतून येऊ लागला. आपण आता न घाबरता एकजूट होऊन फाईट करू.दुष्ट सापाचा मुडदा पाडूच पाडू.एक उंदीर प्रश्न करतो. पण ते कसं? अरे माझ्या आप्तांनो अपल्या तोंडी, निसर्गाने दिलेले तीक्ष्ण दात आहेत. त्या दाताने आपण मोठ- मोठे लाकडी, प्लास्टिक वस्तू कुरडतोना! सर्व एक आवाजात म्हणतात होय. मग सर्व एकजूट होऊन त्याला चक्र व्ह्यूहात्मक वेडा घालून, एकसाथ कडाकड चावा घेऊया. काही उंदीर तोंडाकडून काही उंदीर शेपटी कडून तर काही मधोमध कडाडून चावा घेतील. सर्वांनुमाते एक विचार झाला. निश्चित रणमैदानही ठरविण्यात आले. व्यवस्थित नियोजन सुद्धा करण्यात आले.
दुसरा दिवस उजाडला. शिकार करण्यास मोठ्या ऐटीने साप कूच करू लागला. इकडे टोळी-टोळीने उंदीर समूह, दबा धरून बसली होतीच. साप जवळ येताच एक साथ उंदरांने हल्ला केला. सापाला काही सुचेना. तो तडफडू लागला. सर्व उंदरांने लचके तोडायला सुरुवात केली. व पाहता पाहता काही क्षणार्धातच साप मृत्युमुखी पडला. आनंद गगनात मावेनासा झाला. आनंदोत्सव जुलुस काढला. त्यानंतर उंदीर मोठ्या सुखाने राहू लागले.
तात्पर्य: एकीचे बळ मोठे.
