RMP RMP

Children Stories

4.8  

RMP RMP

Children Stories

त्यागमूर्ती मैत्री

त्यागमूर्ती मैत्री

1 min
230


राजू आणि श्याम दोघेही अत्यंत जिवाभावाचे मित्र. ह्यांची मैत्री अख्या पंचकृषिला माहिती होती. दोघेही एकाच शाळेत,एकाच वर्गात,एकाच बाकावर एकाच तुकडीत होते...पण श्याम राजुपेक्षा सगळ्याच गोष्टीत उजवा व बोलका असल्याने तो शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होता. श्याम नेहमीच राजुला सगळ्याच गोष्टी मध्ये मदत करायचा, अभ्यास,खेळ, चित्रकला अगदी सगळ्यात.. दोघांची दहावी झाली तरीही दोघे तितकेच घट्ट मित्र होते.

 श्यामला दहावीत 88% व राजुला 82% गुण मिळाले व दोघांनी एकाच कॉलेज मध्ये प्रवेश घेतला 11वी 12वी science साठी..पण झालं असं की श्यामला जास्त मार्क्स असल्याने त्याला *अ* तुकडीत प्रवेश मिळाला व राजू ला *ब* तुकडीत...आता मात्र पंचायत झाली..दोघेही कधीच वेगळे झाले नव्हते ते आता कस व्हायचं असा विचार करू लागले... श्याम धाडसी होता तो शिक्षकाकडे गेला आणि म्हणाला मला ब तुकडीत बसायचं आहे,माझा मित्र तिथं आहे...सरांनी आधी नकार दिला पण नंतर त्यांना ह्यांच्या मैत्रीसमोर झुकावे लागले व त्यांनी श्याम ला अनुमती दिली ब तुकडीत बसण्याची ..खरंच खरी मैत्री त्यागाचं प्रतीक असते नाही का!


Rate this content
Log in