Priya Bhambure

Others

3  

Priya Bhambure

Others

तुला थँक्यू म्हणायचे होतं

तुला थँक्यू म्हणायचे होतं

4 mins
277


       ती तेव्हा रोज बसने जायची. तो सुध्दां असायचा.पण, त्याचं कधी एकमेकांकडे लक्षचं गेलं नव्हतं. बहुधा. तो उंच पुरा,मध्यम बांधा,नाकी-डोळे सूंदर होता. कोणीही त्याच्याकडे पाहिलं तर पहिल्या भेटीत प्रेमात नक्की पाडू शकणारा असा तो. मिडीयाच्या ऑफिसमध्ये मोठ्या पदावर कामाला होता. ये-जा करायला बस हे साधन गाडीपेक्षा योग्य वाटत असल्याने त्याच्यानेंच तो फिरायचा. हि सुध्दां दिसायला सूंदर. लांब केस, बारीक अंगकाठी, उंचशी,आणि तिचे ब्राऊन कलरचे डोळे बघणाऱ्याला घायाळ करून टाकत असते. ती सुध्दां एक प्राव्हेट कंपनीमध्ये कामाला होती. एक दिवस नेहमी प्रमाणे दोघांचं ऑफिस सुटलं .आणि बसची वाट बघत बस स्टॉपवर उभे होते. पण,बराच  बवेल होऊन सुध्दां एकही बस येत नसल्याने ती जरा चिंतेत पडली. तिची चिंता बघून हा तिच्याजवळ येतो आणि म्हणतो,"आता समजलं मला कि, दुपारपासून बसचा संप झालाय. मला देखील स्टेशनकडेच्या रोडला जायचे आहे तर आपण शेअर रिक्षा करू या का? " तिने देखील मग समजल्यावर "हो" म्हणून ते रिक्षातून निघतात. ती त्यांची झालेली पहिली भेट. त्याने "हॅलो " म्हणूनमी "हर्ष  इथेच मीडियाच्या ऑफिसला मी कामाला आहे " तुम्ही ? त्यावर ती म्हणते ," मी पायल,इथेच एका कंपनीमध्ये जॉब करते."आश्चर्य म्हणजे त्याच्या बोलण्यातून त्यांना समजत कि, दोघांचं ऑफिस एकमेकांच्या फार जवळ आहे. मग काय रोजच ते दोघजण बसने सोबत जाऊ लागले. गाठ -भेटीचं रूपांतर एका छान मैत्रीत झालं होतं. त्यांची बऱ्यापैकी सवय तिला झाली होती. त्याला ना नेहमी काहींना काही नाव शिकण्याची सवय होती. तो तिला देखील म्हणायचा, "तू पण शिकत जा माझ्या फिल्ड मधलं म्हणजे माझ्या ऑफिस मध्ये तुला घेईल " त्यावर ती फक्त हसून ती वेळ टाळत असे.                  


असेच दिवसा मागून दिवस जात होते . सगळ्यांना हवाहवासा वाटणारा १४फेब्रु. चा दिवस जवळ येत होता. तिला एवढ्या दिवसाच्या सोबती नंतर त्याने आपल्याला प्रपोज करावं असं वाटत होत. पण,आपण स्वतःहून नाही बोलायचं हे देखील तिने ठरवलं होत . त्याच्या मनात असेल तर तो नककी करेल अशी तिला आशा होती. कारण ह्या कारणामुळे तिला मैत्री गमवायची नव्हती. मात्र, त्याने तिला त्या दिवशी मला आज बाहेरगावी जावं लागेल असं सांगितलं होत. असं तो तिला खोटं सांगतो. तिचा टीमउळे बऱ्यापैकी मूड  निघून जातो. पण, अचानक १:३० वा. तिचं ऑफिसमध्ये शिपाई तिला एक लाल गुलाबाचा बुके आणून देतो. त्यावर फकत "To My Lovely Sweet Heart " असं लिहिलेलं होत. बाकी कुणाकडून काय हे काहीच नव्हतं. म्हणून ती जरा गोधळून जाते. आणि त्यातच लगेच अनोळखी नंबर वरून फोन येतो . ती रिसिव्ह करते. पलीकडून तो बाकी काहीच न बोलता तिला प्रपोज करतो. ५मी. ती खूप स्तब्ध होऊन जाते. त्यावर तो तिला आग मी हर्ष बोलतोय.माझा नंबर ओळखशील म्हणून मित्राच्या फोनवरून बोलतोय. तिला काय बोलावं काहीच समजत नव्हतं . हे सगळं नाटक ह्याकरिता होत ह्या सुखद धक्याने ती भारावून गेली होती. आणि तिने मग होकार देऊन आपली देखील पसंदी दर्शवली. सगळं काही सुरळीत चाललं होत. घराच्या संमतीने लग्नासाठी होकार देखील मिळवून झाले होते. पण, अचानक मध्येच त्याने तिची गाठ भेट घेण्याचं बंद केलं. इतकंच काय तीच शहर देखील तो सोडून गेला.


अचानक झालेल्या ह्या बदलामुळे तिच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी येऊन गेली होती. तिला हे सगळं पचवायला २ वर्षे गेली. तरीदेखील तिने वास्तवाला सामोरे जायचे म्हणून उभारी धरली. आणि मगच सगळं विसरून जोमाने नवीन आयुष्य सुरु केले. मध्यंतरीच्या  काळात केलेल्या एका कोर्समुळे ती देखील एका वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये कामाला लागली.आणि अचानक तिच्याकडे एका पुण्यस्मरणाची बातमी देण्यासाठी एक माणूस आला.ती जेव्हा फोटो बघते .ती आवक होऊन जाते. कारण, तो फोटो दुसरा तिसरा कोणाचा नसून त्याचा (हर्ष)असतो. त्यावरून ती आलेल्या त्या माणसाकडे ह्याबद्दल चौकशी करते. तो म्हणतो,"हा माझा पुतण्या दोन वर्षा पूर्वी ब्रेन ट्युमर ने निधन पावला.खूप दवा पाणी केलं . पण, काही उपयोग नाही झाला" हे सगळं ऐकून तिला खूप धक्का बसतो. ज्याला आपण अपराधी मानलं. त्याने मात्र सगळं एकट्याने सहन केलं . बहुधा आपण जाणार . आणि हि सहन  नाही करू शकणार हे त्याला ठाऊक होत म्हणूनच न सांगता निघून गेला. स्वतःवर सगळा दोष घेऊन . त्याला वाटलं,काही महिन्यात ती  आपल्याला विसरून जाईल. तिला काहीच समजणार नाही. पण, नियतीच्या मनात काय आहे हे कोणाला समजत नाही. आणि शेवटी तिला आज समजलं. खूप रडते ती.


त्याच्या वाढदिवासाच्या दिवशी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जायचं आणि तिथल्या लोकांना आनंद द्यायचा हे काम नित्याने सहा वर्ष झाली ती करतीये. पण एकटी राहून कारण,त्याचदिवशी तिने लग्न न करण्याचा निर्णय घेऊन टाकला होता. पण, आजही त्याची आठवण आली कि मनातून म्हणते, "I am sorry तुला समजून घ्यायला मी कमी पडली. खूप राग राग केला तुझा ,मात्र मला हे काहीच माहित नव्हते रे !आजही तुझी ही जानु तुझी अजून वाट बघतीये हे मात्र नक्की. ये ना रे एकदा मला भेटण्यासाठी...


Rate this content
Log in