STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Others

3  

ANJALI Bhalshankar

Others

तु लिहित केलंस मला........

तु लिहित केलंस मला........

1 min
172

तु लिहित केलंस मला...... खिडकीतून पहाताना आलेल्या रोमँटीक मुुुडमुळे नाहीं ...रे .!बाबा माझ्या घराच्या गळक्या छतातून धो..धो..बरसताना,जेव्हा कोरडा, कोपरा शोधतांना, आईची धांदल उडायची ना! तेव्हा तीच्या पदराआड, घट्ट मिठी मारुन बिलगणयासाठी ,आम्हा भावंडची होणारी पळापळ, आंणि माझ्या स्वाभिमानी बापाची झुकलेली नजर अपराधीपनाने, बाप म्हणुन कमी पडत असल्याची भावना अजुनही तू आलास की काळजाला जाऊन भिडते ,मग मी लिहिते.............

आत्ताही मी मनसोक्त भिजते, आतुन बाहेरुन ओलीचिंब होते, गडबडीने छत्री विसरून काही काम आठवते, तूझ्या येण्याची चाहूल लागायचा अवकाश, मी बाहेर पडते मुद्दाम खोटं बोलून तसे वयानुसार खोट बोलायलाही छान जमते आतां माझें अश्रू तूझ्या पाण्याच्या थेंबात मिसळून मी लपविते. मग मी लिहिते........

आता घर प्रशस्त ईतकं कि बाहेर तू कधीं येउन जातोस हेही कळतं नाहीं, खिडकीतून येणारे तूझे तुषारही झेलता येत नाहीत. त्या साठी दुर फाटकाबाहेर, यावे लागते. लहानपणी छतातून तू धो... धो.. पाझरायचास, तेव्हा होणारी धांदल परत मिळेल का, रे !!ते सारे आठवून मन उदास होते मग मी लिहीते.......

सांग दुर गेलेल्या आईचा पदर बापाची ती बेबस, चोरटी नजर फाटक्या छताच्या धारांखाली ठेवायला भांडयांची शोधाशोध या सारया तून घेतलेला खूप खूप शिकुन मोठ, होण्याचा बोध हे सार तू दरवर्षी परत घेऊन येतोस .आईबाप सोडून , गळक छत सोडून ,जसा पुर्वी होतास तसाच येतोस, नजरही तीच लहानपणीची आईचा प्रेमळ स्पर्श शोधते.. बापाचा नजरेतला ओलावाही आठवते. मग मी लिहीते......... ...


Rate this content
Log in