तंत्रज्ञानाचे महत्त्व
तंत्रज्ञानाचे महत्त्व


तंत्रज्ञानाचे महत्व म्हणून काय विचारता राव माझे जीवनच सगळं बदलून टाकलयं ह्या तंत्रज्ञानाने. सुरुवातीला कळत नव्हतं. बरोबर हाताळता येत नव्हतं त्यावेळी सावळा गोंधळ झाला होता खरा पण आता ह्याची एवढी सवयं झाली की सगळी कामे घर बसल्या होऊ शकतात.
सिनेमाला जायचं तर रांगेत उभं राहून तिकीट काढायला लागायचे. पण आता हवा तो सिनेमा हव्या त्या ठिकाणचा मी घर बसल्या तिकट काढून जाऊ शकते. तेथे जाण्या करता गाडी सुध्दा घर बसल्या बोलवूं शकते.
माझ्या घरात बसून मी साऱ्या जगाच्या घडामोडी टी वी वर पाहू शकते. आॉन लाईन राहून मी सर्वाशी संवाद करू शकते. महत्तवाच्या मिटिंग आयोजित करू शकते. मुलाखती घेऊ शकते. जेवणाचा कंटाळा आला तर हवे ते जेवण घर बसल्या मागवून खाऊ शकते. मला खरेदी करायची ती ही मी घरी बसून माझ्या आवडीच्या वस्तुची खरेदी करू शकते. माझे बरेच हेलपाटे ह्या तंत्रज्ञानाच्या गोष्टीमुळे हुकले आणि मला आराम मिळू लागला.
कोठे फिरायला जायचे तर तेथे काय काय पहायचे ह्याचा आराखडा मी घर बसल्या मला हवी ती जागा व हॉटेलचे आरक्षण करू शकते.
निवृती नंतर आता करायचे काय हा प्रश्नच पडला नाही. फेस बुकच्या माध्यमातून आभासी जगाशी जोडले गेले. प्रत्यक्ष भेट नाही तरी जिवाभावाची माणसांशी ओळख झाली. काही नाती तर रक्ताच्या नात्यापेक्षा चांगली लाभली. जीवन सुखद व आनंदमयी झाले. तंत्रज्ञान हे आता जिवनाचे अविभाज्य घटक झालेले आहे. आता ते नसेल तर ह्याचा विचारच करायला नको कारण आता तंत्रज्ञाना शिवाय जगणचं अशक्य होईल.