ती तूच अन्नपूर्णा असते
ती तूच अन्नपूर्णा असते
नेहमी चेहऱ्यावर वाहता उत्साह,
आपल्या लोकांना आनंद ठेवण्यासाठी केलेली तिची धडपड,
सगळ्यांना काय हवं नको त्याची माहिती असलेली,
कोणताही प्रसंग असो किंवा इतर काही कार्य असो उत्तम रित्या पार पाडणे जणू तिचीच जबाबदारी असते अशी नीलिमा सगळ्यांचा मनात घर करून होती. पण तिला मात्र जरा सुद्धा कोणी विचारपूस करीत नसे...
एक दिवस अचानक घर आवरतांना तिचा पाय घसरला आणि ती पडली. तिच्या पायाला चांगलीच दुखापतीमुळे पट्टी बांधावी लागली. डॉक्टरांनी आठ दिवस आराम सांगितला. मग मात्र घरात सगळ्यांचीच तारांबळ उडाली. घराची अन्नपूर्णा झोपून राहणार म्हटल्यावर कोणाला तरी तिची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक होते. सून घरात आल्यापासून गेल्या काही वर्षात नर्मदाताईने सुद्धा स्वयंपाक घरातून आपला पाय काढताना सगळी जबाबदारी निलिमाकडे टाकून वरवरचे काम करायचा. घरात मुलांनासुद्धा त्याच सवयीमुळे सगळ्या गोष्टी हातात मागण्याची सवयच झाली होती. घरातील
अन्नपूर्णा कशी आहे, तिचं काही दुखतं का, तिला आपल्या मदतीची गरज आहे का ह्याकडे कोणी बघायला नसल्याने तिचान हिरमुसली असायची. कोणाला काही ससंगाय तर ते तुझंच काम म्हणून सगळे आपली जबाबदारी विसरून गेले होते...
आज लॉकडाउनच्या निमित्ताने सगळेच घरी असतांना तिच्या कामाचा, तिचा स्वयंपाक घरातील कामाचा अंदाज सगळ्यांना झाला. अन्नाला चव यावी म्हणून जसं मीठ गरजेचं असतं, तसंच जीवनाला चव येण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा असतो. मीठाविना जेवण अळणी, तर संघर्षाविना जीवन बेचव असतं. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांना बांधलेल्या जीवनतारेवरून प्रत्येकालाच प्रवास करावा लागतो; मात्र या प्रवासात कुणाची तार मध्येच तुटून पडते, तर कुणी तारेवरची कसरत करत करत दुसरे टोक गाठण्यापूर्वी आपले जीवनध्येय गाठतो. अशीच ही प्रत्येक घरातील अन्नपूर्णा असते, जी आपल्या घरातील सर्व प्रकारच्या गोष्टीत चव टिकवून ठेवण्यासाठी झटत असते तेव्हा तिचा आदर नेहमीच करावा...