STORYMIRROR

Priya Bhambure

Others

3  

Priya Bhambure

Others

ते आहेत खास...

ते आहेत खास...

6 mins
167

आज पहिल्यादांच त्याच्याविषयी मांडण्याचा प्रयत्न मनापासून करीत आहे. हि व्यक्ती माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची आहे. लहानपणापासून ते आत्तापर्यंत जीवनांतील जोडले गेलेले प्रत्येक तास, दिवस त्यांच्यांसोबत जास्त घालवल्यामुळे त्याचं महत्त्व हि त्यामुळे तेवढंच आहे.जर कोणी मला "तुला देव दिसला का?" हा प्रश्न विचारल्यास मी बोट त्याच्याकडेच दाखवून ' हो ' म्हणून सांगते.आपल्याकडे मुलांना वाढविण्यांत ,त्यांच्यावर संस्कार करण्यांत आईचे नाव साहाजिक पुढे येते. आई नऊ महिने बाळाला पोटांत सांभाळत असली तरीसुध्दां जन्मांच्या आधीपासून ते आयुष्यभर जी व्यक्ती आपल्याला डोक्यांत ठेवते. तिचा मात्र आपल्याला कुठेतरी विसर पडतो. आपल्याला वाढवितांना ते काय काय खस्ता खातात. ह्यांबद्दल जर देखील उल्लेख कुठेही आढळतं नाही. त्यांच्यामुळेच , आईशी एक वेगळी जवळकी निर्माण होऊन तिच्याबद्दल आपल्या मनांत एक वेगळीच भावना निर्माण झालेली असते. म्हणूनच, तिच्यासाठी काहीही आणि केव्हाही काहीपण करायला आपण नेहमीच तयार असतो. आणि मग लेख, कविता, वैगरें अश्या माध्यमांतून ते ऋण देखील आपण निश्चित व्यक्त करतो.


तिने आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाच्या जाणिवेतून आपली ही कृती घडतं असते. हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा ह्या सगळ्यांत एका व्यक्तीला आपण आपल्यासाठी घेतलेल्या त्या अनेक कष्टाच्या जाणिवेचा उल्लेख करायला कुठेतरी मागे पडतो.त्यांच्याशी असलेलं नातं त्यांच्या असलेल्या दराऱ्यामुळे कदाचित मागे रहात असेल असं मला वाटत. ते नातं असतं आपलं आपल्या वडिलांशी. माणसाला ठेच लागल्यावर पटकन ओठांवर "आईss गं "असा शब्द बाहेर पडतो. मात्र मोठी वादळे, आव्हानं पेलतांनाचा प्रसंग आल्यावर बाबाच आठवतो. म्हणजे,अश्यावेळेस एका खंबीर माणसांची आपल्याला साथ असणे आवश्यक असते. त्यामुळेंच, प्रत्येकांच्या आयुष्यात कोणत्याही रूपांत आपल्या वडिलांविषयीचे स्थानं हे महत्त्वाचे असतेच. कापसांच्या नाजुक धाग्यांनी विणुन नात्यांचे महावस्त्र तयार होते.ते तुटणार नाही, फाटणार नाही.याची दक्षता ही व्यक्ती घेत असते.कारण,ती ह्या कुंटुबातील प्रमुख असते. त्यांच्याच पंखाखांली व्यतित केलेले सर्व दिवस आयुष्यातील सर्वात सुंदर, सुरक्षित आणि स्मरणीय असतात.मोठे होऊन त्यांच्या वर्तुळातुन बाहेर पडायचं म्हटलं की, जगण्याची लढाई सुरु होते आणि तेव्हा जीवनाचा अर्थ उलगडायला लागतो. त्यांच्या असण्यांमुळेच नात्याला पूर्णत्व लाभते.


वडिलांचा स्वभाव प्रसंगी रागीट व कणखर असल्याने आई इतकी जवळीक नसेल. पण,त्यांच्या इतकी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला शोधुनही पर्याय सापडणार नाही. हे देखील तितकंच खरं! पण , असं म्हणतात कि, बाकी कोणाशी पण, जगातल्या प्रत्येक वडिलांचं आपल्या मुलीशी एक वेगळंच नातं असत. जरी ते बोलून दाखवत नसले तरी सुध्दा काही भावना ह्या केवळ जाणायच्या असतात. कदाचित,ती मोठी झाल्यावर आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याला सुपूर्त करायचा असतो. म्हणून एखाद्या वेळेला जगातील प्रत्येक वडील आपल्या मुलींबाबत फार हळवे असतात. आणि म्हणूनच,मुलीचं आणि वडिलांचं हे फार वेगळं असत. काय लिहू आणि किती लिहू...चार ओळींमध्ये बंदिस्त करण्यासारखं माझ्या बाबाचं व्यक्तिमत्व नाही आणि म्हणूनच आज पर्यंत बाबांवर एकही कविता नाही...        


माझ्यादेखील वडिलांचं माझ्या आयुष्यात एक वेगळं स्थानं आहे.त्यांचं नावं आहे.बाबा" या दोन अक्षरांच मुल्य मापन केले तर आपल्यासमोर कितीही संपत्ती तसेच कोणतीही मोठी व्यक्ती आली तरी त्यांची या दोन अक्षरांच्या शब्दांशी तुलना करताच येणार नाही.माझे पप्पा त्याचं नावं. श्री. प्रकाश निकुम. जन्म झाल्या झाल्या ज्यांनी मला पहिल्यांदा हातात घेतलं ते माझे बाबा..खोटं खोट रागावून परत जवळ घेणारे ते माझे बाबा ... आई आपल्या करीता सर्वस्व असते. परंतु आपल्या जीवनात वडिलांचं काय स्थान आहे ह्या बद्दल आपण जास्त विचार का नाही करत? वडिलांचा खंबीर आधार आहे म्हणूनच तर आपल घर उभं असत हे आपण किती सहजपणे विसरून जातो. वडील म्हणजे रागीट, कडक स्वभावाचे असेच चित्र बहुधा आपल्या मनासमोर उभे असते. त्याचप्रमाणे आपल्याकडे मुलं म्हटले की,आईचा हातभार त्यांना वाढवण्यात खुप अग्रगण्य मानला जातो.पण, त्यात एक गोष्ट विसरायला होते की, आई नऊ महिने आपल्या बाळाला पोटात सांभाळत असली तरी वडिल जन्मापासुन ते आयुष्यभर आपल्या डोक्यांत ठेवुन त्यांच्यासाठी झटत असतात. खस्ता खात असतात. ते आपल्याला मात्र कधीच दिसतं नाही.


त्यामुळेच कदाचित त्यांच आपल्यावर असणारं प्रेम आपल्या लक्षात येतं नसावं.आईशी असलेल्या जवळीक मुळे तिच्याबद्दल खुप काही वाटतं. पण, वडिंलावर लिहिण्याची वेळ आल्यावर मात्र खुप विचार पडतो.कुटुंबातील एक प्रमुख व्यक्ती म्हणुन त्यांच्यावर खुप जबाबदारी असते. त्यांच्या असण्यामुळे कुंटुबातील त्या नात्याला पुर्णत्व लाभते.त्यांच्या विषयी असलेल्या धाकामुळे कदाचित त्यांच्याशी बोलतांना आपण खुप विचार करुन बोलतो. पण, त्यांच्या चौकटीत आपण सुरक्षित असतो. ह्यांचा मात्र आपल्याला विसर पडतो.जेव्हा कधी माणसाला ठेच लागली की,आपण आईची आठवण काढतो. पण,मोठी वादळे पेलवतांना मात्र बाबा आठवतो.म्हणजे मोठ आव्हानं,कठीण प्रसंग आला की, एका खंबीर माणसांचीच आपल्याला आठवण येते. हे नक्की! लहानपणी आपण आजारी पडल्यावर दिवसभर जवळ बसणारी आई दिसते पण ऑफिस मधून ४ वेळा फोन करून तब्येत विचारणारे, 'जास्त बर नसेल तर डॉक्टर कडे घेऊन जा.' ' झोपला / झोपली का नीट त्रास होत नाही आहे ना ' म्हणून विचारणारे बाबा कधी आठवतच नाहीत. रात्री झोपेत आपल्याला थोडा जरी त्रास झाला तर पटकन उठून बघणारे आणि आईला सांगणारे कि ," बघ गं काय झालाय ते" असे बाबा . खाऊ देणारी आई दिसते पण तोच खाऊ कामावरून सुटल्यावर आठवणीने आणून आईकडे देणारे व सगळ्यांना सारखा दे म्हणून सांगणारे बाबा दिसतच नाहीत." 


माझ्या बाबाबद्दल बरेच असे प्रसंग आहेत,ज्यांच्यामुळे त्याचं आमच्या जीवनातील महत्त्व नेहमी वाढतंच गेलं.आंम्ही तिघं लहान असतांना आमची आई खुप आजारी पडली होती.ती सारखी झोपुनच असल्यामुळे आमच्या पप्पांनी त्या संपूर्ण कामांची जबाबदारी खुप मानाने उचलली. आमच्या शाळेच्या

तयारीपासुन ते डब्यापर्यंत सर्व सर्व आमचे पप्पा करायचे. त्याचंबरोबर आईकडे आणि दुसरीकडे ऑफिस हे देखील तितकंच नेटाने चालु होतं. ह्यां प्रसंगातुन त्यांची काळजी तर समजलीचं होती. पण,त्याबरोबर हि कामं करायला ना कुठली कुचराई दाखवली ना कमीपणा जाणवुन घेतला. ह्यांमुळे माझ्या भावाला घरांमध्ये काम करायची सवय लागली.तो आम्हांला रोजच्या कामांत कोणतीही हवी असलेली मदत तो आवडीने करतो.तशीच एक दुसरी आठवण म्हणजे एकदा बाबा बाहेरगावी गेले होते.आम्हांला वाटले की बाबा घरी नसतील म्हणजे किती मज्जा! काहीही करा, कसही वागा, आई काय जास्त रागावणार नाही. पण जस जशी संध्याकाळ होऊ लागली तशी बाबाची कमी जाणवू लागली. कधी वाटलंही नव्हती एवढी बाबाची उणीव जाणवली. सारखं असं वाटू लागलं कि आता बाबा येतील, आता बाबा येतील. रात्र झाली तरी शांत झोप येईना. बाबा घरी नसल्यामुळे एक विचित्र अशी भीती वाटू लागली. जेव्हा दोन दिवसानंतर बाबा घरी आले तेव्हा घर पुन्हा पूर्ववत झाले. बाबाच्या आधाराचे महत्व तेव्हा जाणवले.


मध्यतंरीच्या काळात माझ्या नाकाच हाड वाढल्यामुळे श्वास घ्यायला मला त्रास व्हायचा. त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सागितले. ऑपरेशन झाल्यानतर मला स्पेशल रूम मध्ये  शिफ्ट केल तेव्हा माझ्या नाकावर plaster केले असल्याने डोळे खूप सुजले होते. माझ्या वडिलांनी रात्रभर माझ्या उशाशी बसून बर्फाने सुजलेले डोळे शेकत बसले होते. नाक बंद असल्याने तोडाने श्वास घ्यावा लागत होता. त्यामुळे तोडं कोरडे पडून तहान लागत होती. आणि माझे बाबा रात्रभर चमच्याने तहान लागल्यावर पाणी पाजत होते . जो पर्यत मी दवाखान्यात होती तो पर्यत माझे बाबा माझ्याच जवळ बसून होते. बाबा एल.आय.सी मध्ये नोकरी करत असल्यामुळे त्यांच्या सारख्या बदल्या व्हायच्या. आणि बाबांनी कधीही आम्हांला एकटं न ठेवता त्यांच्यासोबत त्या गावी घेऊन गेले. असेच जेव्हा मुबंईला आमची बदली झाली तेव्हा नेमकं माझं कॉलेजच शेवटचं वर्षे होतं. आणि मुबंईला मध्येच बदली झाल्याने जरा तारांबळ उडाली. नेमक्या अंतिम परीक्षेच्या वेळी झाल्याने मला टेन्शन आलं. अभ्यास कसा करायचा? त्यांचा रिझल्ट परिणाम नको व्हायला म्हणून टेन्शन यायला लागला.


त्यावेळेस बाबांनी खूप आधार दिला. आणि मी कमी वेळ हातात असून सुध्दां उत्तमपणे पास झाली. त्यांच्याकडून मिळालेल्या आत्मविश्वासामुळे जीवनाला एक वेगळी गती मिळाली.परिस्थिती कोणतीपण असो, आपण कमजोर पडता कामा नये.असलेल्या त्या परिस्थितीचा सामना करून जिंकायचं.हि शिकवण त्यांच्याकडून तेव्हा शिकली. म्हणूनच,आज एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे पप्पा एक वाक्य नेहमी म्हणायचे कि, तू नेहमी आईवरच लिहिते. माझ्यावर कधी लिहिशील. तर आज लेखाच्या निमित्ताने त्यांना सांगावस वाटते, तुम्ही माझे बाबा म्हणजे माझी ताकद आहे. माझ्या सगळ्या निर्णयांना न बोलता मिळणारा पाठिंब्यामुळे तुम्ही माझे फ्रेन्ड,गाईड आणि फिलॉसॉफर आहेत. तुमचं स्थानं माझ्या आयुष्यात आभाळ म्हणून मानते. कारण,आभाळ अथांग असतं. क्षितीजापर्यंत असतं आणि त्याचं मोजमाप करता येत नाही.म्हणून!आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे नुकतंच माझ लग्न झालय.नेहमी कणखर असणा-या त्या माझ्या वडिलांना पहिल्यांदा हळव्या रुपात बघितलं तेव्हा त्यांच्या आमच्या बद्दल असणारी काळजी,प्रेम, सर्व सर्व समजलं.गालांवरून ओघळणा-या प्रत्येक अश्रुंनी ....


ह्या सगळ्या आठवणींनी मनाने माहेरी ओढ घेतली. घडलेल्या घटना डोळ्यांसमोर तरळून गेल्या , वाटलं खूप त्रास दिला आपण वडिलांना म्हणून विचार करत बसले. खूप हट्ट केले ,खूप लाड करून घेतले त्याच्याकडून. प्रसंगी थोडं रागावलेसुद्धा त्यांच्यावर. पण, कधीही एका शब्दाने त्यांनी काही म्हटले नाही. आज जेव्हा सासरी आले. तेव्हा हे आठवलं कि, वाटतं परत ती वेळ मागे जावी आणि मी लहान होऊन त्यांच्या कुशीत शिरावं अगदी घट्ट. कुठेही त्यांना सोडून जाऊ नये...


Rate this content
Log in