Author Sangieta Devkar

Children Stories

3.7  

Author Sangieta Devkar

Children Stories

सवय

सवय

3 mins
45


डॉकटरांनी साहिल ला चेक केले त्याच पोट खूप कडक जाणवत होते .

साहिल,तू रोजच्या रोज बाथरूम ला जातो का? पोट साफ होते का तुझे? डॉक्टरांनी विचारले.

रोज नाही पण एक दिवस जातो कधी नाही जात.

साहिल मग उठून बाहेर आला. रीना साहिल ची मम्मा त्याला पोट दुखते म्हणून डॉक्टर कडे घेऊन आली होती.

हे बघा मिसेस रीना,साहिल चे पोट नीट साफ होत नाही त्यामुळे त्याला पोट दुखी होते. मला सांगा तो जेवणात काय काय पदार्थ खातो?

डॉक्टर,मी आणि माझा नवरा दोघे ही नोकरी करतो. सकाळी खूप घाई असते म्हणून मी नाष्टयाला ब्रेड बटर,ऑमलेट , कधी कॉर्नफ्लेक्स दूध अस पटकन जे जमेल ते खायला देते. साहिल ला टिफिन ला भाजी चपाती नाही आवडत म्हणून तो मॅगी,कधी चिप्स,केक अस नेतो . कधी तरच भाजी चपाती नेतो . रात्री ही बळेबळे जेवतो.

म्हणजे साहिल ला घरच खाण खाणे पसंद नाही. मात्र जंक फूड तो जास्त खातो हो ना?

हो डॉक्टर,तो ऐकतच नाही मग उगाच उपाशी राहू नये म्हणून मग त्याला पिझ्झा बर्गर अस आणून देतो. फ्रुट कमी खातो केक आईस्क्रीम त्याला हवे असते.


मिसेस रीना,अहो तुम्ही एक आई असून ही मुलाला चुकीचे खाणे कसे काय देऊ शकता? अस जंक फूड खाऊन पुढे साहिल ला काय त्रास होईल माहीत हवं आहे का तुम्हाला? त्याच वजन अवाजवी प्रमाणात वाढेल,लहान वयात मूळव्याध सारखे आजार उदभवतील. पोटाचे विकार होतील. ऐकत नाही म्हणजे तुम्ही मुलाला घरच अन्न खायची सवयच नाही लावली का? डॉक्टर आता रीना वर चिडले होते. साहिल फक्त आठ वर्षाचा होता आणि त्याला जंक फूड जास्त आवडत होते.

डॉक्टर,खर तर यात माझीच जास्त चूक आहे मीच जॉब वरून कंटाळून यायची मग बाहेरून खाण मागवले जायचे किंवा हॉटेलमध्ये जायचे . विक डेज ला तर बाहेरच खाण होते. मीच घरी स्वयंपाक करायचा कंटाळा केला त्यामुळेच साहिल ला बाहेरच खाण्याची सवय लागली.

आता अजून तर साहिल तसा लहान च आहे तेव्हा त्याला घरच ताज आणि पौष्टिक अन्न खाऊ घाला. भाज्या,फळे पालेभाज्या त्याच्या पोटात गेल्याच पाहिजेत.

डॉक्टर पण तो अजिबात भाज्या खायला मागत नाही. रीना म्हणाली.

साहिल,चल तुला हॉस्पिटल दाखवतो डॉक्टर म्हणाले. मग साहिल त्यांच्या सोबत गेला. डॉक्टरांनी साहिल ला जिथे पेशंट ऍडमिट होते त्या वॉर्ड मध्ये आणले,साहिल बघत होता बरेच पेंशट तिथे बेडवर झोपून होते त्यात काही मुले ही होती. कोणाला सलाईन लावले होते तर कोणाला नर्स इंजेक्शन देत होती. लहान मूल घाबरून रडत होती. साहिल,ही लहान मूल बघितलीस का,? ते पण तुझ्या सारखे भाजी चपाती,वरण भात खात नवहते नुसते सारखे पिझ्झा बर्गर आणि मॅगी खात होते त्यामुळे त्यांचे पोट दुखू लागले.

डॉक्टर अंकल,मग मला पण तुम्ही इथे च ठेवणार का?

हो,तू जर पिझ्झा बर्गर खाणार असशील तर तुला ही असेच सलाईन लावून इंजेक्शन द्यावे लागेल.

साहिल हॉस्पिटल बघून घाबरला होता आणि इथे एकटे रहावे लागणार ही भीती होती त्याला.

डॉक्टर अंकल,जर मी पिझ्झा नाही खाल्ला तर तुम्ही मला इथे नाही ना ठेवणार?

अजिबात नाही ,साहिल तू जर घरी बनवलेले अन्न खाल्लेस तरच तुझी पोट दुखी थांबेल आणि इथे तुला नाही यावे लागणार.

साहिल ने मग जंक फूड नाही खाणार अस डॉक्टरांना प्रॉमिस केले कारण जंक फूड मूळे त्याचे पोट साफ होत नवहते. चॉकलेट आणि केक ही कमी करण्याचे डॉकटरांनी रीना ला सांगितले. रीना ला ही कळून चुकले की आपल्या कंटाळा करण्यामूळे साहिल चे आपणच नुकसान केले. आपणच मुलाला चांगल्या खाण्याच्या सवयी नाही लावल्या हे रीना ला समजून चुकले. आपली चूक सुधारण्याचे तिने ठरवले.


Rate this content
Log in