स्वप्न
स्वप्न
*स्वप्न मोठी बाळगा…*
मनुष्याच्या जीवनात स्वप्नांना खूप महत्त्व असते. स्वप्न म्हणजे केवळ रात्री डोळे मिटल्यावर दिसणारी चित्रे नव्हेत, तर जागेपणी मनात उभी राहणारी ध्येये, आकांक्षा आणि आशा होय.त्या पूर्ण करण्यासाठी मानव सतत प्रयत्नशील राहतो.
प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या स्वप्नापासूनच झालेली असते. म्हणूनच, “स्वप्न मोठी बाळगा” हा संदेश जीवनाला दिशा देणारा आहे.आणि निश्चित पंखात बळ देते हेच स्वप्न.
मोठी स्वप्ने बाळगणं म्हणजे फक्त कल्पनारम्य विचार करणं नव्हे, तर स्वतःवर विश्वास ठेवणं आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करणं होय. जे लोक मोठं विचार करतात, तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मोठी सपना मोठी ध्येय बाळगावी म्हणजे निश्चित आपल्याकडून कार्याची पूर्तता होते.
छोट्या चौकटीत अडकून राहिलं, तर प्रगतीची दारे बंद होतात. पण जेव्हा आपण मोठं स्वप्न पाहतो, तेव्हा आपली क्षमता, मेहनत आणि चिकाटी यांनाही नवं बळ मिळतं.
स्वप्न मोठी असली की अडचणीही मोठ्या येतात, अपयशही येतं. पण अपयश हे यशाची पहिली पायरी असते. प्रत्येक अपयशातून शिकत पुढे जाणं महत्त्वाचं आहे. जिद्द, धैर्य आणि सातत्य असेल, तर कोणतंही स्वप्न अशक्य राहत नाही. प्रयत्न वाळूचे खाणाऱ्या जवळ येतात तेही गळे हे म्हण आहे. याचा अर्थ असा की खूप कष्ट करा कष्टातून यश तुम्हाला निश्चितच मिळणार आहे.
आजच्या तरुणांनी विशेषतः मोठी स्वप्ने बाळगायला हवीत. कारण त्यांच्यात ऊर्जा आहे, कल्पकता आहे आणि बदल घडवण्याची ताकद आहे. समाज, देश आणि स्वतःचं आयुष्य अधिक सुंदर करण्यासाठी मोठ्या विचारांची गरज आहे. विचार मोठे करा, स्वप्न मोठी बघा तुम्हाला आता इंटरनेटच्या माध्यमातून अनेक सुविधा साध्य होतात. त्याचा वापर आपल्या जीवनात करून घ्या आणि गगनाला गवसणी घाला.
एक साधं उदाहरण देते पूर्वी नेटचा जमाना नव्हता कॉम्प्युटर नव्हते.त्यावेळेला आम्ही शिक्षक मोठ्या मोठ्या फुलस्केप वर सर्व यादी करून,मुलांचे रिझल्ट लावत होतो एक आकडा जरी चुकला तरी आम्हाला ते परत आम्हाला करावे लागायचं. अक्षरशः कधी कधी आम्हाला डोळ्यात तेल घालून काम केलं तरी सुद्धा कुठेतरी एखादा दशकाचा हातचा विसरायचा आणि अक्षरशः दहा, दहा वेळेला तेच काम करावं लागे. कंटाळा यायचा पण ते काम पूर्ण करावे लागायचं.आता तसं नाहीये या कॉम्प्युटरच्या युगामध्ये तुम्ही एक अंक लिहायचा विसरला तर पटकन तो बदलून तुमचा रिझल्ट तयार होतोय.इतकी छान सुविधा प्राप्त झालेली आहे तरी आता याचा निश्चितच उपयोग करून तरुणांनी मोठी स्वप्न बघावीत आणि आपली मोठी स्वप्न पूर्ण करावीत.
शेवटी, स्वप्न पाहणं थांबवू नका. कारण स्वप्नं आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात. आपल्या मनातलं स्वप्न जितकं मोठं, तितकंच आयुष्याचं आकाशही विशाल होतं. म्हणूनच, धाडसाने, आत्मविश्वासाने आणि मेहनतीने — स्वप्न मोठी बाळगा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा...
स्वप्न मोठी ठेवा
कष्ट खूप करा
मग मिळेल मेवा...
वसुधा 🖊️🌹
