सवड
सवड
माधुरी आणि महेश दोघेही खुप बिझी असायचे आपल्या नोकरीमध्ये. संसाराची जबाबदारी सांभाळताना, पालकत्व निभावताना दोघांनाही फार कमी वेळ मिळायचा. त्यांना दोन मुले होती. सानवी सातवीत होती तर रिहान चौथीमध्ये शिकत होता. हॅपी फॅमिली होती. माधुरीचे सासु सासरेही होते. त्यांचीही जबाबदारी होती. सगळ छान चालल होत. लाॅकडाऊन जाहीर झाल. सगळ व्यवहार ठप्प झाले. वाहतुक बंद झाली. कोरोना विषाणुने जगभर धुमाकुळ घातला होता. रूग्णसंख्या खुप वाढत होती. कोरोनाने लोक खुप मृत्युमुखी पडत होते. कोरोना रुग्णसंख्या वाढतच होती. त्यावर अजुन लस आलेली नव्हती. प्रशासनाने योग्य ती खबरदारी आणि काळजी घ्यायला सांगितली होती. माधुरीच ऑनलाईन काम सूरू झाल. ती आता ऑफीसला जाणार नव्हती म्हणुन मुलांना खुप आनंद झाला. पण तिचे मिस्टर महेश लाॅकडाउन लागला आणि ते दुसर्या राज्यात अडकले. त्यामुळे महेशचही माधुरीला खुप काळजी होती. पण महेश समजदार होता. त्याने माधुरीला सांगितल की , "त मुलांची आणि आईबाबांची काळजी घे... "मी इकडे छान आहे आणि अनलाॅक झाल्यावर येईल. त्याचही ऑफीसच काम चालू होतं. माधुरीला महेशच्या शब्दाने धीर मिळाला.
लाॅकडाऊन सुरू होता. मुलांना सुट्ट्या लागल्या होत्या. सासु सासरेही घरी बसुन कंटाळून जायचे. मग मुलांसोबत तेही नवीन गेम खेळायचे. कधी पत्ते तर कधी कॅरम खेळायचे. तेवढाच वेळ जाऊ लागला. आजी मुलांना छान छान करून घरीच खााऊ घालायच्या. बाहेर दुकान बंद होती. त्यामुळे मुलांना घरीच पाणीपुरी, भेळ करायचे सगळ आजीने त्यांना आवडीने करायच्या. मुलांना घरच जेवण आवडू लागल. रेस्टारंटला, हाॅटेल जाण बंदच झाल होत. आई त्यांना घरी छान मुव्हिज लावून द्यायची. मग ते दोन्ही मुले आणि सासु सासरे चौघेजण खुप मज्जा करायचे. सानवी तर आजीला आणि आईला मदत करायची. नवीन पदार्थ बनवायला शिकत होती. कुकींगचे धडे ती आजीकडून घेत होती. आजीला नातीला छान प्रेमाने सगळ सांगत असत. महेशला हे सगळ काॅलवर माधुरी सांगायची तर त्यालाही लेकीच कौतुक वाटायच. माधुरीला तिच ऑनलाईन वर्क सुरू असायच. तिची नेहमी पहिली सवड मिळत नाहि अशी तक्रार असायची... तेव्हा सासुबाई तिला म्हणाल्या... " माधुरी , सवय मिळत नसतेस ग या संसारात पडल्यावर पण आपण सवड मिळवू शकतो... " माधुरीला ही सासुबाईंच म्हणण पटल होत. आता तिला हा जो वेळ सवड मिळाली त्याचा ती छान उपभोग घ्यायची. मुलांसोबत खेळ खेळायची. तिची गाण्याची आवड जपत होती. सगळ करत होती.
ऑफिसच्या कामासोबत इतरही अनेक गोष्टी ती करायला शिकली. लाॅकडाऊनमुळे तीलाही खुप काही करता आल. बाई येत नव्हती तर सगळ काम ती स्वतः मॅनेज करायची. लवकर उठायची. पण याचा तिला कंटाळा येत नव्हता. ती आवडीने करायची. थोडक्यात लाॅकडाऊन आणि कोरोनामुळे सगळ्याच गोष्टी बदलल्या. तिचा वैयक्तीक छान बदल झाला. नेहमीच वेळ भेटत नाही म्हणून आईला आणि मैत्रीणींना फोनवर कमी बोलणारी माधुरी सर्वांची काळजीने विचारपूस करायची. फोनवर गप्पा मारायची. तिलाही बोलल्यावर छान वाटायच. ही एक चांगली गोष्ट घडली होती. मुलांनाही इतक ओरडाव लागत नव्हत. आई घरी काम करत, दमते म्हटल्यावर मुले शहाण्यासारखी वागू लागली. रोज बाहेर पडण्यापेक्षा ती एकदाच सगळ जीवनावश्यक वस्तू आणून ठेवायची. सगळ छान चालल होत. लाॅकडाऊनमुळे चांगलेही बदल झाले.
