ANJALI Bhalshankar

Others

3.5  

ANJALI Bhalshankar

Others

स्वातंत्र्याची परिभाषा काय?

स्वातंत्र्याची परिभाषा काय?

2 mins
84


खरंच स्वातंत्र्य आहे का ईथे?

  1. हा प्रश्न लहानपणापासून पडतोय.एकीकडे मदमस्त सत्ता नव्या कोरया गाडीतून, पांढर्याशुभर वस्रात राहून सारे काळे कर्म करतेय.दुसरीकडे कुण्य शेतकरयाची विधवा सावकाराच्या कर्जापायी फासावर लटकलेला पतीचा देह पाहुन रडतेय.
  2. हाच प्रश्न तेव्हही पडायचा ,शाळेत असताना ,जेव्हा आडनाव पुकारून शिष्यवृततीचे पैसे घ्यायला मोजक्यच आम्हा पाच,सहा,जणांना वर्गातून ऑफिसात बोलवायचे .पैसे मिळाल्याची खुशी,होती पंरतु का आली?डाॅकटर बाबासांहेबावर हि वेळ, हाडामासाने,एकच असूनही आणि रक्तही एकच लाल असूनही मानसाला जगणयासाठी, वेगळीच तरतूद करून ठेवण्याची वेळ.
  3. अडाणी आईबापाने शाळेत पाठविले.त्यांची तगमग म्हणा, किंवा माहिती नाही आम्हालाही आपलं वाटल शिकावं! पारटटाईम,जोब करून कॉलेजही गाठले आम्ही. देहबोली व बरी वागणूक पाहुन आमच्याच तोंडावर कित्यकदा आमच्या जातींचा व झोपडपट्टीत रहाणारयाचा उद्धार व्हायचा .वर आम्हालाच ऐकवायचं तूम्ही चांगल्या घरचे दिसताय लांब रहा त्या टवाळखोर लोकांपासून. ज्यातले बरेचसे सुसंस्कृत म्हणविणारया समाजातले आसायचे तेव्ह जाणवायचे चांगुलपणाची व्याख्या जातींच्या लेबलावरच का ?ठरतेय अजुनही मग बाबासाहेब तुमचे कार्य व्यर्थ का?मग प्रश्न पाडायचा मी सांगावे का ओरडून ईथे, आणि कामाच्य ठिकाणी कॉलेजच्या ग्रुप मध्ये ही अरे मीही त्याच जातीची आणि झोपडपटटीतच जन्मले,पण भीती वाटायची! या स्वतंत्र देशांत मला खुपच स्वतंत्र मिळेल.ऐकाकी स्वतंत्र!!!
  4. मी माणुस आहे.मला माणसांची गरज आहे .आता ऐकट जगण्याची सवय झालीय.मी हिंमतीने रहातेही.जात नाही लपवत.जगाला नाही घाबरत घाबरते  माझ्यातल्या आतल्या मनुष्याला .असे काही नको घडायला कि ,मी स्वतःच्याच नजरेतून ऊतरेन.घाबरते दोन शब्द कुणा पुरूषाशी बोलायलाही कारणं या देशांत ऐकटीने रहाणारया स्त्रीला संशयाच्या नजरांना ऊत्तरं देण्याच धैर्य अजुनही नाही होत. मग तेव्हाही प्रश्न पडतो देश स्वतंत्र म्हणजे नक्की कोण स्वतंत्र?
  5. तसं सारयानांच ऐका तराजुत नाही तोलता येणारं आहेत अजुनही काही इथं रस्त्यावर उतरून निव्वळ माणसाच्या न्यायासाठी झटणारे आणि घामाच्य मोबदलयातला वाटा दिलदार मनाने माणुसकीच्या नात्यने गरजवंताला देणारेही.पंरतु जेव्ह कोटयानुकोटी रुपयांचे दान निर्जव दगडांच्या मंदिरांना सोन्याचा मुलामा द्यायला जातं आणि माझ्या देशाचं भवितव्य कुठल्यातरी पडकया भिंतिंच्या अन गळकया छताच्या शाळेत वंदे मातरम् म्हणत तेव्ह नुसताच प्रश्नच नाहीं पडतं. वाटतं माणुस म्हणुन हे सारं नुसतं पहात जगण्याचा मलाही हक्क नाही.


Rate this content
Log in