arun gode

Others

3  

arun gode

Others

स्वादिष्ट खिचडी़

स्वादिष्ट खिचडी़

4 mins
288


     एक सरकारी मध्यम वर्गीय परिवारची ही कहाणी आहे. एका लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा परिवार विस्कळीत होवु नये म्हणुन केलेला त्याग असे मला वाटते. भारतीय संस्कृतिचे दोन महान काव्य रामायण व महाभारत. हे घडले की नाही हे कोणाला माहित नाही. त्याचे भूमितुन अजुन पर्यंत काही पुरावे पुरात्व विभागाच्या हाती लागले नाही. किवा कोण्या विख़्यात इतिहासकाराने या काव्यां मधील घटलेल्या घटानांचे पुरावे दिले नाही. परंतु या काव्यातिल घटनांचा उलेख सगळे कवी आणी लेखक आपल्या रचनेत, लेखानात व साहित्या मधे करतातच. या घटनांचा पगडा भारतीय संस्कृति वर इतका आहे कि साधारण भारतीयाला त्या ख-याचं वाटतात. व त्यांचा उलेख सगळेच जण आदर्श म्हणुन समाजात ठेवतात.


      महाभारतात द्रौपदीला पाच पति होते. आणी तीच्यामुळे महाभारत घडले असे अस्पष्ट पणे म्हणायला काही हरकत नाही. आज आमच्या देशात काही प्रांत आहे जीथे परिवारातील मोठी सुन किंवा मोठ्या भावाची पत्नी म्हणजे वहिणी ही सर्व भावांची पत्नी असते .त्याचा फायदा असा होतो कि संपत्तिचा बटवारा होत नाही. समाजात जर स्त्रीयांची संख्या कमी असली तर त्यामुळे होणारे समाजिक दुषपरिणाम टळतात. अशाने कुटुंबा मध्ये एकता राहते.


      कथेतील नायक याचा वडिल भावाचा मृत्यु होतो. स्त्रीला पहिला पति पासुन पण मुल-बाळ असतात. सामान्यता परिवारा मध्ये वहिणी व देर यांचे सबंध हे साळी आणी भाऊजी सारखे मधुर असतात. समाजात या सबंधा कडे कोणी वाईट नजरेने बघत नाही.कारण भविष्यात जर काही अनहोनी घटना घडल्या तर समोरची जवाबदारी घेणारे हेच संबध असतात. त्यामुळे कथेतील नायकाने कदाचित त्याग करून आपल्या वहिणीशी लग्न केले असावे. दोघांचा संसार चांगला म्हणजे एक आदर्श संसार होता. त्यांना पण दोन मुले आणी एक मुलगी होती. सर्व कुटुंब एकत्र राहत असे. आणी ते एक आनंदी कुटुंब होते. सेवानिवृति होण्या पूर्वीच सर्वांचे लग्न झाले होते. नौकरी असे पर्यंत ते सर्वजन सरकारी क्वार्टर मधे राहत होते. सेवा निवृति झाला वर स्वतःचे घर बांधले.घरातील सर्वच जन छोटा-मोठा व्यवसाय करित असत. त्यामुळे ते सर्वच उद्योगी दिसत होते. ऐवढ्या मोठ्या कुटुंबात कधी काही ओरडा-वारडत ऐकु येत नव्हती. सर्वजन आप-आपले काम बहुतेक करत असावी. चौकशी केल्या वर अन्ना साहेब म्हणाले कि मधली सुन कामा वर जाण्यापूर्वी स्वतःच्या परिवारा सोबतच आम्हच्या साठी पण जेवन बनवुन जाते.नंतर काकुला जेव्हा वाटले तोव्हा चाहा व ईच्छे नुसार नाश्ता वैगरे करते. तीच्या मुलीला शाळेत ने-आन करने व तीच्या कडे लक्ष्य देने ही आमची जवाबदारी आहे.


       काकांना चांगली पेन्शन मिळत असल्यामुळे सुनांनी व मुलांनी त्यांचाच पेनशन वर कर्ज घेवुन त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसा वर त्यांना कार भेट दिली होती. कारचा उपयोग नेहमी मुलचं करायचे. त्यामुळे काकांना कार चालवायला मिळत नव्हती. शेवटी काकांनी युक्ती लढवुन कारची चाबी प्राप्त केली होती. सुरुवातीला काकु कार मध्ये बसत नसे. त्यांना कांकाच्या ड्राविंग वर विश्वास नव्हता.मुले पण हे गृहित धरुन होते कि केव्हाही पुलिस स्टेशन मधुन कांकाच्या अपघाताची बातमी मिळू शकते. पण काही दिवसा नंतर काकु कांकाच्या पहिले नटुन-थटुन ,छान पैकी काळ्या रंगाचा गॉगल फिल्मी पध्दतीने लावुन कांकाच्या पहिले गाडित बसत असत.कदाचित गाडी चालवतांना काका,हिंदी गाणे काकुंचा श्रृगांर बघुन नक्कीच म्हणत असावे, गोरे-गोरे चेहरे पर काला-काला चष्मा. खुब लगती हो आज भी तुम मेरी करिश्मा. हे गाणं वैगरे म्हणत असावे.


       उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारी बहुतेक नातवंड वैगरे आले म्हणजे आबांचा रसमुळे दुपारचे जेवन जरा जडच होते. त्यामुळे संध्याकाळी बहुतेक काही जेवन घेण्याची इच्छा राहत नाही. म्हणुन त्या दिवशी सर्वांसाठी हलकी फोडणीची खिचडी बनावायची असे ठरले होते. ननद, वहिणीनी, एक-मेकाला जमेल तशी मदत करुण फोडणीची खिचडी कुकर मध्ये शिजवली. घरात चर्चा चालुच होती की अरे मला काही भूक नाही. पण खिचडीचा वास अर्थात सुगंध फार छान येत आहे. त्यामुळे जवळ- जवळ सर्वांनी थोडी- थोडी खिचडी जेवण्याचे मन बनवले होते. प्रथम घरातील पुरुषांनी स्वाद घेणे सुरु केले होते. सर्वजन स्वादिष्ट खिचडीची खूप तारिफ करत होते. सामान्यता बहुतेक मराठा परिवारामध्ये स्त्रिया या बहुतांशी शाकाहारी असतात. त्यांनी केलेल्या स्वादिष्ट खिचडीची पुरुष मंडळी द्वारा भरपुर मनापासुन केलेल्या प्रशंसेमुळे त्यांनी स्वाद घेण्याचे ठरविले.


त्यामुळे सासु, मुली आणी सुनेने खिचडीचा स्वाद चखायला सुरुवात केली. सर्वांचे एकमत झाले कि खिचडी खरच स्वादिष्ट झाली आहे. सासुने पण खिचडीची खूप प्रशंसा केली. त्यामुळे सुनेला वाटले कि थोडीशी खिचडी अजुन घ्या आई म्हणुन सुनानी आणी मुला-मुलीनी आग्रह केला. मुलांचा आग्रह पाहुंन काकु स्वतःच कुकरकडे प्लेट घेवुन गेल्या होत्या. त्यांनी पळीने कुकर मधुन उरलेली खिचडी घेतांना त्यांचा प्लेट मधे उलटा झोपलेला एक बेडूक आला. ते बघुन काकु एकदम संतापल्या. या सर्वांनी माझा धर्म बाटवला. मला त्या बेडकाची खिचडी खावू घातली. काकूंच तांडव बघुन घरातील वातावरण एकदम तणावपूर्ण झाले होते. काकु शुध्द होण्यासाठी स्नान करायला गेल्या होत्या. स्वयंपाक घराला गोमूत्राने शुध्द करण्याचा आदेश देवुन गेल्या होत्या. काका व मुले हे बघत होते. जशा काकु तिथुन् निघुन गेल्या तशेच काका जोर- जोराने हसायला लागेले. त्यांच्या सोबत मुले व नातवंड पण जोर- जोराने हासत होते. काका म्हणाले “तो ये बेडूक है आज के स्वादिष्ट खिचडी का राज“. आणी सर्वजन पोट दुखेपर्यंत सारखे त्या बेडूकाला पाहून जोर –जोराने हसत होते.


     काकांनी काकुंची नंतर समजुत घालतांना सांगितले की त्यांनी तो बेडूक मुदाम थोडी खिचडीत टाकला. तो बेडूक कुकरच्या छाकणाला खाली चिपकला होता. लक्ष नसल्यामुळे ते कुकरचे झाकन तसेच कुकरला लावण्यात आले होते व मग हा प्रकार घडला. पण घरातील आणी आजूबाजूचे सर्वजण काकूला

नेहमीच चिडवायचे. काकू जेवता का स्वादिष्ट खिचडी. हे ऐकून काकू न रागावता लाजेने लाल होत असत. कदाचित त्यांच्या स्वादिष्ट संसाराचे हेच गूढ असावे.


Rate this content
Log in