Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Dr.Smita Datar

Others


0.6  

Dr.Smita Datar

Others


सुरुवात

सुरुवात

2 mins 22.7K 2 mins 22.7K

                                       गणाधीश जो ईश सर्व गुणांचा

                                       मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |

                                       नमू शारदा मूळ चत्वार वाचा

                                       गमू पंथ आनंत या राघवाचा. ||

            नेहमी सुरुवातीला म्हणण्याचा हा श्लोक. सगळ्या गोष्टींची न कशी सुरुवात व्हावी लागते. सुरुवात करतात ईश्वराला साकड घालून, त्याला गोडाधोडाची लाच देऊन . गोड खाऊन शरीरात मधुर रसाची निर्मिती होते,शरीराला उर्जा मिळते म्हणून सुरुवात गोड खाऊन करत असावेत, कुछ मीठा हो जाये..असे हे सुरुवातीला महत्व.

           म्हणून म्हटलं जात.. सुरुवात चांगली करा . त्यासाठी नुसती सुरुवात चांगली करून भागत नाही, प्रवासाची आखणी पण व्यवस्थित असावी लागते.काही जणांना आरंभशूर म्हणतात. म्हणजे ते सुरुवात तर चांगली करतात पण पुढे टिकून राहत नाहीत. याचाच अर्थ , सुरुवात, मध्य, आणि शेवट सुद्धा चांगलाच असला पाहिजे. मग ते नाटक असो , चित्रपट असो , कथा असो की जीवनातला प्रोजेक्ट असो. मोठ्या प्रवासाची सुद्धा सुरुवात चांगली झाली की आपण बिनघोर असतो, मग मधली छोटी मोठी घाट वळण , बदलणारे खाच खळग्याचे रस्ते सहज पार करू शकतो.असं हे सुरूवातीच महत्व .

          आपल्या आयुष्याची सुरुवात मात्र रडण्याने होते , हा केवढा विरोधाभास ना? पण रडण्याने झालेली ही सुरवात एका माणसाला उभं करते, मोठ करते.आयुष्याच्या हा प्रवास काट्या कुट्यानी , अनपेक्षित चढ उतारांनी भरलेला आहे. आयुष्याच्या या वाटेवर सावलीला कधी कुणी येऊन बसतं तर कधी कुठल्यातरी वळणावर हात सोडून निघून जात. तरी रस्ता संपत नाही. या प्रवासाची सुरुवात चांगली व्हावी, असं वाटत, हे मात्र खर.

                               ऐसे ही सफर मे , मै अकेला था.

                                राह मिलती गयी और कारवा बनता गया..

मी एकट्यानेच सुरुवात केली, लोक आपोआप जोडले गेलें आणि त्याची मिरवणूक कधी बनली काही कळलंच नाही...

सुरुवात ही अशी असली पाहिजे. लोकोत्तर पुरुषांनी सुद्धा सुरुवात एकट्यानेच केली, पुढे समविचारी लोक त्यांना मिळाले आणि चळवळ उभी राहिली.म्हणून या सुरुवातीला हे एवढ महत्व.

          Well begun is half done. पण हाफच डन , पूर्ण डन करायला लागते ती हिम्मत , उर्जा , प्रचंड आत्मविश्वास आणि सातत्य. जे प्रत्येकात नसत म्हणूनच माणसांचे सामान्य आणि असामान्य असे भाग पडतात बहुधा. तर अशी ही सुरुवात दमदार झाली पाहिजे.

         म्हणूनच मग क्रिकेटच्या टोस ला महत्व येत. सिनेमा , नाटकाच्या मुहूर्ताला महत्व येत. ज्योतिष्यांचे उंबरे झिजवले जातात. गरगर फिरणाऱ्या ग्रहांना शांती च आवाहन केलं जात. साध्या दोन पैशाच्या लिंबू मिरचीला एक दिवस तरी भाव येतो.हे सर्व सुरुवात चांगली व्हावी म्हणून.

        विस्मरण हे वरदान घेऊनच माणूस जन्माला येतो, भोकाड पसरतो, ते विसरून जातो,  आणि नवीन हसण्या रडण्याची तयारी करत जीवनाला सामोरा जातो. ज्याला सुरुवात आहे, त्याचा शेवट त्याच क्षणी ठरलेला आहे, हे मात्र तो सोयीस्कर विसरतो.चांगल्या  शेवटाकडे जाण्याचे जीवतोड प्रयत्न करत राहतो.

      आणि याच रोलर कोस्टर राईड चा आनंद घेण्यासाठी आधी सुरुवात तर करा.

          


Rate this content
Log in