Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Tejashree Pawar

Others


3  

Tejashree Pawar

Others


सुमन (भाग २)

सुमन (भाग २)

3 mins 9.1K 3 mins 9.1K

सुमन आणि नीता....तश्या अगदी जवळच्या मैत्रिणी. लहानपणापासून सोबत. शाळेतही आणि आता कॉलेजातही. दोघी अगदी जिवलग मैत्रिणी. एकमेकांशिवाय एक दिवसही जात नसे त्यांचा !!

परंतु त्या दिवसापासून सुमनचे विश्वच बदलले. ती अगदीच आनंदी दिसू लागली. कॉलेज चे तास संपूच नये असे वाटू लागले. निराशेजारची जागा हिच्याच नावाने पक्की झाली. नीताचा सहवास हवाहवासा वाटू लागला. तिने एकदातरी चुकून स्पर्श करावा, असे वाटू लागले. राहुलची आता नीताशी चांगलीच मैत्री झाली होती. नीता बराच वेळ त्याच्यासोबत घालवत असे. अभ्यासही ते दोघे सोबतच असत. ही गोष्ट सुमनला आवडत नसे. हळूहळू तिला राहुलचा राग येऊ लागला. काही न काही कारणे काढून ती नीताला आपल्या सोबतच ठेऊ लागली. परंतु नीता राहुलर प्रेम करू लागली होती. त्यांचे एकमेकांसोबतचे राहणे हळूहळू वाढतच चालले होते.....

कॉलेज नंतरच्या वेळेतही दोघे भेटू लागले. रोज संध्याकाळी त्यांच्या ठरलेल्या जागेवर त्यांची भेट होत असे. एक दिवस सुमनला खरेदीसाठी बाहेर जायचे होते अन सोबत नितानेच यावे, अशी तिची इचछा होती. ती तडक नीताच्या घरी पोहोचली अन तिला सोबत येण्यासाठी विचारले. संध्याकाळची वेळ होती, नीताची राहुलला भेटण्याची तयारी चालू होती. सुमनने दोनदा विचारल्यावरही तिचे लक्षच नाही, हे पाहून सुमन चिडली. नीताला पुन्हा एकदा तिने विचारले अन " मला जमणार नाही. राहुल तिकडे वाट पाहत असेन ", असे ती बोलून गेली. हे वाक्य ऐकले अन सुमन संतापली. इतके दिवस राहुलविषयी मनात असलेला सगळा संताप बाहेर आला. आता मात्र निताचाही संयम सुटला अन सुमनचे इतक्या दिवसांचे बददलेले वागणे लक्षात घेऊन तिनेही आपल्या तोंडाचा पट्टा सुरु केला.

बराच वेळ भांडून झाल्यावर. " राहुल माझा मित्र आहे. मला आवडतो तो..." असे अगदी ओरडतच नीताने सांगितले. हे वाक्य ऐकले अन सुमन कोसळलीच. तिच्या डोळ्यात पाणी आले. अगदीच कावरीबावरी झाली ती. इतक्या दिवसांपासून आपल्या मनात दडलेले तिला सांगून मोकळे व्हावे असे क्षणभर वाटले. पण ती तेथेच थांबली. माघारी फिरली न आपल्या घरी निघून आली. घरात येऊन आपल्या खोलीच्या एका कोपऱ्यात शिरली अन रडू लागली. आपल्या भावनांना येथे मोलच नाही. आपण फार चुकीचे वागत आहोत. नीताने राहुलसोबतच असायला हवे.... पण ह्याचा विचार करूनही मला त्रास होतो. तिने फक्त आपलेच असावे असे वाटते. तिचा स्पर्श हवाहवासा वाटतो. म्हणजे मला निताचं आवडते !! पण हे असे का ?? वर्गातल्या सर्व मुलींना तर वर्गातली इतर मुले आवडतात. मला मात्र त्यातील कोणीच नाही. त्यातले कोणी आसपास आलेले मला चालतही नाही. त्यांच्याशी बोलण्याची विशेष इचछा होत नाही. असे का ?? आपल्या सर्व मैत्रिणींना हे समजले तर.... नीताला हे कळले तर ? असे अनेक विचार डोक्यात येऊ लागले ताटाशी सुमन अधिकच रडू लागली. तिचा आवाज ऐकून आई धावतच तिच्या खोलीत पोहोचली.

आईने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. काय झाले खूपदा विचारले. पण ती काही केल्या सांगेना. शेवटी आईने तिला अलगद जवळ घेतले. डोक्यावरून हात फिरवला अन तिची समजूत काढत शांत केले. थोडा वेळ असाच गेला आणि मग सुमन बोलू लागली. आपल्या मनातील सर्वकाही तिने आईजवळ बोलून टाकले. ते ऐकून आईला धक्काच बसला. पण सुमसमोर ती ते दाखवू शकत नव्हती . तिची अवस्था पाहून आई सावरली. ही परिस्थिती भक्कमपणे हाताळण्याचा निर्णय आईने घेतला. प्रथम तिने सुमनला शांत केले. तिच्या मनातील सर्व भीती घालवण्याचा प्रयत्न केला. यात काहीही अनैसर्गिक नसल्याचे तिला सांगितले. तिला सर्वकाही व्यस्थित समजावले. आहे ते सत्य स्वीकारून त्यासोबत आनंदाने राहायचे , हे तिला पटवून दिले. सुमनला आता अधिकाधिक खंबीर बनवण्याचा निर्धार तिने केला.

आईने सुमनला सावरले खरे. पण हे सर्व तिच्याही मनातून गेले नव्हते. समाज , नातेवाईक, सुमनचे भावी आयुष्य या व अश्या अनेक चिंतांनी तिला ग्रासले. अनेक शंकांचे काहूर माजले. पण ही वेळ त्याची नव्हती. आईने एकदा सुमनकडे पहिले अन तिला ह्या सर्व गोष्टी हाताळण्याची शक्ती मिळाली. याच वेळी आईने एक निर्धार केला. येईल त्या सर्व गोष्टीचा सामना करून एक स्वावलंबी, खंबीर सुमन घडवण्याचा अन पदोपदी तिची साथ देण्याचा !!!!


Rate this content
Log in