Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Tejashree Pawar

Others


1.3  

Tejashree Pawar

Others


सुमन (भाग १ )

सुमन (भाग १ )

2 mins 15.7K 2 mins 15.7K

अकरावीचे वर्ष...नुकतीच दहावीच्या काचेतून सुटलेली मुले. आता हे वर्ष म्हणजे थोडेसे निवांत असणार होते. परत पुढच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेचे भूत मानगुटी बसणार होते. त्यात कॉलेज जीवनाचे अपहीलेच वर्ष. म्हणजे सगळे अगदीच जुळून आल्यासारखे होते. एकदम स्वछंदी स्वैर असे. अभ्यासाच्या नादात राहून गेलेल्या भरपूर काही गोष्टी पूर्ण करण्याची उत्तम संधी. जुने हेवेदावे, जुनी प्रेमप्रकरणे, त्याहूनही पुढच्या काही गोष्टी असतात, त्यांची उत्सुकता आणि असे बरेच काही .....

दुपारची वेळ होती. पहिले दोन तास कसेबसे उरकले होते. ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होते त्या मधल्या सुट्टीची वेळ झाली. कोणाला काल मिळालेल्या पत्राचे उत्तर कळवायचे होते, कोणाला आपल्या 'ती 'च्या सोबत पलीकडच्या बागेत जायचे होते, कोणाची आज कॅन्टीन मध्ये पहिली भेट होणार होती .....

आई ह्या सगळ्यात ज्यांचा मेळ कुठेच बसत नव्हता अश्यातले बरेच महान लोक गणिताच्या तासाला काय झालं ?? यावर चर्चासत्र चालवत होते आणि उरलेले, आपलेही चांगले दिवस येतील ह्या आशेवर मित्र मैत्रिणींसोबत सध्याचा वेळ 'घालवत' होते.

सगळ्याजणी जेवायला बसल्या. थोड्याच वेळात मीनलने आशाला कोणावरून तरी चिडवले. मग गप्पा रंगल्या आणि 'आपल्या स्वप्नातला साथीदार' या नावाखाली पलीकडच्या रांगेत तिसरा, खिडकीजवळच्या बाकावरचा, जो बाईंची रोज बोलणी खातो तो, अशी नानाविध विशेषणे देत सर्वांनीच आपापल्या 'त्या ' विषयी भरभरून सांगितले. असे करत करत सर्वांची नजर सुमनकडे गेली. इतका वेळ ती फक्त बाकीच्यांचीच वर्णने ऐकण्यात गुंग होती. सर्वजण तिच्याकडे वळले तेव्हा मात्र तिच्याकडे बोलायला काहीच नव्हते. अजून कोणी आवडलाच नाही, मला नाही अशा गोष्टींना वेळ,असे बरेच काही सांगून तिने विषय टाळला. मधली सुट्टीही संपली आणि तास पुन्हा सुरु झाले; पण सुमनच्या डोक्यात मात्र ही गोष्ट राहून गेली. खरंच आपल्याला अजून कोणीच मुलगा आवडला नाही का ? तशी बरी दिसतात सगळीच. अभ्यासातही जेमतेम आहेतच. त्या दिवशी तर राहुल स्वतःहून बोलत होता, पण काही बोलायची इचछा झालीच नाही!! आई बोलते, "अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, बाकी गोष्टींपासून लांब राहायचं. " हं.... बरोबर. तेच करतेय मी. इतक्या सगळ्या विचारांत तासही संपून गेला. उत्तर भेटल्यामुळे हा विषयही इथेच थांबून गेला.

असेच एक दिवस कॉलेजची वेळ झाली अन नीता सर्वांना पेढे देतच आत आली. काय तर म्हणे मॅडमला नवीन गाडी घेतली वडिलांनी. ती अगदीच खुश होती. सर्वाना सांगत सांगत सुमनसमोर आली आणि तिला मिठीच मारली. सुमन स्तब्धच झाली !!! तिला काहीच सुचेना. सर्वकाही सुन्न झाल्यागत तिला भासले. चेहऱ्यावर नकळत हसू आले अन कसलेतरी फार समाधान वाटल्यागत भासले. नीता काय बोलत होती याकडे तिचे लक्षच नव्हते. हातात पेढा घेतला अन अशीच आपल्या जागेवर जाऊन बसली. दिवसभर तिच्या डोळ्यापुढून 'तो ' क्षण काही केल्या जाईना. कॉलेज सुटले आणि नीताने मारलेली मिठी, त्यावेळी अचानक शहारले अंग, झालेला आनंद, गडबडलेले मन, काय होते हे सगळे , ह्या सर्व गोंधळात सुमन घराकडे जायला निघाली....


Rate this content
Log in