SWATI WAKTE

Others

2.5  

SWATI WAKTE

Others

स्त्री शिक्षण

स्त्री शिक्षण

2 mins
463


स्त्री शिकली की पूर्ण घर शिकते असे म्हणतात आणि ते खरे आहे. म्हणून देश शंभर टक्के शिक्षित झाला पाहिजे असे वाटत असेल तर देशातील प्रत्येक मुलगी कशी शिकेल ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. देशाची प्रगती कुणीही रोकु नाही शकेल. 


स्त्री शिक्षणासाठी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी लढा दिला. ज्योतिबा फुलेंनी लोकांचा विरोध पत्करून पहिले आपल्या पत्नीला शिक्षित केले आणि नंतर तिला शिक्षिका बनवून दोघांनी मिळून दगड, शेणाचा मारा सहन करून कुणालाही न जुमानता आपला लढा सुरु ठेवला आणि स्त्रीशिक्षणाचे काम सुरु ठेवले अश्या ह्या अवलियाचे उपकार आपण कधीही विसरले नाही पाहिजे त्यांच्या ह्या कार्याला सावित्रीबाईंनी ही खांद्याला खांदा देऊन लढा दिला अश्या ह्या तिच्या कर्तृत्वालाही सलाम. 


दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर डॉ आनंदी गोपाळ जोशी ह्यांचे आहे. गोपाळ जोशी ह्यांनी पहिली पत्नी गेल्यावर आनंदी शी विवाह ह्याच अटीवर केला की लग्नानंतर शिकण्याची तयारी असेल तरच विवाह करतो. आनंदीबाईंच्या घरच्यांनी घरातील परिस्तिथी मुळे त्यांची ही अट मान्य केली. त्यांना वाटले की एकदा लग्न झाल्यावर आपोआपच त्यांचे हे खूळ जाईल पण असे झाले नाही कोणतीही अपेक्षा न ठेवता गोपाळरावांनी आनंदी बाईला शिकवायला सुरवात केली. आणि वेळप्रसंगी अभ्यास नाही केला तर कठोर शिक्षाही दिली. त्यांचेअसे म्हणणे होते की स्त्रिया कधी कधी पुरुषांपेक्षाही हुशार असतात पण घरात त्यांना पुढे जाण्याची संधीच दिली जात नाही त्यांना दाबून ठेवल्या जाते. म्हणून त्यांनी पत्नीला शिकवण्याचे ठरविले. जेव्हा त्यांनी शिकवायला सुरवात केली तेव्हा का शिकवायचे कसे शिकवायचे असे काहीच ध्येय नव्हते पण जे मिळवता येईल ते ज्ञान मिळवायचे एवढेच उद्दिष्ट होते. आनंदरावांनी त्यांची बुद्धिमत्ता बघून इंग्रजी चेही धडे देणे सुरु केले. हे सर्व शिक्षण त्यांनी घरीच घेतले पण आनंदीबाईचे पहिले मूल डॉक्टर न वेळेवर आल्यामुळे मरण पावले तेव्हा त्यांना खुप असह्य वाटले आणि त्यांनी ठरविले की खुप शिकून अभ्यास करून डॉक्टर बनायचे त्यांच्या ह्या निर्णयाला गोपाळ रावांनी पूर्ण पाठिंबा दिला. आनंदीबाईला चांगले शिक्षण घ्यायचे म्हणून स्वतः बदली घेऊन त्यांना ख्रिस्ती शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्या ख्रिस्ती शाळेत जातात म्हणून लोकांनी बहिष्कार टाकला. ज्या शाळेत त्या जात होत्या त्यांनीही त्यांना धर्मांतर करायला सांगितले. गोपाळ राव त्यासाठी ही तयार झाले पण आनंदीबाईने ठरविले माझा धर्म न बदलता जिथे मला शिकता येईल तिथेच मी शिकेल त्यांच्या शिक्षणासाठी गोपाळरावांनी खुप ठिकाणी बदली करून घेतल्या आणि आनंदीबाईला पेंसिलव्हिनिया इथे प्रवेश मिळाला तेव्हा तिथे त्यांना एकटीला पाठविले. गोपाळ रावांची काही कारणास्तव नौकरी ही गेली पण तरी ते खचले नाही व पत्नीच्या शिक्षणाचा खर्च केला. अश्या प्रकारे गोपाळरावांच्या प्रयत्नामुळे आनंदी बाई भारतातील पहिल्या डॉक्टर बनल्या अश्या ह्या आनंदीबाई ज्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले त्यांनाही प्रणाम आणि ज्यांच्यामुळं हे शक्य झाले त्या गोपाळ रावांना प्रणाम...


अश्याच प्रकारे रमाबाई रानडे ह्याही शिक्षण घेऊन समाजसुधारक झाले. म्हणून स्त्री शिक्षणाचा सर्वानीच विडा उचलला पाहिजे.


Rate this content
Log in