Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

सशक्त महिला

सशक्त महिला

2 mins
127


 स्त्री ही क्षणिक पत्नी अन अनंत काळची माता असे म्हणतात.

  जन्म होतो बाहुलीचा.आई बाबांची लाडकी बनते.दुडूदुडू अंगणी धावते.पायातले छुमछुम रूणूरुणू वाजते. सर्व घरातल्यांची लाडकी होते.

   जरा मोठी होते.समाजाचा घटक बनते.समाजातील इतरांबरोबर बोलते,चालते. शाळेत जायला लागते.आईचा हात सोडून बाईंचा पदर पकडते. अ,आ,इ,ई पाटीवर गिरवायला लागते.

  शिक्षण घेते.काॅलेजला जाते.मुलांबरोबर ,मुलींबरोबर सुखदुःखाचे क्षण घालवते.मनातले बोलते.मन रिकामे करते.

  आता बघायला पाहूणे येतात.उमदा तरूण पाहून बोहल्यावर चढते. लग्नबंधनात अडकते.आता संसाररूपी नावेत चढून संसाराला लागते.

  अरे संसार संसार

  जसा तवा चुल्यावर

  आधी हाताला चटके

  तेव्हा मिळते भाकर....

याचा प्रत्यक्ष प्रत्यय घेते.अनुभव घेते.तिचा पती तिच्यासमवेत असो की नसो ती मात्र स्वतःचे कर्तव्य सदा पार पाडते.

   जीवनी येवून कुटुंबातील सर्वांची सेवा करण्यात मग्न होते. या मधे स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष करते.

   स्वतःची आवड निवड जपणे सोडून देते.फक्त सासू सासरे नणंद,दीर यांचे मनापासून करते.त्यांच्याच हातातले बाहुले होवून राहते. वहिनी चहा हवा ग,वहिनी नाष्ट्याला काय करते,वहिनी जेवण तयार झाले का?.अशा प्रश्नांना रोजच सामोरी जाते.

  सासूबाईंचे वेगळेच असते.हे इथेच का ठेवले?तिथे का नाही ठेवले? जरा हात भरभर चालव ग..अशा अनेक सूचनांना सामोरी जाते.

  पतीदेव काय ..बायकोची वाट पाहतात.आज ती आपल्या वाटेला येईल का?याची वाट पाहत असतात.पण हाय रे देवा!तिला काही पतीचे प्रेम हवे तसे मिळत नाही.

   प्रेमान कधीतरी जवळ आलेल्या यांना मुले होतात ..झाल....आता मुलांच्या संगोपनात ही बाहूली अडकते.आणखी कामाचे ओझे वाढते.तिची तारेवरची कसरत चालू होते. 

   मुलांना मोठे करताना असंख्य अडचणींना तोंड देता देता नाकी नऊ येतात.

  असंख्य आव्हाने पेलताना ती कधी उतार वयाची होते हेच तिला समजत नाही.आताशा आरशात पाहताना सुरुकुतलेली त्वचा,क्षीण झालेली नजर,खोल गेलेले डोळे पाहून स्वतःलाच एक प्रश्न विचारते"मीच का ही ती आईबाबांची निर्मळ,बोलकी बाहुली" तिला आता वाटतेय की सर्व सोडून द्यावे व स्वतःसाठी थोडे जगावे.आपले मागे राहिलेले छंद जोपासावेत.

   मग ही जरा घराबाहेर पडायला लागते.सर्व कर्तव्यातून जराशी मुक्त व्हायला लागते. छंद जोपासून मन शांत करते.आनंदी होते.

   जीवनाच्या वाटेवर ही फुलेही आहेत हे तिला आत्ता समजायला लागते.जीवनउतार सुसह्य करते.

   पूर्ण घरादाराची झालेली ही माता जरा आता विसावा घेवून स्वतःच्याच विश्वात रममाण होते.

   हे एक पारंपारिक,सोशिक महिलेच्या विवाहाचे उदाहरण दिले आहे.

  आता आपण सध्या मुले मुली खूप शिकतात.इंजिनिअर,डाॅक्टर,वकील होतात.तंत्रज्ञानात प्रगती करतात.यांची विवाह कथा बघूयात.

  हल्ली अशा मुलांची लग्ने होतात.नाही पटले तर लगेच घटस्फोट घेवून रिकामेही होतात.काही बोटावर मोजण्याईतकी विवाह संबंध टिकून राहतात.

  तर अशी आहे स्त्री जन्माची कहाणी.खूप हाल अपेष्टा सहन करून एकनिष्ठ राहण्यात धन्यता मानणारीही स्त्रीच आहे.तर जर आपण स्वतः कमवतो ,स्वतःच्या पायावर उभे आहोत तर का सर्वांचे हिन शब्द ऐकून घ्यायचे,का सर्वांनी केलेली मानहानी सहन करायची अशाही विचाराची ही स्त्रीच असते.

  अशी ही आधुनीक स्त्री व पूर्वीची स्त्री थोडासा फरक आहे पण हल्लीची स्त्री देखील असंख्य आव्हानांना सामोरी जाताना तारेवरची कसरत करत असते.पहाटे उठून स्वयंपाक करणे,मुलांचे आवरणे,कुटुंबाला वेळ देणे.पतीला वेळ देणे.नोकरी करणे.अशी अनेक जबाबदारी पेलून पतीला संसारात आर्थिक मदत करते.

  पुर्विच्या स्त्री पेक्षा आत्ताची स्त्री सबला आहे.स्वतः कमवते,स्वतः निर्णय घेते.

  स्त्री जन्मा तुझी कहाणी

  या जीवनाच्या मधूर अंगणी

  वेणू जाईल याचा गगनावरी

  साज चढेल आनंदाच्या क्षणी....


Rate this content
Log in