संधी.
संधी.
एका गांवातील मध्यम परिवारातील शेतकरी कुंटुंब शेतिवर घर खर्च चालत नाही. आणी शेतीतील उत्पन्नाची काही हमी नसते हे त्याला अनुभवा वरुन कळुन चुकले होते. शेतित काही अर्थ राहिला नव्हता असे त्याला वाटत होते. मुलांचे भविष्य शेतिमधे अंधककारमय आहे याची जानीव त्याला झाली होती. समोरचे पीढिचे भविष्य शिक्षणा सिवाय काही उज्वल नाही असा ठाम विश्वास त्याला झाला होता. देशात अनेक पुढारी त्यांच्या देशाचे नागरिक शिक्षित व्हावे म्हणुन अहोरात्र प्रयत्न करित होते. व त्यासाठी झिझत पण होते. त्यामधे प्रामुख्याने महात्मा फुले,सावित्री फुले व शाहु महाराज यांचा वारसा चालविण्याचे कार्य करणारे प्रमुख, डॉ.पंजाबराव देशमुख, कर्मविर भाऊराव पाटिल, संत गाडगे महाराज व डॉ. बाबासहेब आंबेडकर होते. तो घरप्रमुख शिकला असल्यामुळे त्याच्या वर या राजकिय व सामाजिक चळवळीचा परिणाम झाला होता.वाकीन पण झुकणार नाही असा प्रण त्या शिकलेल्या शेतक-याने घेतला होता. म्हणुन त्याने इंग्रज सरकारची नौकरी करायची नाही असे ठाम पने ठरविले होते.परंतु काळाजी गरज बघुन मुलांच्या शिक्षणासाठी व उज्वल भविष्यासाठी शहरात वास्तव्य करण्याचे ठरविले होते. बुडत्याला काठीचा आधार म्हणुन शहरात त्याने एका निजि बैंकत नौकरी करने सुरु केले होते. सोबत शेतिचा ही थोडा फार आधार होताच. मुले आप-आपल्या क्षमते प्रमाणे शिकले व आपल्या काम-धंद्याला लागले होते.
त्याचा एक मुलगा एका गांवात शिक्षक म्हणुन कार्यरत होता. जसी-जसी संधी मिळत गेली ,तसी-तसी तो शाळात सोडत-सोडत शहरात आला होता. प्रयत्नांती परमेश्र्वर. शेवटि भारत सरकारच्या केंद्रिय विद्यालयत त्याला नौकरी मिळवली होती. मुलाने एक शिकलेला मुली सोबत लग्न केले होते. तीच्या जवळ आवश्यक शैक्षणिक पात्रता असल्यामुळे तीला पण त्याच शहरात शिक्षकेची नौकरी मिळाली होती. त्यांचा संसार सुखाचा चालु होता. त्यांना दोन कन्या-रत्न झाले होते. मुलगी चंद्राच्या कले प्रमाने मोठी-मोठी होत होती. ती कॉन्वेंट मध्ये जायला लागली होती. घरी आई-वडिल शिक्षक असल्यामुळे तीच्या कडे दोघांचे चांगले लक्ष होते. ती पण मेहनती होती. पण तीला गणित व विज्ञाना मध्ये थोडि कमजोर होती. आडात नसेल तर पो-हयात कसे येणार !. तीचे आई-वडिल पण कला क्षेत्रातच स्नातक होते. मुलीचा इंग्रजी व अन्य विषयावर चांगली पकड होती. तीला दहावी बोर्डा मध्ये याच विषयमुळे चांगले प्रतिक्षत गुण प्राप्त झाले होते. आई-वडिल फार महत्वाकांक्षी होते. त्यांच्या परिवारत अजुन पर्यंत कोणी इंजिनिअर झाला नव्हता. आपली मुलगी इंजिनिअर झाली पाहिजे असी त्यांची खूपच मनापासुन तीव्र इच्छा होती. त्यामुळे तीला बारावीं सायंस मधे टाकण्यात आले होते. कसले काय आणी फाटक्यात पाय. बोर्डचा परिणाम आला होता, तेव्हा तीला सायंस गृपला जेम-तेम गुन मिलाले होते. पण इंग्रजी विषयात ती बोर्डात प्रथम होती. तसाच तीचा निम्म स्कोर इंजिनिअरिंगच्या प्रवेश परिक्षे मध्ये पण होता. तीला कुठे ही शेवटच्या रॉउंड पर्यंत कोणत्याच इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला नव्हता.
आपला तो बाब्या,दुस-याचं कार्ट समजुन सर्व परिचित, नातेवाईक व मित्र मंडळी त्या कुंटुंबाला सारखे मार्गदर्शन करित होते. तुम्ही आपल्या मुलीला दुस-या अन्य क्षेत्रात प्रयत्न करायला सांगा !. तीथे तीचे कदाचित भविष्य उज्वल राहु शकते. तीला इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम जरी कुठे प्रवेश मिळाला तरी झेपणार नाही. आपलेच दात आणि आपलेच ओठ ,त्यामुळे कुंटुंबाची सारखी नालायकी व अपमान होत होता. नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न, अशा परिस्थितित मुलीच्या वडिलांची बदली एका दूर शहरात झाली होती. मुलीला जवळ-जवळ शेवटच्या राउंड पर्यंत प्रवेश कुठेच मिळाला नव्हत. आता ती इंजिनिअर होणार नाही हे त्रिकालबादित कटु सत्य होते. सयंमाचे फ्ळ नेहमी गोड असते. आणी उंट कोण्या बाजुने कड घेईल हे निश्चित नसते. अचानक जिथे मुलीच्या वडिलांची बदली झाली होती. तेथील रसायन इंजिनिअरिंगच्या काही मुलांनी चांगला विकल्प त्यांना मिळाला होता म्हणुन ते सोडुन गेले होते. आगी शिवाय धूर दिसत नसतो. प्रबंधनाने त्या जागा भरण्यासाठी स्पॉट अॅडमिशन करण्याचे ठरविले होते. प्रयत्नांती परमेश्र्वर, तीला तीथे शेवटी प्रवेश मिळाला होता.
मिळालेल्या संधीची किंमत तीला आता समजली होती. संकटतुन पण चांगला मार्ग निघु शकतो. फक्त मिळालेल्या संधीचे आपल्याला सोन करता आल पाहिजे !. रसायन इंजिनिअरिंग मध्ये गणितचा नाममात्र उपयोग असतो. त्याच्या तीने फयदा घेतला व तिने हाडे झिजे पर्यंत मेहनत करुन कॉलेज मधील मेधावी विद्यार्थांच्या पंक्तित ती जावुन बसली होती. व तीने तीच्या घराण्यातील प्रथम इंजिनिअर होण्याच्या सम्मान पण मिळवला होता. त्यसाठी तीचे सर्व परिवारातील सदस्यांनी कौतुक पण केले होते.जर आलेल्या संकटाला त्या परिवाराने तोंड दिले नसते,तर हा सम्मान तीला मिळू शकला नसाता म्हणुनच आलिया भोगासी असावे सादर.
त्या नंतर तीला एम.बी.ए ला पण नामांकित संस्थान मधे प्रवेश मिळाला होता. वरचा नेहमीच छप्पर फाडुन देतो, तीला लगेच चांगल्या कंपनी मधे नौकरी पण मिळाली होती. तीची इंग्रजी वरिल पकड आणी लिडरशिप गुणा मुळे तीला लगेच कार्यकारी पदावर पदोन्नती मिळाली होती. तीचे एक सरकारी संस्थान मध्ये वैज्ञानिक असलेल्या मुला सोबत लग्न झाले होते.तिला एक नटखट, सुंदर,गोंडस मुलगी पण होती. त्यांचा संसार आता थाटात चालत होता. पन जीवणात काही तरी वेगळे करण्याची तीच्या मनात आग लागली होती. तिचि भूक मिटवन्यासाठी ती स्वतःची कंपनी उभी करण्याचे प्रयत्न करित होती. आपण कोणाची चाकरी करण्यापेक्षा आपन ईतरांना रोजगार दिला पाहिजे यासाठी ती सध्या प्रयत्नशिल होती !. म्हणुनच म्हणतांत अपयश हीच यशाची पहिली सिडी किंवा निशानी आहे. काही करण्यासाठी मनातील आग कधीही विझता कामा नये.
