समाज आणि आपण
समाज आणि आपण
जीवन जगताना या समाजाच्या दलदलीत आपण कुठेतरी चुकतोय असं वाटत नाही का ?
का ? आपली मुलं अहिंसा करतात, बलात्कार करतात, चोऱ्या करतात, खूण करतात. अशी बेशिस्त का ? वागतात . कधी विचार केलाय का ?
पहिली गोष्ट म्हणजे आपण संस्कार द्यायला कुठेतरी कमी पडतोय. लहानपणापासूनच त्याला संस्काराचे योग्य बाळकडू द्यायला हवेत. संस्कारांची तिजोरी जी परंपरेने आपल्या आजोबा पंजोबांकडून आपल्यापर्यंत आलीये ना ती तिजोरी. संध्याकाळी जवळ घ्या आपल्या मुलांना विचारा मित्रमंडळींबद्दल, त्यांनी आज काय काय केलं ? कितीही थकला असलात तरीही. त्यांना संस्काराचे बाळकडू पाजा कारण ही आत्ताच्या भरकटत जाणाऱ्या काळजी गरज आहे. हे जे बलात्कार, खूण, चोऱ्या होत आहेत ना ते दुसरे तिसरे कशामुळे होत नसून संस्काराच्या कमतरतेमुळे होत आहेत. आज माणूस माणसात राहिला नाही आपापसातील गोडी कमी होत चालली आहे.
आता हे संस्काराचे बाळकडू पाजायचं म्हणजे नक्की काय करायचं ?? आपल्या वृद्ध आईवडिलांजवळ मुलांना बसवा आणि स्वतःही बसा.त्यांच्या जुन्या काळाबद्दल तुम्ही स्वतः विचारा, त्यावेळची माणसं कशी होती ?, कशी वागायची ?, स्त्री चा सन्मान कशी करायची ? , थोरांचा आदर कशी करायची ? या व अशा भरपूर गोष्टी विचारा. याने काय होईल ? आईवडिलांना तुम्ही स्वतः बोलताय त्यानाही बर वाटल आणि लहान मुलांवरती तुमच्या विचारलेल्या प्रश्नातून जी उत्तरं मिळतील ना त्यावरून समाजात वावरायचं कस ? हे समजून येईल. कारण लहान मुल हे चिखलाचा गोळा असतो आपण घडवावा तसा घडत असतो.चांगल्या विचारांची आदाण-प्रदान व्हायला हवी.
का ? घडत नाहीत पुन्हा स्वामी विवेकानंद जे "बंधू आणि भगिनींनो" या फक्त दोन शब्दांनी सभा जिंकतात. का ? घडत नाहीत पुन्हा छत्रपती शिवाजी राजे जे अतिप्रसंग केला म्हणून पाटलाचे हात कलम करतात. घडणारही नाहीत कारण आजकाल समाजाची जी वाटचाल चालूये ना त्यावरून तर वाटत नाही की असे शूरवीर पुन्हा जन्माला येतील.अरे हा तोच देश आहे ना ज्या देशात छत्रपती शंभूराजे, लोकमान्य टिळक, गांधीजी, आंबेडकर,
शाहू, फुले, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव यांसारखे अनेक कितीतरी शूरवीर जन्माला आले. अशा या महान देशातल्या मातीत आपण सारे जन्मलो आहोत. काय मग चुकतोय कुठं आपण ? काय कमी पडतंय ?
आजकालची मुलं पुस्तकं वगैरे वाचतच नाही चोवीस तास तो मोबाईल. सांगना आज किती ? मुलांनी फुले, आंबेडकर, शाहू, छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे वाचलेत किंवा किती? जणांना यांच्याबद्दल माहितेय. किती जणांच्या घरात अवांतर वाचनाची पुस्तकं आहेत. याच उत्तर क्वचितच जणांकडे असेल. आपल्या मुलांना समाज तर घडवतोच ओ पण हा समाज सगळ्याच चांगल्या गोष्टी नाही शिकवत. आपलीही जबाबदारी असते की आपण आपल्या मुलांवरती कसे संस्कार करायचे आणि कस घडवायचं ते.
बलात्कार, चोऱ्या, खूण हे तेव्हाच बंद होतील ज्यावेळी प्रत्येक पालक स्वतःच्या पाल्याला उच्च दर्जाचे संस्काराचे बाळकडू पाजेल. त्यांना अँड्रॉइड मोबाइल ऐवजी पुस्तकं देतील. प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, फुले, आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, चंद्रशेखर आझाद या शूरवीरांच्या गोष्टी सांगतील. त्यांच समाजातील महत्व आणि कार्य समजावून सांगतील.स्त्री चा सन्मान शिकवतील. जितकी घरची स्त्री महत्वाची आहे तितकीच बाहेरचीही.तिचा आदर करायला शिकवलं पाहिजे. आपल्या चिखलाच्या गोळ्यांच योग्य मूर्तीत किंवा भांड्यात रूपांतर कस करायचं ही आईबापाची जबाबदारी आणि प्रथम कर्तव्य आहे.नुसतं जन्माला प्राणीही घालतातच मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक.
बास पुरे झाले आता. वेळ आहे हीच स्वतः सकट समाजालाही सुधरावयाची. भरकटत चाललेल्या समाजाला दिशा दाखवायची. जिथे आपला पाल्य चुकतोय तिथे त्याला योग्य ती शिक्षा करा त्याचं समर्थन करत बसू नका.आयुष्य मानाने जगता येईल असे संस्कार करा. पुस्तकाची शिदोरी त्यांना वाढायला शिका. थोरामोठ्यांच्या गोष्टी त्यांच्या कानी घाला. इतिहासाची पाने चाळायला लावा. शूरवीरांचे संस्कार त्याच्यावरती घडवा. स्त्री सन्मानाचे धडे गिरवायला द्या.स्वतःच्या आईवडिलांचा आदर करा नक्कीच तुमची मुलं तुमचा आदर करतील. या मोबाईल च्या दुनियेतून बाहेर निघा मनसोक्त जगायला शिकवा. एक वाटचाल प्रगतीच्या दिशेने करा. नक्कीच बलात्कार घडायचे कमी होतील.
