सकू,बकू आणि डुबऱ्या
सकू,बकू आणि डुबऱ्या
एक होती आजीबाई तिला एक रुपया सापडला, ती विचार करते शिंगाडा घेऊ का शेंगदाणा घेऊ,शिंगाडा घेऊ का शेंगदाणा घेऊ. ती शिंगाडा घेऊन घरी येते, मग ती विचार करते हाताने फोडू का ताव्यावर फोडू हातावर फोडू का ताव्यावर फोडू. मग ती हातावर फोडते तिला एक मोठा फोड होतो, ती परत विचार करते घरच्या घरी फोडू का डॉक्टर कडे जाऊ? घरच्या घरी फोडू का डॉक्टर कडे जाऊ. मग ती डॉक्टर कडे जाते डॉक्टर म्हणतो त्यातून जे काही निघेल ते मी घेणार आजीबाई म्हणते नाही. मग ती घरी येते घरी आल्यावर ती परत विचार करते सुईने फोडू का सऱ्याने फोडू, सुईने फोडू का सऱ्याने फोडू, मग ती सुईने फोडते तेव्हा त्यातून तीन जण निघतात. आजीबाई त्यांची नावे सकू, बकू, डुबऱ्या ठेवते. आजीबाई काम करत असते मग तिला कामात मदत हवी असते म्हणून आजीबाई सकुला हाक मारते, सकू आळशी असते ती येत नाही,मग आजीबाई बकुला हाक मारते बकु सुद्धा आळशी असते ती सुद्धा येत नाही. मग आजीबाई डुबऱ्याला हाक मारते, डुबऱ्या पटकन येतो. डुबऱ्या नेहमी आजीबाई चे सर्व काम ऐकतो आजीबाईला सर्व कामात मदत करतो, म्हणून आजी बाई म्हणते सकू नाही बकू नाही डुबऱ्या माझ्या कामाचा.
