SWATI WAKTE

Children Stories Inspirational

2.1  

SWATI WAKTE

Children Stories Inspirational

श्यामची आई आणि संस्कार

श्यामची आई आणि संस्कार

3 mins
662


श्याम म्हणजेच लहानपणीचे साने गुरुजी..त्यांना जे सुसंस्कार दिले. ते त्यांच्या आईने... श्यामच्या आईने श्यामला माणसांवरच नाही तर गुरे ढोरे, फुलझाडे ह्यावरही प्रेम करायला शिकविले. एकदा श्यामने गुलबाक्षीच्या कळ्या तोडून आणल्या तर श्यामची आई त्याला म्हणाली श्याम झाडाच्या कळ्या कधीही तोडू नयेत जसा आपल्याला त्रास होतो तसाच झाडांनाही त्रास होतो. एकदा श्यामच्या आईने वडाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा 3 दिवस मारण्याचे व्रत करण्याचे ठरविले. पण आईची तबेत ठीक नसल्याने तिला वडाला 108 प्रदक्षिणा मारणे शक्य नव्हते. त्यामुळे ती श्यामला म्हणाली श्याम मी वडाला 3 प्रदक्षिणा मारेल बाकी तु मार. श्याम म्हणाला आई मी कश्या मारू ग. लोक मला वडाला प्रदक्षिणा मारल्या तर हसतील. मला लाज वाटेल. त्यावर त्याची आई म्हणाली अरे आईचे काम करायला कसली रे लाज.. आईचा विचार करायचा की लोकांचा. आईची इच्छा श्यामने प्रदक्षिणा मारून पूर्ण केली. 

कोकणात विहिरी पावसाळ्यात पाण्याने तुडुंब भरत. सर्व मुलं तेव्हाच पोहणे शिकत. कमरेला भोपळा बांधून पोहणे शिकत. पण श्याम पोहणे शिकायला घाबरत होता. आपला मुलगा भित्रा बनू नये असे श्यामच्या आईला वाटे..श्यामची आई त्याच्या मित्राला म्हणाली  रविवारी तुम्ही तुमच्या सोबत पोहायला श्यामला घेऊन जा. ती श्यामला म्हणाली जाशील ना रे श्याम.. त्यावर श्याम काही बोलला नाही.. रविवारचा दिवस उजळला. श्याम पोहायला जाण्याच्या भीतीने लपून बसला. श्याम च्या आईने श्यामला शोधून काढले व काडीने पाठीवर मारत विहिरीवर नेले व श्यामच्या कमरेला भोपळा बांधून त्याला विहिरीत ढकलून दिले श्याम ओरडू लागला. त्याचे मित्र त्याला पाण्यात हात पाय मारणे शिकवू लागले. हळूहळू श्यामचा आत्मविश्वास वाढला त्याची पाण्याची भिती गेली. आणि श्याम भोपळा काढून पोहू लागला. श्यामची आई त्याला जवळ घेऊन शाबासकी देऊन म्हणाली तुला कुणी भित्रा म्हटलेले मला आवडणार नाही. आणि त्याच्या पाठीवरच्या जखमांना तेल लावून दिले. 

एकदा एक मोडी विकणारी रस्त्यावरून जात असता तिच्या डोक्यावरची मोडी पडली ती मोडी उचलून कुणीही तिच्या डोक्यावर द्यायला तयार नव्हते. श्यामच्या आईने श्यामला त्या बाईला मदत करायला सांगितले आणि त्यातूनच श्यामला जातीधर्म ह्या थोटांग पेक्षा माणुसकी महत्वाची असते ही शिकवण मिळाली. 

कोकणात पत्रावळी आणि द्रोण वर जेवणाची पद्धत होती. श्यामचे बाबा पत्रावळीसाठी लागणारे पाने आणत. सर्व जण आपापली पत्रावळी बनवून जेवत पण श्यामला पत्रावळी बनविणे आवडत नसे तो पत्रावळी बनविण्यास नकार देई. एकदा त्याच्या आईने त्याला बजावून सांगितले जो पत्रावळी स्वतः ची बनवणार नाही त्याला आज जेवणही मिळणार नाही त्यावर श्याम चिडून म्हणाला मला जेवायचेही नाही आणि पत्रावळीही बनवायची नाही. श्यामची थोरली बहीण माहेरपणाला आली होती. ती त्याला श्याम मी तुला बनवायला शिकविते तु बनव. आज मी इथे आहे रोज तुला समजावयाला नसणार. श्यामने एक कशीतरी छोटी पत्रावळी बनवली. आईने त्याला त्यावरच वाढले श्यामचा राग गेला नव्हता त्याने कसेतरी घाईघाईत जेवण उरकले. त्या पत्रावळी ची शीतक बाहेत आली ती श्यामच्या घश्यात अडकली त्यावर श्याम आईला म्हणाला कोणतेही न येणारे काम केले की असेच होते. त्यावर आई म्हणाली नीट लक्ष देऊन काम केले नाही तर असे व्हायचेच. नंतर पुढे श्याम नीट पत्रावळी बनवायला शिकला. आईने एक त्याच्या बाबांना श्यामने बनविलेल्या पत्रावळीत वाढले. बाबांना त्या पत्रावळीची फिनिशिंग खुपच आवडली. अश्या प्रकारे श्याम व्यवस्थित पणा शिकू लागला. प्रत्येक काम शिकू लागला. 

पुढे श्यामला शिक्षणासाठी त्याच्या गावात प्राथमिक शिक्षणच असल्यामुळे त्याच्या आत्याकडे दापोलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्यासाठी ठेवण्यात आले. तिथे आपल्या आई बाबांना आपल्या मुळे खाली पहावे लागू नये म्हणून सर्व काम नीट नीटके व्यवस्थित करून सर्वांना मदत करून अभ्यास करू लागला. 

श्यामच्या बाबांना भाऊबंधकीत फक्त कर्जाचा भारच मिळाला म्हणून कालांतरानं त्यांची परिस्तिथी फारच बिकट झाली त्यामुळे त्यांना मुलांचा बाहेरच्या शिक्षणाचा खर्चही परवडण्यासारखे नव्हते पण श्यामला शिक्षणाची भारी हौस म्हणून त्याने औंध मध्ये एक संस्था शोधले जिथे राहण्याची व जेवण्याची सोय मोफत होती. पण श्याम तिथे गेल्यावर समजले की ते तेथील रहिवासी लोकांसाठीच होते श्याम कोकणातला असल्यामुळे त्याला ते मिळणार नव्हते. मग त्याने माधुकरी मागून जेवण्याचे ठरविले पण स्वाभिमानी श्यामला अपमान ऐकून घेणे पटत नव्हते मग त्याने गिरणी वरून खाली सांडलेले पीठ गोळा करून स्वतः स्वयंपाक करण्याचे ठरविले. आणि जेवण्याचा प्रश्न मिटवला पण पुढे नशिबाच्या फेऱ्याने प्लेग च्या साथीमुळे ती औंधची संस्था बंद पडली. म्हणून ते घरी परतले तर त्यांच्या बाबांना वाटले श्यामने परिस्थिती ला घाबरुन पळ काढला.. मग श्याम पुण्याच्या एका मित्राशी बोलून त्याच्या सोबत राहून त्याच्या घरची पडली ती काम करून स्वाभिमानाने शिक्षण पूर्ण करतो. 

आईच्या संस्कारांमुळेच श्याम म्हणजेच साने गुरुजी शिक्षक, स्वातंत्र्य सेनानी, लेखक अश्या वेगवेगळ्या भूमिकेतून नावलौकिक मिळवतो. 



Rate this content
Log in