श्रीवास्तव ते शास्त्री
श्रीवास्तव ते शास्त्री
विनयशिल, स्वाभीमानी, कतृत्वसंपन्न, लोकाभिमुख, अहिंसावादाचे पुजारी, कणखर परंतु उदार मनाचे थोर देशभक्त लालबहादूर शारदाप्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म २ आक्टोंबर १९०४ रोजी उत्तरप्रदेश मधिल बनारस जवळील मोगलसराई येथे एका गरीब कुटूंबात झाला. घरची परीस्थिती फारच हालाखीची होती. वडील शारदाप्रसाद श्रीवास्तव प्राथमिक शिक्षक होते. आई रामदुलारीदेवी गृहिणी होत्या. अशा या लहान गरीब कुटूंबामध्ये दोन बहिणींसोबत लालबहादूर राहत होते. रामदुलारी देवीच्या आयुष्यात २० व्या वर्षीच वैधव्य आलं आणि त्याना आपल्या तिन्ही मुलांसोबत वडीलांच्या धरी राहवं लागलं. त्यामुळं परिस्थिती आणखिनचं बिकट होत गेली. पण त्यातुनही मार्ग काढत त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला. लालबहादूरांच्या जन्मदिनाचे वैशिष्ट म्हणजे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा जन्म एकाच दिवशी झाला. लालबहादूर यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. लहानपणी त्यांना प्रेमाने नन्हे म्हणत असतं. या नन्हेला रोज शाळेत जाताना नदी पार करून जावं लागत असे. शाळेला जायला रस्ता नव्हता त्यामुळे रोज नावेतुन प्रवास करावा लागत असे. त्यामुळे नावाड्याला त्याचे पैसे मोजावे लागत होते. कधि कधी जवळ पैसे नसतील तर लालबहादूर डोक्यावर दप्तर घेऊन पोहून नदी पार करत असतं व पैसे वाचवत असतं.
एकदा असा एक प्रसंग घडला एक म्हातारा या नन्हेवर खुप चिडला. त्या म्हाता-याने तयार केलेल्या त्याच्या मऊ गुबगुबीत अंगणातील मातीवर रात्री गुरांनी हैदोस मांडला व त्याने तयार केलेल्या जमीनीची नासधुस केली. म्हातारा विचार करू लागला कोण असेल हा गुराखी ?, कसा शोध लावावा याचा ? असा विचार करताना त्याचे लक्ष अंगणात पडलेल्या लहान मुलाच्या पाऊलाकडे गेले. ते पाऊल कोण्या राजकुमाराचे असावेत असे भासत होते. मुलाचा पत्ता लागला म्हातारा त्याच्यापाशी गेला. गुराख्याचे ते लहान पोर रडू लागले, गयावया करू लागले. माफी मागु लागले. तेवढ्यात म्हातारा म्हाणाला, रडू नको बाळ ! हास तु राजा होणार आहेस. मार चुकल्यामुळं मुल आनंदाने हसु लागलं. झोपडपट्टीतुन सुरू झालेला हा प्रवास महलाकडे जाण्याचे सुचक वक्तव्य करत होता. ते होणारही होते कारण या लहानग्या नन्हेकडे वक्तशिरपणा, प्रामाणिकपणा, निःस्वार्थी वृत्ती, कर्तव्य – परायणता, हे गुण ठासुन भरले होते. आणि म्हणुनच ते लालबहादूर शास्त्री झाले. लालबहादूर कधिही प्रसिध्दीच्या झोतात आले नाहीत. त्यांच्या कार्याचा आलेख प्रचंड मोठा आहे. पण प्रसिध्दी मात्र खुप कमी आहे. कारण ते लाला लजपतराय यांच्या कार्यापासुन प्रेरणा घेत होते. लाला लजपतराय त्यांना नेहमी म्हणत असतं, लालबहादूर ताजमहल बांधण्यासाठी दोन प्रकारच्या दगडांचा उपयोग झाला आहे. नक्षिकाम व कळसासाठी वापरलेले संगमरवरी दगड, यांची प्रशंसा तर सारं जग करतंपण पायासाठी वापरलेल्या दगडाकडे कोणीही पाहत नाही पण तेच खरे या शिल्पाचे आधार असतात. तु पायाचा दगड बन नुसता वरचा शोभेचा दगड बनु नको. संधिची सेवा न करता सेवेची संधी घेणे हेच तत्व शास्त्रीनी जपले. म्हणुनच त्यांचे कतृत्व, नेतृत्व, आदर्श व अनुकरणीय ठरले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हेच त्यांचे वैशिष्ट होते. लालबहादूरांनी बनारस विध्यापीठातुन तत्वज्ञान या विषयात " शास्त्री " ही पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी श्रीवास्तव या आडनावा एवजी शास्त्री हे आडनाव धारण केले. लालबहादूरांचे लग्न मिर्झापूरच्या लतादेवी गौरी यांच्याशी ठरले. त्यावेळी मुलीकडून मुलास हुंडा देण्याची प्रथा होती. पण या प्रथेला शास्त्रीजींचा तिव्र विरोध होता. तरीही रितिरिवाजाप्रमाने आपण हुंडा घ्यावा अशी सासरेबुवांनी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देउन शास्त्रीजी म्हणाले. " मामाजी तुमचा आग्रह आहे तर मला हुंडा म्हनुन पाच वार खादीचे कापड द्या " लालबहादूरांची तत्वनिष्ठता यातुन पहावयास मिळते. शास्त्रींनी स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. आणि त्यातुन ते अनेकवेळा कारावासातही गेले होते. त्यांना ब्रिटाश सरकारने सात वेळा अटक केली होती. आयुष्याची एकुण नऊ वर्षे त्यांनी कारावासात घालवली होती. यावरुन त्याचे देशाविषयीचे आगाध प्रेम व राष्ट्रनिष्ठा दिसुन येते. १९४६ साली ते उत्तरप्रदेश सरकारच्या विधिमंडळावर निवडून येवून ते मंत्री झाले. त्यानंतर १९५२ साली पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री होण्याचा मान त्यांना मीळाला. त्यानंतर १९६० साली ते गृहमंत्री झाले. देशाच्या मंत्रीमंडळातील दोन नंबरचे सर्वोच्य पद त्यांनी मिळविले. नेहरुंच्या मृत्यू नंतर ९ जुन १९६० रोजी ते भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. त्यांच्या कार्याचा चढता आलेख पाहिला तर एका सर्वसामान्य गरीब कुटूंबात जन्मलेलं नन्हे नावाचं मुल लालबहादूर शास्त्री झालं. आणि त्यापुढेही जावून स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होण्याचा मानही त्याने मिळविला. जय जवान जय किसान ही त्यांची घोषणा संपुर्ण भारतात घुमली. व आजही ती त्यांचीच आठवण करून देते. एक करारी लोकनेता , मंत्री, पंतप्रधान, म्हणुन त्यांनी आपली कारकीर्द अजरामर करुन सोडली. अशा या महान व्यक्तीचे निधन १० जानेवारी १९६६ रोजी रशियातील ताश्कंद शहरी पाकिस्तानबरोबर शांततेचा करार करावयास गेले असता त्या ठीकाणी झाला. त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना त्याच्या प्रेरणेचा उपयोग आजच्या पिढीली नक्कीच होईल अशी आशा आहे.
