STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

श्री हरीचा पेंद्या...

श्री हरीचा पेंद्या...

1 min
267

आवडते पौराणिक पात्र....


पौराणिक पात्र म्हंटले की मोठीच्या मोठी यादी नजरे समोर उभी राहते आणि रामायणा पासून ते महाभारता पर्यंत साऱ्या पौराणिक पात्रांची नकळत उजळणी होते. इतर धार्मिक ग्रंथ सम्पदेतूनही अनेक पात्रांची हजेरी पण लागते. दैवतांची पुराणेही अनेक पात्रांचा परिचय करून देतात. प्रत्येक पात्र स्वयंपूर्ण पणे अधोरेखित होते. मला आवडलेले पौराणिक पात्र अगदी साधे पण तितकेच मोलाचे वाटते.ते म्हणजे श्रीकृष्णाचा जिवलग मित्र पेंद्या..

कारण या पात्राने माझ्या बालमनावर खूप चांगला परिणाम केला. मैत्री म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय? त्याग म्हणजे काय? असे अनेक प्रश्न स्वतःच्या व्यक्तित्वाने लीलया सोडविले. म्हणून पेंद्या हे पात्र मला खरोखरच परिपूर्ण वाटते. त्यामूळे

नकळत मला म्हणावे वाटते...

पें द्याच्या मैत्रीला तोड नाही

द्या यचे काही असे ठेवले नाही

श्री हरी नामाने सुरुवात ज्याची

ह सत मुखाने दिवसाची व्हायची

री क्त ओंजळ सदा श्री हरी चरणी

चा लता बोलता करीत जीवन जगणे

  म्हणजेच जीवनाची असे करणी...


Rate this content
Log in