Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

शिक्षकदिन

शिक्षकदिन

2 mins
332


 ५ सप्टेंबर हा डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण पूर्ण भारतभर "शिक्षकदिन" म्हणून साजरा करतो.

  गुरूजन हे वंदनीय,पूजनीय आहेत.परब्रह्म स्वरूप आहेत.अशा वंदनीय गुरूजनांबद्दल आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

   यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मधे झाला.शिक्षणात नेहमीच ते प्रथम श्रेणीत आले.नंतरते प्राध्यापक झाले.तत्वज्ञानावरील त्यांचे ग्रंथ व व्याख्याने परदेशी पण गाजली आहेत.

   १९४९ ते १९५२ भारताचे रशियातील राजदूत म्हणून कार्य केले.

१९५२ ते १९६७ पर्यंत प्रथम भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होवून ते निवृत्त झाले.

  शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान आले पाहिजे.आणि आपल्या विचारांची दिशा ठरवता आली पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते.

  त्यांच्या शैक्षणिक कार्यप्रणालिचा आदर व्यक्त करण्यासाठी हा आदर्श शिक्षकांच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र "शिक्षक दिन" साजरा केला जातो.

    अनादी काळापासून आपल्या देशात शिक्षकाचे स्थान अबाधित आहे. शिक्षक हा उद्याचा भारताचा शिल्पकार आहे.विद्यार्थ्यांना ज्ञान कौशल्य देण्याबरोबरच शील,नितीमत्ता,राष्ट्रप्रेम याने मुलांची मने विकसित करण्यासाठी संस्कारक्षम बोधकथेतून ज्ञान देतात.

     सरस्वतीमंदीरात पहिले पाऊल बालक शिक्षकाचा हात धरूनच टाकते.संस्कारीत दीपस्तंभ उभा करण्याचे काम शिक्षकच करत असतो.कार्य करण्यासाठी सतत प्रेरणा देत असतो.

   काम,क्रोध,मद,मत्सर,लोभ, या शत्रूंवर विजय मिळवण्याचे शिक्षणही शिक्षक देत असतात.

   जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे.हे व्यक्तीचे चारित्र्य घडवते.

   आजच्या या तंत्रज्ञानी शिक्षणामुळे ही भावी पिढी उत्तम घडत आहे. त्यांचा सर्वांगीण विकास होत आहे,

   प्राथमिक शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षणाचा दीप सतत तेवण्यासाठी प्रत्येक मूल शाळेतयेवून शिकायला हवे या कडे शिक्षकाने लक्ष द्यायला हवे.कोणतेही मूल शिक्षणापासून वंचीत राहता कामा नये.सर्वजणांना शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली पाहिजे.

  सतत नाविन्याचे वारे असल्याने शिक्षकाने देखील नवीन गोष्टी अवगत करून मुलांना त्या प्रवाहात आणायला हवे.

  शेवटी एकच म्हणेन..

 "गुरूने दिला ज्ञानरूपी वसा

  आम्ही चालवू हा पुढे वारसा"....


Rate this content
Log in