Manisha Awekar

Children Stories

3  

Manisha Awekar

Children Stories

शीर्षक वेडं कोकरु

शीर्षक वेडं कोकरु

2 mins
211


  एका रानात वेडं कोकरु त्याच्या आई मजेत रहात होतं. त्याच्यावर त्याच्या आई बाबांचे

खूप खूप प्रेम होते. ते जरा दृष्टीआड झाल्यावर , त्यांचा जीव कासावीस व्हायचा. ह्याला कारणही तसेच होते. लांडग्यांची टोळी नव्याने दाखल झाली असल्याने ते दोघेही कोकराला खूप जपत.

   सारखे घरात बसून ८/१० दिवसांनी कोकराला खूपच कंटाळा आला.त्यांच्या वस्तीतली कोकरं फिरायला निघाल्यावर ,ह्यालाही आपण जावे असे वाटू लागले . आई बाबा म्हणाले , अरे पिलू तू सांभाळून जा. सर्वांबरोबर रहा. एकटाच कुठे जाऊ नकोस "

" हो हो "आसे आनंदाने म्हणून कोकरु सर्वांबरोबर उड्या मारत निघाले.

   सकाळचे कोवळे ऊन , शीतल वारा डोंगर नद्या बघून कोकरु पार हरखून गेले. थोडे चालल्यावर त्यांना हिरवेगार कुरण दिसले. कोवळे ऊन , हिरवे लुसलुशीत गवत बघून, कोकरांनी गवतावर ताव मारायला सुरुवात केली.

   लांडग्यांची टोळी मागे टपूनच बसली होती. लांडगे कुरणात शिरल्यावर, सर्व कोकरे वाट फुटेल तिकडे धूम पळाली. हे वेडं कोकरु होतं लहान !! तरी ते खूप जोरानं पळालं. तेवढ्यात शिकारी आले अन् लांडगे दुस-या दिशेला पळाले.

  बाकी कोकरं मोठी होती. त्यांना घराचा रस्ता माहिती होता. त्यांनी सगळीकडे कोकराला हुडकलं. कुठेच दिसेना बिचारं!!

  हे वेडं कोकरु जीवाच्या भितीने पळत सुटलं अन् भलत्याच मार्गाला गेलं. त्याला घरचा रस्ता सापडेना.

   इकडे सगळी कोकरं आली .आपलंच कोकरु नाही म्हटल्यावर आई बाबांच्या पोटात धस्सं झालं . ते दोघेही त्याला शोधायला बाहेर पडली.

   हे वेडं कोकरु घर शोधून खूप दमलं बिचारं!!ते बँ बँ आसं ओरडू लागलं. आई बाबांनी आवाजाच्या दिशेने जाऊन त्याला जवळ घेतले.

   आई बाबा भेटल्यावर ते गोडसं हसलं !! घरी येऊन जेऊन आईच्या कुशीत गाढं झोपलं.


Rate this content
Log in