Manisha Awekar

Children Stories

3  

Manisha Awekar

Children Stories

शीर्षक वाद्यांची मैफल

शीर्षक वाद्यांची मैफल

1 min
313


जंगलात एकदा सर्व प्राण्यांची नाचगाण्याची मैफल ठरली. सर्व प्राणी आपापले वाद्य ठरवू लागले. सर्व प्राणी जमल्यावर , ही मैफल ठरवायची कोणाची कल्पना?असा विचार सुरु झाला. अस्वल म्हणाले" ही मैफल हत्तीने ठरवली आहे.

   कोल्होबाने तबला वाजवायला सुरवात केली.तो खूप सुंदर तबला वाजवत होता. त्याचा तबला ऐकून वाघ दाद देत म्हणाला अरे , क्या बात !! साळिंदर पेटी सुंदर वाजवू लागला. सर्वजण खूष झाले. मुंगीने गाण्यासाठी वरचा सां लावला. तिचा आवाज कसा कुणाला ऐकू येणार? "आवाज ,आवाज " असे ससा ओरडला.नंतर नाचत , ठुमकत मोर आला. मोराचे नृत्य बघायला मिळणार म्हणून

सर्वांना खूप आनंद झाला. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

   मोर स्वागताने खूप खूष झाला .आकाशात काळे ढग जमलेलेच होते. मोराने डौलात आपला पिसारा फुलवून नाच सुरु केला सर्वांनी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट करुन "वन्स मोअर" दिला.

  पुन्हा मोराने डौलात पिसारा फुलवून बहारदार नृत्य केले. सर्वांनी मोराचे  कौतुक करुन ,त्याला भरपूर शाबासकी दिली अशा त-हेने हत्तीने ठरवलेली नाचगाण्याची मैफल चांगली झाली.


Rate this content
Log in