komal dagade.

Others

4.1  

komal dagade.

Others

सासूबाई बोलताना जरा जपून...

सासूबाई बोलताना जरा जपून...

3 mins
426


           सुलभा आणि मयंकच नुकतच लग्न झालं. लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. नव्या नवलाईचे दिवस सरून सुलभा संसारात रमू लागली. सासूबाई तिच्या तशा घमंडीच होत्या. प्रॉपर्टीचा त्यांना जरा जास्तच गर्व. सुलभा मध्यम कुटुंबातील मुलगी. आईवडिलांनेही तिच्याकरिता काही कमी केले नव्हते. सासरच्या लोकांच्या सगळ्या अटी मान्य करून तिचं लग्न लावून दिलं.


सुलभा मयंकच प्रेम दिवेसेंदिवस बहरत होतं. त्यात सुलभाने आनंदाची गोड बातमी काही महिन्यातच मयंकला दिली. त्याच्या आनंदाला तर पारावर उरला नाही. घरातील काम करून प्रेग्नन्सीमध्ये सुलभा थकून जात. सासूच्या धाकाने मात्र सुलभा नेटाने काम ओढत होती. दुपारी आराम केला तर सासूबाई टोमणे मारत.आम्ही नाही बाई एवढा आव चा बाव केला कधी. आम्हाला ही झाली पोरं....!त्यांच्या बोलण्याने तर तिने दुपारचं झोपणं सोडून दिलं.


प्रेग्नन्सीमुळे सुलभाची अन्नावरची वासनाच उडाली. जेवणाचा वास जरी आला तरी तिला मळमळ होतं होती. त्यामुळे केलेला स्वयंपाक तिचा तसाच शिल्लक राहू लागला. त्यावरूनही सासूबाईंचे तिला जास्तीचेच टोमणे मिळू लागले. होणारी मळमळ गरगर तिला सहन होतं नव्हती. सारखं पडून राहू वाटत. पण समजून घेणारी कसली ती सासू....? नुसता टोमण्यांचा भडीमार नको म्हणून नाईलाजाने दिवस ढकलत होती.


घरात काही नको ते तिला खायला होतं. पण तिला खायची इच्छा होतं नसे. अक्षरशः तिला सुरुवातीच्या महिन्यात ती जेवणच करत नव्हती. केलं तरी उलटी होऊन सगळं बाहेर येत. त्यामुळे ती फळ थोडीफार प्रमाणात खात असे. त्यात तिचं वजन खूप कमी झालं होतं. शरीरात अन्न न टिकल्याने.


एकदा तिला डाळिंब खाण्याची इच्छा झाली, तिने डाळिंब सोलले आणि खायला सुरुवात केली पण तिला तेही जायना झालं. तिने दोन तीन घास खाऊन तसंच डाळिंब फ्रीझमध्ये ठेवून दिलं. दुसऱ्या दिवस सासूबाईंना फ्रिज उघताच ते डाळिंब दिसलें. सुलभा ये सुलभा त्यांच्या हाकेवर हाक सुरु झाली. सुलभा धावतच आली,"अग हे काय....!तुला एवढंही डाळिंब जास्त झालं का...? "का इथं मिळतंय म्हणून माज आला....!


सासूबाईंचं बोलणं सुलभाच्या हृदयाच्या आरपार गेलं. त्यांची बोलण्याची पद्धत पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. आज मयंकने स्वतःच्या आईचं बोलणं कानाने ऐकलं जो कितीही सुलभाने सांगितलं तरी दुर्लक्षित करत असे. त्यालाही बायकोचा केलेला अपमान सहन झाला नाही.


सुलभा सासूच बोलणं ऐकून तिच्या रूममध्ये रडत बसली होती.


मयंक, "आई तुला समजते का...? तू कशी बोलीस सुलभाशी. डॉक्टरांनी काल झालेल्या चेकअप मध्ये सांगितलं तिचं वजन खूप कमी झालं आहे. तिला भरपूर आराम म्हणजे बेडरेस्ट सांगितली आहे . तिला मी माहेरी सोडतो असं म्हणालो, तर तिच मला म्हणाली" आईंच्या मणका दुःखीमुळे आईंना एवढं काम होणार नाही, म्हणून ती माहेरी गेली पण नाही.


किती विचार करते तुझा...!तू तिला सारखं टोमणे मारत असतीस. काय कमी केलं तिने तुझ्यासाठी माझ्यासाठी या घरातील लोकांसाठी तरीही तुझं तोंड चालूच असतं. तुझी लेकच असती तर असं वागली असतेस का...?तुझ्या लेकीबरोबर असं कोणी वागलं असतं तर....! तरीही सुलभा सगळं प्रतिउत्तर न करता सगळं सहन करते.


हे डाळिंब जर तिला जातच नसेल तर ती खाणार कशी...? दोन दिवस झालं ती जेवत पण नाही. या वेळी आपण तिची काळजी घेतली पाहिजे तर तू तिच्याकडूनच अपेक्षा करतेस.....?


एवढं बोलून मयंक रागाने निघून गेला, फटकळ तोंडाने खूप तिला दुखावल्याचा त्यांना पच्छातापही होतं होता. आज त्यांनी तिच्यासाठी गोड शिरा तुपातला बनवला त्यात वेलची पूड, काजू, बदाम, केशर घालून तिच्यासाठी गरमागरम घेऊन तिच्या रूममध्ये गेल्या.


सुलभाला त्यांना बघताच धडकीच भरली ती उठून बसली. अग बस हे बघ तुला जेवण जात नाही ना म्हणून तुझ्यासाठी शिरा घेऊन आलेय. तुला काम होतं नाही तर मी करत जाईन. दगदग करू नकोस. माझं चुकलं तुला खूप बोलले.पण मनावर घेऊ नकोस. या दिवसात स्वतःच्या हातून केलेलं खाऊ वाटत नाही. मी करत जाईन तुझ्यासाठी...! तुला काय जे खाऊ वाटेल ते मला सांग. सासूबाईंचं बोलणं ऐकून सुलभाच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या बोलण्याने तिला भरून आलं. ती त्यांच्या कुशीत रडू लागली. सासूबाई कशा असल्या तरी तिने मनापासून त्यांना लग्नानंतर आई मानलं होतं आणि माफही केलं होतं.


सुलभाला रूममध्ये मयंकच सगळं बोलणं ऐकू गेलं होतं. एवढं प्रेम करणारा नवरा मिळाल्याने ती खुश झाली होती. असच आयुष्यभर प्रेमाच्या गोडीची घडी राहू दे देवा...!अशी देवाला मनोमन विनवणी तिने केली. देवाचे मनोमन आभारही मानले.


कधी कधी नात्यामध्ये अपशब्द बोलण्याने दुरावा निर्माण होतो, आणि कधी तो दुरावा मिटवता येत नाही. नात्यामध्ये अंतर पडण्याचे हेच कारण आहे. माराचे वळ मिटतात, पण शब्द काळजात घुसले जातात.त्यामुळे बोलताना पुढच्याच्या मनाचा विचार करून बोलायला हवं. नात्याला तडा जाणार नाही.



Rate this content
Log in