सारीपाट / लग्न
सारीपाट / लग्न
जीवनाचा सारीपाट म्हणतात तो हाच का प्रत्येकाला सारीपाट खेळण्याची हौस असते व जिज्ञासा देखील...सारीपाट केव्हा एकदा खेळतो असे ज्याला त्याला वाटत असते हीच यदृच्छा. लग्न वेदी वर चढणे म्हणजे गृहस्थाश्रम स्वीकारून सारीपाट खेळणे
हार जीत कुणाची ही होवो संसार सारीपाट असाच असतो. त्या शिवाय मुक्ती नाही
मुक्ती मिळाल्या शिवाय व्यक्त होता येत नाही. व्यक्त होणे मानवी स्वभाव धर्म च त्याशिवाय विश्व दर्शन होत नाही.
सारीपाट कोणी कसा खेळावा हा
निपुणतेचा भाग सोंगट्या फेकणे म्हणजे सारीपाट नव्हे तसे दान मिळवणे क्रम प्राप्त आहे. प्रत्येक खेळीमागे तुमचा कस तर लागतोच शिवाय प्रारब्ध... प्रारब्ध हे संचिता वर अवलंबून असते, पण नियतीचे तसे नाही तिने लिहून ठेवलेल्या मार्गाने जावे लागते आपला जोडीदार कोण असावा, कुठला असावा कसा असावा हे सर्व नियतीच्या तर मनात असते. पण काहीही असले तरी जीवनमार्ग चालत असतो, जोडीदार हा पाहिजेच अखंड पणे त्याच्याशी सारीपाट खेळावे लागते. नन्तर येतात ते सर्व नातेवाईक दोन्ही घरांचे मनोमिलन म्हणजे च लग्न संस्कार 16 संस्कारा तील महत्वाचा संस्कार. जो ज्ञानदीप पेटवून प्रकाशमान पंथ दावतो,
सर्व नाती गोती सांभाळून आपले व भामिनी चे पाहणे म्हणजेच सारीपाट त्यात रुसवा फुगवा राग असे षड्रिपु ना जवळ ठेवून जगणे षड्रिपु ना वर्ज्य कराल तर ती विरक्ती होईल वैराग्य लाभेल तसे न करता जीवन रुचकर होण्यासाठी षड्रिपु पाहिजेतच.
पुत्र प्राप्ती होणे त्यांचे संगोपन करणे यथायोग्य ज्ञान देणे व लग्न वेदीवर चढण्यास योग्य करणे असा हा जीवन क्रम सतत अव्याहत पणे चालु च आहे
म्हणूनच गृहलक्ष्मी ला अन्नपूर्णा म्हटले आहे
अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्रिय वल्लभे
ज्ञान वैराग्य सिद्धर्थ म भिक्षा
देही च पार्वती
ज्ञान वैराग्य मिळण्या साठी सर्व प्रकार ची भिक्षा दे असे म्हणणें हाच सारीपाट वरचा डाव आहे. अनादी अनंत काळ पासुन हा सारीपाट अव्याहतपणे चालु आहे चालु राहील. हाच सृजनशील सृष्टीचा नियम आहे
तुर्त इथेच थांबतो व आपली रजा घेतो.