सारी जिंदगी तुला जपणार आहे
सारी जिंदगी तुला जपणार आहे


रश्मी काय ग आज काय प्लॅन तुझा? व्हॅलेंटाईन डे आहे ना आज मग खास काहीतरी असेल च की ग. अग काही काय..तुला माहितीच आहे हे असं एक दिवस प्रेमाचा साजरा करणे वगैरे मला पसंद नाही आणि काही खास प्लॅन माझा असेल का तरी...मला कस विचारू शकतेस.
रश्मी एकच दिवस प्रेमाचा असावा वगैरे या मतांची मी पण नाही ग पण तरीही एकमेकांच्या प्रेमापोटी हा दिवस साजरा करायला काय हरकत आहे.. तसंही रोजच्या या धकाधकीच्या जीवनातून एकमेकांची तोंडही बघायला वेळ मिळत नाही मग यादिवशी वेळ काढून करावं एन्जॉय.. आयुष्यात उद्या कोणी पाहिलाय म्हणून सगळे दिवस,सण आनंदाने साजरे करायचे हे माझं मत म्हणून मी तर जाणार आज लवकर घरी. राहिला तुझा प्रश्न तर तू का नाहीस करू शकत व्हॅलेंटाईन डे सेलिब्रिट. तुझं आणि सुमितच लग्न कोणत्या परिस्थितीत झालं ते माहितीये मला..पण अग वर्ष झालं तुमच्या लग्नाला तुम्ही अजून किती दिवस अस फक्त कर्तव्य म्हणून नवरा बायकोचं नात निभावणार आहात... वर्षभरापूर्वी तुझी ताई अडीच वर्षाच्या पिहुला तुझ्या कुशीत सोडून कायमची निघून गेली. पिहुला तुझा लळा खूप..तू मावशी नसून आईच होतीस तिची..कोणी दुसरी व्यक्ती तिच्या आईची जागा घेणं आणि तिला तेवढं जीवापाड प्रेम करणं अशक्यच म्हणून तिच्यावरच्या प्रेमापोटी तू सुमितशी लग्न केलंस..त्याची बायको झालीस आणि मावशी वरून पिहुची हक्काची आई झालीस. त्या दिवसापासून तुम्ही दोघे पिहुचे उत्तम आई वडील तर झालात ग पण नवरा बायको..आयुष्याचे जोडीदार नाही होऊ शकला. हे नातं एक कर्तव्य म्हणूनच जगवत आलात. पण ते नात जपतानाच तुम्ही दोघही एकमेकांवर प्रेम करू लागलाय हे तुम्हालाच समजत नाही....तो चार दिवस तरी कामासाठी बाहेर गेला तर तुझं चित्त नसतं थाऱ्यावर..दिवसातून तीन चार वेळा त्याला फोन करून जेवला का, काही खाल्लं का, तब्येत बरी आहे ना असं विचारत असतेस. कधी त्याचा फोन आला नाही किंवा त्याचा फोन लागला नाही तरी तू बैचेन होतेस. दिवसातून कितीतरी वेळा माझ्यासमोर त्याच्या नावाचा जप करत असतेस. त्याच सोबत असणं, त्याचा सहवास खरंतर तुला हवाहवासा वाटतो पण तुम्ही तुमच्याच नात्याला काही सीमारेषा आखून ठेवल्यात त्यापलीकडे जायची भीती तुझ्या मनात असते. त्याच्या आवडी निवडी जपणं, त्याची काळजी घेण,आतुरतेने त्याची वाट बघणं यालाच प्रेम म्हणतात ग राणी..आज जे मनात आहे ते ओठांवर येऊदे. तुझा अपघात झाल्यावर पूर्ण एक दिवस तू बेशुद्ध अवस्थेत होतीस..तेव्हा सुमितच्या जीवाची होणारी घालमेल मी पाहिली होती..सारख्या डॉक्टरकडे येरझाऱ्या घालत होता..काही क्षण तुझा हात हातात घेऊनही बसला होता. फक्त पिहुसाठीच नाहीतर त्यावेळी त्याच्यासाठीही तू शुद्धीवर यावीस म्हणून प्रार्थना करत होता..डोळ्यातले अश्रू त्याने लपवले असतील पण मनातून तो खूप रडत होता. त्याचवेळी तुझ्यावरच त्याच्या डोळ्यात असलेलं प्रेम मी वाचलं होतं रश्मी..तो नाही व्यक्त होत तर तू व्यक्त हो आज..कर्तव्यापलीकडचं तुमचं प्रेमाचं नात सुरू करा. हि अव्यक्त रूपातली गोड प्रेमकथा व्यक्त रुपात येऊ द्या.
नेहाच्या पोटडकीच्या बोलण्याचा रश्मीवर परिणाम होतो आणि आज सुमितला प्रेमाची कबुली द्यायचीच असं ठरवून ती घरी जाताना छानस ग्रिटींग घेऊन जाते. घराचा दरवाजा उघडताच तिला अंधार दिसतो...अजून लाईट लावली नसेल अस म्हणत ती लाईटच बटण दाबते..लाईट लावताच तिला समोरच्या वॉल वर तिचे फोटो लावलेले दिसले..हार्ट शेपच्या फ्रेम मध्ये तिचा आणि सुमितचा लग्नातला फोटो..चारी बाजूला रेड कलरचे फुगे..टेबल वर छोटासा केक..बाजूला एक गिफ्टही ठेवलेलं दिसलं. रश्मी सगळं पाहून आश्चर्यचकित होते..सुमित तर हे करणं शक्य नाही मग कोणी केलं असेल..ती पिहुला हाक मारते तशी पिहु पळत येऊन मिठी मारते आणि हातात एक ग्रिटींग देऊन "हॅपी व्हॅलेंटाईन डे आई" तिच्या गोड आवाजात म्हणते. रश्मीसाठी हा सुखद धक्का असतो...पिहुने स्वतःच्या हाताने हार्ट काढून रंगवलेल ग्रिटींग असत ते.."माझी आणि माझ्या पापांची रोज काळजी करणाऱ्या आणि घेणाऱ्या माझ्या गोड आईस व्हॅलेंटाईनच्या हार्दिक शुभेच्छा" हे वाचून रश्मीचे डोळे पाण्याने भरतात. तिचे आनंदाश्रू पुसायला एक हात समोर येतो तो हात सुमितचा असतो..हे पाहून तर ती अजून सुखावते. रश्मी समोर गुढघ्यांवर बसून हातातला गुलाबाचा बुके तिला देत म्हणतो, काटेरी आयुष्यात माझा गुलाब तू प्रेमाच्या पाकळ्यांत बहरलेला माझा सुगंध तू गुंतलेल्या मनापासून सात जन्मांपर्यंत हृदयात मोहरणारा प्रेमरंग तू रश्मी तू पिहुची आई म्हणून या घरात अन माझ्या आयुष्यात आलीस..माझ्या संकटाच्या काळात तुझा स्वार्थ विसरून आम्हाला सावरायला आलीस... पण तुझ्या प्रेमळ स्वभावाने, आपुलकीने, काळजीने माझ्या हृदयात कधी घर केलंस कळलंच नाही. खूपदा प्रयत्न केला तुझ्यावर माझं प्रेम आहे हे सांगण्याचा पण भीती वाटायची तुलाही असच वाटत असेल का..तुला हे आवडेल का...पण आज प्रेमाचाही दिवस आहे असं सगळं म्हणतात म्हणून निर्धार केला की मनातलं बोलून मोकळं व्हावं..व्यक्त करावं प्रेम...सात जन्मांसाठी तुझी नी माझी रेशीमगाठ बांधावी... I love you रश्मी..मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. रश्मीला अनपेक्षितपणे मिळालेले सुखद धक्के खूपच सुखावून जातात...भरल्या डोळ्यांनी ती बॅगमधून सुमितसाठी आणलेलं ग्रिटींग त्याला देते..सुमितही खूप खुश होऊन तिला मिठीत घेतो..पिहुही आनंदाने दोघांना बिलगते. ............... खऱ्या प्रेमाला तशी एका खास दिवसाची गरज नसतेच पण ते प्रेम वेळेवर व्यक्त होणंही गरजेचं असतं नाही का..मग दिवस कोणताही असो ते महत्वाचं नाही पण प्रेमाची कबुली देणं आणि प्रेम निभावणं, जपणं महत्वाचं. कथा आवडल्यास नक्की लाईक,कंमेंट्स करा आणि शेअर करा फक्त नावासहितच