सांजवात.....
सांजवात.....
संध्याकाळचे सात वाजत आले होतें. तिन्हीसांज ची वेळ. मीनाताई आज तिन्ही सांजला दिवावात लावत होत्या. चाळीस वर्षाच्या संसारात त्यांनी खूप काही अनुभवलं होत. इनामदारांच्या घरात सून होऊन आलेल्या मीनाताईनी खूप सुख- दुःखाचा चढउतार अनुभवलेला होता, त्यात मोहनरावांची मिळालेली अर्धवट साथ पण खूप प्रेम करणारे मोहनराव कधीही न विसरता येणारे. एका मुलाच्या आधारावर जगत होत्या त्या. मुलगा ही चांगला शिकला स्वतःच्या पायावर उभा राहिला, त्याने लव्हमॅरेज केले, सून मेघना मनमिळाऊ मिळाली. मीनाताईना जीव लावणारी होती. सासूने एकटेपणाने जगलेले आयुष्य तिला माहित होतं. त्यामुळे सासूबाईंना नेहमी खुश ठेवण्याचा तिचा प्रयत्न असायचा. त्यांना हवंनको ते त्यांना करून खायला घालायची. एवढेच काही तर नवरा बायको फिरायला जातानाही त्यांना ही थोडासा बदल म्हणून घेऊन जायची. मेघनालाही आईची कधीही आठवन न यावी असच त्याही तिच्यावर मुलीसारखं प्रेम करत होत्या . मेघनाच्या पोटी पहिला मुलगाच जन्माला येतो.
मुलगा, सून आणि त्यांचा छोटा मुलगा असा आनंदी परिवार होता त्यांचा , पण नियतिला दुसर काहीतरी मंजूर होत.अपघातात मुलगा सून दोघांना मीनाताई पासून हिरावून घेतलं.
मीनाताईवर छोट्या सुनील ची जवाबदारी येऊन पडलेली होती . बिना आईबापच पोर म्हणून त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या . त्याच्यासाठी आवडीचे जेवण छान पदार्थ करून खायला घालत होत्या . शिक्षणासाठी कसलीही कमी केली नाही. हातांच्या फोडासारखं सुनील ला जपलेलं असतं. आईवडिलांची कमी कधी त्याला भासून दिलेली नाही.
सुनील चांगलं शिक्षण घेऊन परदेशीं निघून गेला . सुनील जाताना आजीच्या पाया पडला.मीनाताईना खूप रडायला येत,पण त्या अश्रूना दाबत सुनील ला निरोप देतात. मुलगा नाराज होऊन जाऊ नये म्हणून आपले अश्रू अडवतात .
हे सर्व त्यांच्या डोळ्यासमोर आज तिन्ही सांज येत आणि नकळत डोळ्यातून अश्रू टपकतात. डोळ्यात तेल घालून सुनील ची वाट बघत असतात. आज ना उद्या सुनील येईल.
सुनील मधून कधीतरी फोन करत असतो. पैसे पाठवलेकी मेसेज ही करत असतो. त्याच्या फोन आणि मेसेज ने त्या खूप सुखावतात. चातकासारखी त्याची आता घरी येण्याची वाट पाहत असतात. एक दिवस सुनील चा फोन येतो, आजी मी एका मुलीशी लग्न केलंय दिसायला खूप छान आहे. तुलाही आवडेल ती.... !
मीनाताई सुनील च ऐकून त्याच्यासमोर खूप खुश होतात. त्याच्या खुशीत स्वतःची ख़ुशी मानतात, पण आतमधून त्यांना खूप वाईट वाटत. आईवडिलाप्रमाणे मीनाताई नी सांभाळ करून त्यांना साधं लग्न करताना विचारलंही नसत. याचं त्यांना खूप दुःख होतं.
मीनाताई त्याला काही न बोलता," सुनेला लवकर घेऊन ये....! तिला पाहिचय मला. तुला ही किती दिवस भेटले नाही. त्यांना गहिवरून आलेलं असतं पण रडू आवरून त्या फोन ठेवून देतात.
सून मुलगा येणार म्हणून त्या खूप खुश असतात त्यांना गोडधोड पदार्थ बनवून ठेवतात. त्यांचं सारखं दाराकडे लक्ष सुनील येईल आणि दार वाजेल.
एक दिवस "आजी ए आजी कोठे आहेस तू....? हे बघ मी आलोय तुला भेटायला....! "तुझा सुनील, " हे बघ तुझी सून ही आली आहे कोठे आहेस तू... !
आणि समोर बघतो तर आजी वाट बघून तिच्या आयुष्याच्या शेवटच्या वाटचालीकडे अनंतात विलीन झालेली असते. देवाचं तिला बोलावणं आलं असतं तेही तिन्हीसांज च्या वेळेला तिने जगाला निरोप दिलेला असतो .... !
