Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

रुदाली

रुदाली

1 min
90


मोले घातले रडाया

नाही आसू आणि माया


ही पण एक पारंपरिक म्हण आहे, आणि याचा संबंध राजस्थान मधील रुडाली या प्रथेशी असावा असे मला वाटते. 

तिकडे मयतावरती रडण्यासाठी भाड्याने स्त्रिया मिळतात ,आणि त्या मोठ्या मोठ्याने ओरडा आरडा करत छाती बडवून बडवून रडतात .

पण त्यात अश्रू आणि माया नसते. सगळा कोरडा व्यापार असतो. 


तसेच बऱ्याच वेळा तुम्ही संकटात, दुःखात, असताना काही लोक तुम्हाला अगदी खूप सहानुभूती कळवळा दाखवतात, पण तो खरा नसतो. 

एखादा कर्जबाजारी माणूस जेव्हा कोसळून गेलेला असतो तेव्हा त्याला वर सहानभूती दाखवण्यापेक्षा थोड्याफार आर्थिक मदतीची गरज असते किमान खारोटीचा वाटा तरी उचलावा असाही या म्हणीचा अर्थ आहे. 


 शेवटी आप्ताकडून येणारे अश्रू आणि कळवळा आणि मोलाने रडणाऱ्या रुडाली, यामध्ये फरक असतोच ना! म्हणूनच म्हटले आहे

" मोले घातले रडाया

 नाही आसू आणि माया"


Rate this content
Log in