शुभांगी कोतवाल

Children Stories Fantasy

4.5  

शुभांगी कोतवाल

Children Stories Fantasy

रानातली सभा

रानातली सभा

5 mins
751


  किती सुंदर असतं जंगल , अगदीं मोकळं आणि मुक्त . जिथे पाहावं तिथे नुसती हिरवळ . प्रदूषण रहित , नैसर्गिक आणि जणू ते पक्षी आणि प्राण्यांच घरच नाही का ?? 

असच एक जंगल मी पाहिलं होतं लहानपणी . किती कतुहल असतं न आणि एक निखळ निरागसता. घरात कुणाला न सांगता बालपणच्या मित्रमैत्रिनीं बरोबर जंगलात सहज एक फेरफटका मारून यायची गंमत असायची नाही का ? 

आणि मग घरातल्या मोठ्यांना कळलं तर त्यांचं ऐकून घ्यायचं मुकाट्यानी . कारण त्यांची काळजी , त्यांची माया जाणवत होती . जंगल म्हणजे तिथे हिंस्त्र प्राणी , शुकशुकाट हा असणारच . पण ह्या जंगलात हिंस्त्र प्राणी जसे वाघ , सिंह नव्हते .

असच एकदा जंगलात फेरफटका मारायला निघालो होतो आम्ही . दुपारचं उन्ह थोडं कमी झालं आणि आम्ही निघालो रस्त्यात काहीतरी खायला चणेफुटाणे, चॉकलेट्स आणि प्यायला पाणी घेवून निघालो . सगळ्यांनी ठरवलं की पटपट चालायचं कारण अंधार आणि सूर्यास्ताच्या आधी परतायला पाहिजे .

रस्त्यात जमिनीवर पसरलेले काही वेल आणि सुंदर केशरी , जांभळी फुलं दिसली जी कधी आपल्या बागेत उगवत नाही. रानटी फुलं पन किती मनमोहक ! माझ्यासारख्या नाजूक मनाच्या मुली ते पटकन तोडून घेतल्याशिवाय राहणार नाही . 

असच गाणी गात, गप्पा मारत आम्ही पुढे चालत होतो . आणि आम्ही काय पाहिलं की एका उंच मोठ्या झाडाखाली प्राण्यांची चक्क सभा भरली होती. काही पक्षी पण त्यांच्यात सामील झाले होते . आम्ही ठरवलं की झाडाच्या मागे उभे राहून त्यांच्या नकळत आपण ऐकावं त्यांचं संभाषण .

तिथे होता ससा , हरीण , कुत्रा , मांजर , लांडगा , सांबर , वानर , कासव , मोर , लांडोर , कबुतर , कोकिळा , पोपट , कावळा आणि अन्य छोट्या चिमण्या . 

आजच्या सभेचा विषय होता प्रत्येकानी आपल्या चांगुलपणा बद्दल आणि सुंदरतेच वर्णन करायचं आणि सगळे मिळून ठरवणार होते की कोण श्रेष्ठ . 

1. ससा ~ सुरुवात झाली सश्या पासून . ससा म्हणे मी किती स्वच्छ पांढऱ्या रंगाचा आणि गुबगुबीत दिसतो . सगळ्यांना आवडणारा, सुंदर डोळ्यांचा, अनुपद्रवी आहे. मला हिरवगार ताजं गवत सुध्दा चालतं माझं पोट भरायला.

2. हरीण ~ मी खूप जोरात दौडू शकतो , दिसायला पण सुंदर . माता सिता पण माझ्या रूपाला मोहित झाली होती . मी सुद्धा कळपात राहतो आणि अनुपद्रवि आहे .

3. कुत्रा ~ मी छोट्या प्राण्यांना खातो पण ते फक्त मला काही जेवण मिळालं नाही तरच कारण माझी भूक भागवायला मला त्यांना खाणे भाग आहे . पण मी चांगला मित्र आणि विश्वासू प्राणी आहे म्हणूनच तर माणसं मला त्यांच्या घरात त्यांच्या सुरक्षेसाठी आणि सोबती म्हणून घेवून जातात .

4. मांजर ~ मी पण सशासारखी गुबगुबीत आणि चतुर आहे . माझे डोळे चमकतात आणि खूप सुंदर दिसतात . मला जर दूध दुपतं खायला मिळालं तर मी कोणाच्या वाटेला जात नाही . 

5. लांडगा ~ मी अतिशय चंचल असल्यामुळे खूप जोरात दवडू शकतो . मला लबाड आणि ढोंगी म्हणतात माणसं , पण मी जंगलात राहतो आणि कधी माणसांच्या वस्तीत जात नाही . मी पण दिसायला तसा बऱ्यापैकी सुंदर आहे .

6. सांबर ~ मी तसा दिसायला आणि आकाराने हरीणच म्हणा पण माझ्या डोक्यावर जी शिंग आहेत ती दुसऱ्या हिंस्र पशुंपासून माझे रक्षण करण्यासाठी , आणि त्या शिंगामुळे मी दिमाखदार दिसतो. माझ्या शिंगांचा माणूस औषध म्हणून वापर करतात.

7. वानर ~ मी जमिनीवर पण राहू शकतो व झाडांवर सुद्धा चढून माझ्या भुकेसाठी फळं - पानं तोडून घेवू शकतो . मी बऱ्यापैकी बुद्धिमान म्हंटला जातो . मी कोणी प्राण्यांवर व मनुष्यावर वार करत नाही , पण जर मला कोणी चिडवल किंवा त्रास दिला तरच मी झेप घालतो . प्रभू श्रीराम माझे खूप आवडते म्हणून मी त्यांची खूप मदत केली. 

8. कासव ~ मी सुध्दा जमिनीवर आणि पाण्यामध्ये राहू शकतो . माझी चाल जरी हळू असली तरी मी निरंतर चालून माझं लक्ष गाठू शकतो . मला खूप आयुष्य दिलं आहे देवानी . लहान मुलांना माझं खूप कुतूहल वाटतं . 

9. मोर ~ मी तर सर्व पक्षांमध्ये अतिशय सुंदर असणारा नर पक्षी . मी माझा रंगीत पिसारा फुलवून खूप नाचतो व सर्वांचे मनोरंजन करतो . पावसाळा माझा सर्वात आवडता ऋतू आणि म्हणूनच मी आनंदानी साद घालतो आणि सर्वांना पावसाची सूचना देतो . 

10 . लांडोर ~ जरी मी सुंदर नसले तरी माझा जोडीदार नर पक्षी मोर खूप सुंदर असल्याचा मला अभिमान वाटतो . आमची जोडी खूप अनोखी आहे आणि म्हणूनच त्याचं महत्त्व आहे . 

11. कबुतर ~ मी तर सर्व दिशांचा जाणकार व एक बुद्धिमान पक्षी आहे . म्हणूनच मला राजा महाराजा संदेशवाहक म्हणून ठेवत असत . पण कालांतराने राजा महाराजा पण राहिले नाही आणि पोस्ट , इमेल , टेलिफोन याच्यामुळे आता मी अगदी रिकामा झालो . काही कामच उरलं नाही . 

12. कोकिळा ~ माझा रंग जरी काळा असला तरी देवांनी मला सुंदर आवाज दिला आहे . मला सकाळची वेळ खुप आवडते . जेव्हा आंब्याच्या झाडाला मोहर येतो तेव्हा त्या झाडाच्या फांदीवर बसून मी कुहू.... कुहु....असा आवाज देते तेव्हा सगळे खूप खुश होतात . चांगल्या गवयांना माझी उपमा दिली जाते . 

13 . पोपट ~ मी खूप सुंदर दिसतो माझ्या रंगाला नाव मिळालं आहे , पोपटी. माझी चोच लालचुटुक रंगाची असल्यामुळे मी खूप छान दिसतो. पण जेव्हा माणूस मला घरी घेवून जाऊन पिंजऱ्यात बंद करून ठेवतात तेव्हा मी खूप निराश होतो . मला  सर्वांची , जंगलातील मोकळ्या वातावरणाची खूप आठवण येते . मी शीळ वाजवून , मला शिकवतील तसं बोलण्याचा मी प्रयत्न करतो .

14. कावळा ~ मला पण देवांनी काळा रंग दिला असल्यामुळे मी कोणाला आवडत नाही . मी घरांच्या भिंतीवर बसून काव ....काव .... असं ओरडुन कुणीतरी पाहुणा येण्याची सूचना देतो . माझं सुध्दा एक वेगळंच महत्त्व आहे .पितृपक्षात तर माझी सगळे आतुरतेने वाट बघत असतात .

15. छोट्या रंगीत चिमण्या ~ आम्ही जरी आकाराने लहान असलो तरी आम्ही खूप उद्यमी आहोत . आमच्या कुटुंबाचं आम्ही चांगल लक्ष ठेवतो . दिवसभर वाळक्या काड्या , गवत एकत्र करून आम्ही आमच्या पीलांसाठी अतिशय कलात्मक असं घरटं बांधतो . आमच्यात खूप वेगवेगळ्या मनमोहक रंगाच्या चिमण्या पाहायला मिळतात . 


सर्वांचं आपापल्या सौंदर्याबद्दल , गुणांबद्दल बोलून झाल्यावर आता त्यांना प्रश्न पडतो , कोण ठरवणार आपल्यात श्रेष्ठ कोण ते ? कुणाला नाराज नव्हतं करायचं त्यांना . सर्व जण एकमेकांकडे बघत होते पण कोणीच काही बोललं नाही .

आता आम्ही ठरवलं की आपण झाडाच्या मागून बाहेर येवून बोलावं . आम्हाला पाहून ते थोडे चकित झाले आणि विचारात पडले . आम्ही त्यांना आश्वासन दिलं की आम्ही काही शिकारी वगैरे नाहिओत . आम्ही त्यांचं संभाषण ऐकलं आहे आणि फक्त त्यांची मदत करायला आलो . तेव्हा ते आश्र्वस्त झाले .

आम्ही म्हणालो तुम्ही सगळेच आपापल्यापरीने खूप सुंदर आहात . आम्हाला खूप आवडतात तुम्ही सगळे . तुमच्यामुळे निसर्गाची सुंदरता वाढते . त्यामुळे कुणीही कमी किंवा जास्त असं नाहीये . प्रत्येक जण श्रेष्ठ आहे . असच एकमेकांच्या सोबतीने आणि मिळूनमिसळून राहून जंगलातील उपद्रवी प्राण्यांपासून एकमेकांच संरक्षण करा .आणि आम्ही तुमचे मित्रच आहोत . सर्व पशुपक्षी खूप खुश झाले आमचं म्हणणं ऐकून . आणि एकमेकांचा निरोप घेवून आपापल्या ठिकाणी जायला निघाले . 

  आईनी मला अलगद हाक देवून उठवलं , " बाळा उठतेस न , बघ उन्हं आली तुला उठायला उशीर झालाय आज . मी आईच्या हाकेने उठून आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाले , " मी तर चक्क स्वप्न पहात होते . किती छान स्वप्न . " 



Rate this content
Log in