प्रयत्नांती परमेश्वर
प्रयत्नांती परमेश्वर
प्रयत्नांती परमेश्वर...
प्रयत्न वाळूचे मनोरा कडे तात तेलही गळे या उक्तीप्रमाणे --
आपले प्रयत्न करत राहणे हे आपले कार्य सिद्धिस नेणे. प्रयत्न यशस्वी होवोत अथवा यशस्वी होवोत आपल्या कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो पण कार्य आणि कर्तव्य हे चुकले नाही पाहिजे हे केलेच पाहिजे. आपल्या कार्यात कामचुकार पण अजिबात नको.जेव्हा माणसाच्या योग्यतेचा आणि हेतूचा योग्यता प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात हे काळ्या दगडा वरची रेघ आहे.
म्हणून नावासाठी कार्य करू नये तर आपले प्रयत्न यशस्वी करून दाखवावे व आपण समाजात नाव कमावून दाखवावे.
आपोआप आपल्या समाजात आपले एक स्थान निर्माण होते.
ज्याप्रमाणे मोगरा कितीही दूर असला तरी सुगंध पसरतो तसे आपल्या कार्याची प्रचिती आल्यानंतर आपोआप आपल्याला मानसन्मान मिळतोच. अशा माणसांची आठवण निश्चितच काढली जाते.
वसुधा वैभव नाईक, पुणे
