Priya Bhambure

Others

3  

Priya Bhambure

Others

पर्यावरणविषय़ी निसर्ग

पर्यावरणविषय़ी निसर्ग

2 mins
242


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती

येणे सुखे रचे एकांताचा वास,नाही गुण दोष अंगा येत .

आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी

कंथा कुमंडलु देहउपचारा जाणवितो वारा अवसरू

हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेवू रुची

तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाचि वाद आपणांसी. 


तुकारामांनी म्हटल्यानुसार ह्या अभंगामध्ये वनामध्ये असणार-‍या निरनिराळ्या प्रकारच्या वृक्ष आणिवेली,तेथे राहणारेप्राणी,आपल्या गोड आवाजाने देवाला हाक मारणारे पक्षी,हे सर्व आमचे सोयरे झाले आहेत. यांच्या सानिध्यामुळे येथील एकांतवास फार सुखकारक झाला आहे.येथे कुठलाही गुणदोष अंगाला लागत नाही.पृथ्वी हेराहण्याचे स्थान असून डोक्यावर असणारे आकाश मंडपाप्रमाणे आहे.आमचे मन रमेल,प्रसन्न राहील तेथेच आम्हीखेळत राहू.देहाला लागणारे जाडेभरडे कापड आणि पाणी पाण्यासाठी कमंडलू या दोन गोष्टीच भरपूर वाटतात.वेळ किती होऊन गेला हे वारा सांगतो.येथे असणा-या भोजनाला हरिकथा म्हणून त्यांनी संबोधिले आहे.आम्ही तिचे निरनिराळे प्रकार करून ते रुचकर पदार्थ आवडीने सेवन करतो. महाराज म्हणतात,अशा एकांतात माझा माझ्या मानाशी संवाद होत असतो. स्वत:लाच आपणच प्रश्न विचारून आपणच त्याचे उत्तर द्यावे,अशा त-हेचा वादविवाद येथे चालतो असं ह्या अभंगात त्यांनी सांगितला आहे.


खरंच निसर्गाच्या सान्निध्यात असल्यावर मनुष्य खूप समाधानी आणि आनंदी असतो हे मात्र तितकंच खंर आहे. झाडाकडून मिळणा-या त्या असंख्य गोष्टीमुळेच आपण ह्या सगळ्याचा आनंद घेऊ शकतो हे प्रत्येक मानवाने लक्षात घेतले पाहिजे. पण, कुठेतरी मानवाला ह्या सगळ्याचा विसर पडत चालला असल्यामुळे झाडांची संख्या इमारती उभ्या करण्याच्या नादात फार प्रमाणात कमी करून टाकली आहे. सगळीकडे सिमेंटच कॉक्रीट झाल्यामुळे आपल्याला कुठे निर्सगाच्या सान्निध्यात वेळ घालवायला मिळतच नाही.पण ही झाडच राहिली नाही तर आपल्याला शुद्ध हवा श्वासाकरता मिळणार नाही. त्याचप्रमाणे पुरेश्या प्रमाणात पाऊस पडला नाही तर पिण्यास पाणी, खाण्यास अन्नधान्य मिळणार नाही. आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे आपण जगूच शकणार नाही. हे बहुतेक मानव कुठेतरी विसरत चालला आहे. ह्या असलेल्या नैसर्गिक गोष्टी अजून तरी मानवाला तयार करता आलेल्या नसल्यामुळे आपण प्रकृतीवर अवलंबून आहोत याचं भान ठेवायला हवं.


कारण, यंदाची भीषण परिस्थिती बघता आपण सगळ्यांनी किमान एक तरी झाड लावलंच पाहिजे. कारण, जेव्हा आपण त्याना जागवू तेव्हाच आपण जगू हे ध्यानात घेतलंच पाहिजे. आणि अस मग प्रत्येक एक कुटुंब म्हणून एक झाडं जेव्हा आपण लावत जावू तेव्हा आपली सृष्टी पुन्हा टवटवीत झाल्याने तो निसर्गदेखील मग आपल्याला हव्या असणा-या गोष्टी भरभरून देण्यास मागे पुढे कचरणार नाही. चला मग आजच्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपण खूप प्रमाणात झाड संकल्प करून तरी झाड लावून त्यांची सुरुवात करू या.


Rate this content
Log in