SWATI WAKTE

Others

2  

SWATI WAKTE

Others

प्रवाहाच्याविरुद्ध स्त्रिया

प्रवाहाच्याविरुद्ध स्त्रिया

2 mins
137


आपण आपला किमान 500 वर्षांपासून इतिहास बघितला तर स्त्रिया फक्त चूल आणि मूल ह्यांसाठीच त्यांचे आयुष्य आहे अशी धारणा पण तरीही काही कर्तृत्ववान स्त्रिया प्रवाहाच्या विरोधात गेल्या आणि अजरामर झाल्या.. अश्याच काही स्त्रियांची उदाहरण द्यायचे झाले तर मुक्ताबाई संत ज्ञानेश्वरांची बहीण भावंडात सर्वांत लहान असूनसुद्धा मोठया भावंडांना समजवून सांगण्यात तिचा भारी वाटा होता. तिने अनेक अभंग लिहिले. तिचे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत आणि चांगदेव तिच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी मोठे असून मुक्ताबाईचे ज्ञान पाहून नतमस्तक झाले.


त्यानंतर जिजाबाई ज्यांनी शहाजी महाराजांच्या मागे शिवाजीना स्वराज्याचे स्वप्न दाखवून संस्कार दिले आणि धीरगंभीर पणे शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. एव्हडेच नव्हे तर शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवर जात तेव्हा जिजाबाई राज्यकारभार बघत. जिजाबाईनंतर त्यांच्या नातसून म्हणजेच छत्रपती सम्भाजीच्या पत्नी येसूबाई ह्यादेखील राज्यकारभार पाहून संभाजी महाराजांना भरभक्कम साथ देत. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यानी स्वतःच्या पुत्राला राज्याभिषेक न करता राजारामाला राज्याभिषेक केला. स्वतः मुघलांच्या तावडीत राहून राजारामांना जिंजीला जाण्याचा सल्ला दिला. जिंजीला राज्यकारभार हलविल्या मुळे रायगडचे महत्व कमी होईल म्हणून त्यानी हा निर्णय घेतला जवळपास 29 वर्ष येसूबाई मुघलांच्या तावडीत होत्या.


सावित्रीबाई फुले ह्यांनी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तसेच मान हानी सहन करून कशालाही न जुमानता पहिल्या स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळवला. आनंदीबाई जोशी ह्यांनी त्यांच्या पतीच्या साथीने खुप कष्ट करून तसेच समाजाच्या प्रतरना झेलून पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान पटकवला.


ह्या सर्व स्त्रियांनी प्रवाहविरुद्ध जाऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. पण आजही असे स्त्रियांचे आयुष्य आहे जे प्रवाहाविरुद्ध न जाता दुसऱ्यांच्या आनंदासाठीच जगत असतात. लहानपणी आई बाबा म्हणतील ते करतात. लग्नानंतर पती म्हणेल ते करतात आणि म्हातारपणी मुलगा म्हणेल तेच करतात. बऱ्याच घरात अजूनही मुलींपेक्षा मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. मुलांच्या शिक्षणासाठी वाटेल तेव्हडा पैसा खर्च केल्या जातो पण मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्या जाते. मुलींना बुरसतलेल्या संस्काराच्या ओझ्याखाली दाबून टाकल्या जाते. तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न ह्यांची तिलांजली दिली जाते. कसे राहावे काय घालावे हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही बऱ्याच स्त्रियांना नसते. लग्न झाल्यावर सासू शिकवते की पतीच्या हाती सर्व त्याच्या वस्तू देत जा. त्याला आवडेल तेच पदार्थ करत जा. आणि तु शिकली असली तरी नौकरी करू नकोस नवऱ्याचा असेल तेव्हड्याच पगारात भगवं आणि घरी बसून मुलांना चांगले संस्कार दे. पण ह्या भागवाभगवीमध्ये स्त्रियांच्याच इच्छा मारल्या जातात ह्याचा कुणी विचार करत नाही.. ज्या मुलांना संस्कार देण्यासाठी आपले करिअर सोडून देते ती मुलेही मोठे झाल्यावर तिला भाव देत नाहीत.. ज्या स्त्रीया आई, बाबा, सासू सासरे, नवरा, मुले ह्यांच्या इच्छा, भावना पूर्ण करण्यात आपले आयुष्य घालवतात त्या म्हणजे समाजाच्या भाषेत संस्कारी.. आणि ज्या स्त्रिया हे सर्व बंधन झुगारून स्वतःचे अस्तित्व जपतात त्या स्त्रिया म्हणजे असंस्कारी असा ह्या बुरसटलेल्या समाजाची धारणा आहे.


पण प्रत्येक स्त्रीनी स्वतःचे अस्तित्व जपायलाच पाहिजे आणि प्रवाहाविरुद्ध जाऊन तीही एक माणूस आहे गुलाम नाही हे तिनी सर्वांना पटवून द्यायला पाहिजे.. स्वतः स्वतःची किंमत केली तरच बाकी सर्व करतील. प्रत्येक स्त्रीने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायला पाहिजे.


Rate this content
Log in