SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

पृथ्वी

पृथ्वी

2 mins
1.3K


एका महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षक सातवीतल्या मुलांना भूगोल शिकवत असतात. वर्गात जवळपास चाळीस विद्यार्थी असतात.वर्गाचा मॉनिटर सिद्धार्थ असतो. सर्व मुलांना भूगोलाचे सर खूप आवडतात म्हणून मुले त्यांना लक्षपूर्वक ऐकत असतात. सर पृथ्वीविषयी माहिती देतात.ते सांगतात आपली पृथ्वी ही एकाहत्तर टक्के पाण्यानी व्यापलेली आहे. फक्त एकोणतीस टक्के जमीन आहे.. एव्हडे पाणी असूनही पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आहे. कारण जास्तीत जास्त पाणी खारे आहे.जे पिण्यायोग्य नाही. दोन टक्केच पाणी पिण्यायोग्य आहे.समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाऊस पाडण्यात उपयोगी पडते.पाण्याची कमतरता, उष्णता ह्या सर्वांचे कारण मनुष्य आहे. माणूस झाडें तोडून तिथे गृहनिर्माण करतो. कारण लोकसंख्या वाढली, गरजा वाढल्या.

झाडें वातावरणातील कार्बन डाय ऑक्सिड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात.ऑक्सिजन हा प्राणवायू आहे. झाडें कमी झाल्यामुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्सिइड चे प्रमाण वाढले. आणि कार्बन डाय ऑक्सिड जो ग्रीन हाऊस इफेक्ट निर्माण करुन ग्लोबल वॉर्मिंग ची समस्या वाढवतो आहे.


एवढ्यात सिद्धार्थने सरांना विचारलं ."सर ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे ".सर म्हणाले ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात आलेली सूर्याची किरणे वातावरणातच कार्बन डाय ऑक्सिड मुळे राहतात. ती बाहेर निघू शकत नाही. त्यामुळे खूप उष्णतामान वाढले आहे.हे सर्व वृक्ष तोडीमुळे झाले.पावसाचे पाणीही कमी पडते आणि जमिनीखाली पाणी झिरपत नाही.त्यामुळे पिण्याच्या पाण्याची पातळीही कमी झाली आहे. झाडाची मुळे जमिनीला घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे पूर येण्याची शक्यता कमी असते.


लोक गाड्या जास्त वापरतात त्यामुळे हानिकारक घटक हवेत सोडल्या जातात. त्यामुळे वायू प्रदूषण होते. आणि कारखाने, घरातील घाण नदीत सोडल्या जातात. त्यामुळे जलप्रदूषण होते.


जर पृथ्वीला वाचवायचे असेल तर जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने झाडें लावली पाहिजे. वाहनांचा वापर कमी करून पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा कार पूल केले पाहिजे. जल प्रदूषण टाळण्यासाठी घाण नद्यात सोडणे टाळले पाहिजे.


हे सर्व ऐकून मुले म्हणाली आपण प्रत्येक घराघरात जाऊन हा संदेश लोकांपर्यत पोहचवू. व भरपूर झाडेही लावू. सरांना ही कल्पना फार आवडली व आठवड्यातून एक दिवस पूर्ण शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या एरिया मध्ये घराघरात संदेश देऊ लागले. व झाडें लावू लागले.


पृथ्वीचा ह्रास टाळायचा असेल तर हे सर्व करणे आवश्यक आहे हे त्यांना कळले.

"चला सर्व मिळून करूया पन

पृथ्वीचे सर्व मिळून करू या जतन "


स्वाती वक्ते, पुणे


Rate this content
Log in