SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

पृथ्वी, मंगळ आणि कोरोना

पृथ्वी, मंगळ आणि कोरोना

3 mins
209


(ही कथा विज्ञानावर आधिरीत पूर्णपणे काल्पनिक आहे )

खूप वर्षांपूर्वी जवळपास 13.8 अब्ज वर्षांपूर्वी फक्त एक मोठा अब्ज फॅरनहाईट तापमान आणि घनता असलेला गोळा होता. ग्रह, तारे हे काही नव्हते. खुप तापमाना मुळे ह्या गोळयाचा स्फोट झाला आणि त्याचे तुकडे झाले. ते तुकडे कालांतराने थंडे झालेत आणि त्यांचे घन (सॉलीड)स्वरूप झाले. आणि ते सर्व तुकडे मध्ये सूर्य आणि सूर्या भोवती कंकणाकृती आकारात फिरू लागले. सूर्याभोवती आठ ग्रह बुध, शुक्र , पृथ्वी, मंगळ, बृहस्पती शनी, युरेनस, नेपच्युन हे आठ ग्रह फिरू लागले. व त्या ग्रहाभोवती उपग्रह फिरू लागले. त्यापैकी बुध आणि शुक्रला ला उपग्रह नाहीत.... 


पृथ्वीला एक उपग्रह आहे म्हणजे चंद्र आहे .आणि मंगळला दोन उपग्रह आहेत. आणि सर्व ग्रह स्वतः भोवती फिरतात. तर आपण सर्व जीव जन्तु चे अस्तित्व हे पृथ्वी वरच आहे असे मानतो. कारण पृथ्वीवर वातावरण आहे.जसे पाणी, ऑक्सिजन आणि बरेच घटक आहेत त्यामुळे जीव जन्तुला ते पोषक आहे. पण आपल्या पेक्षाही प्रगत जीव हे मंगळावर आहेत. कारण मंगळ पृथ्वीजवळ आहे. त्याचे आणि सूर्याचे अंतर पृथ्वी सूर्यापेक्षा जास्त असल्यामुळे थंड आहे. आणि त्याला दोन उपग्रह म्हणजे चन्द्र आहेत. 


तर मंगळावर जे लोक राहतात ते आपल्यापेक्षा खुप वेगळे आहेत. ते वेगळे दिसतात. त्यांचे शरीर हे आपल्या सारखे हाड मांस ज्या घटकापासून बनलेले आहे त्या घटकापासून बनलेले नाही. त्यांचे रक्तही लाल नाही तर निळे आहे. त्यांचे नाक, डोळे, सर्व अवयव आपल्यापेक्षा वेगळे आहेत. ते श्व्सन साठी कार्बन डाय ऑक्साईड चा उपयोग करतात. कारण मंगळावर कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण जास्त आहे. ते पृथ्वी वरील झाडांप्रमाणे स्वतःचे अन्नही बनवू शकतात. मंगळ ग्रह वर पाणी ही आहे. त्यांच्या कडे जे दोन उपग्रह आहेत त्यातील एक नैसर्गिक उपग्रह ते प्रक्रिया करून संशोधन, कम्युनिकेशन आणि बऱ्याच गोष्टी ज्या आपण कृत्रिम उपग्रह द्वारे करतो ते करतात. तिथे लाल माती आहे. सूर्यापासून अंतर जास्त असल्यामुळे आल्हाददायी वातावरण आहे. त्यांचे खाणे, पिणे हे सर्व काही आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत. मंगळावरील लोक बऱ्याच वेळा पृथ्वी वर तबकडी मध्ये येतात. त्यांना पृथ्वीवर राज्य करायचे आहे. त्यासाठी ते बऱ्याच दिवसापासून योजना करतात. म्हणूनच आपली विमान गायब होतात तेव्हा त्याचा काही थांग पत्ता लागत नाही. तर मंगळावरील लोक ते विमान गायब करून त्यावर संशोधन करतात.


मंगळावरच्या लोकांची संशोधनाची जागा ही अटलांटिक महासागरातील बर्मुडा त्रिकोण ही आहे. तिथे येणारी जहाज मंगळावरील लोक गायब करतात आणि त्यावर म्हणजे त्यामध्ये असलेल्या लोकांवर संशोधन करतात.मंगळावरील लोक पृथ्वीवर अदृश्य स्वरूपही धारण करू शकतात. त्यामुळे त्यांच्या तबकड्या दिसतात पण माणसं दिसत नाही. त्यांना माणसाचे शरीर, त्यावर होणारे परिणाम, त्यांची जीवन पद्धती, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती ह्या सर्व गोष्टी माणसाकडून समजून घेऊन त्यांच्या भाषेत समजून घेतात जसे ते आपल्या पेक्षा बरेच प्रगत असल्यामुळे त्यांना पृथ्वी वरील प्रत्येक प्राण्याच्या, झाडाच्या भाषेचे सुद्धा डिकोडिंग करता येते. आता बऱ्याच वर्षानंतर माणसाच्या शरीराचा अभ्यास करून त्या मंगळावरील लोकांनी पृथ्वीवर कोरोना व्हायरस सोडला असेच काहीतरी वाटते आणि संपूर्ण जगाला हादरून सोडले. त्या मागे त्यांचा उद्देश म्हणजे पृथ्वी वरील सर्वात प्राणी मनुष्याचा नाश करून स्वतः पृथ्वीवर राज्य करायचे. तो व्हायरस इतका खतरनाक आहे की सम्पूर्ण जग थांबून फक्त त्या व्हायरसला नष्ट करण्याचाच विचार करत आहे. मंगळावरील लोकांनी माणसाच्या शरीराचा खुपच अभ्यास करून त्यामधून श्वसन क्रियेवर परिणाम करणारा व्हायरस. जो माणसाकडून माणसामध्ये पसरतो असा निर्माण करून माणसाचे बाहेर वावरणे बंद केले. माणूस अतिशय सामाजिक प्राणी आहे त्याला घरात डांबून ठेवले आहे आणि अजूनही काही केल्या मनुष्य त्यावर मात करू शकत नाही.

 

आता मनुष्य पूर्णपणे त्या व्हायरसवर मात करण्यात गुंतला आहे. म्हणजे हे युद्ध माणसाचे परग्रहावरील लोकांशी आहे. आता युद्धात पृथ्वी वरील लोकांना त्या व्हायरसला पळवून किंवा त्यासोबत जगणे शिकून मात करावी लागेल. आणि विजय मिळवून स्वतःचे अस्तित्व टिकवावे लागेल...


Rate this content
Log in