प्रसुतीबॅग
प्रसुतीबॅग


एक स्त्री🤰 प्रसूती साठी प्रसुती विभागात दाखल झाली...... तिला प्रसूती कळा जोरात येत असल्याने अगदीच धावत पळत तिच्या नातेवाईकांना आणावे लागले.... घरी ऐनवेळी आई हजर नसल्याने तिच्या सोबत कसलेही सामान नव्हते.... सोबत एक स्त्री म्हणून तिची आजी आलेली होती......
तिची लागलीच पाच मिनिटात डिलेव्हरी झाली🤱....... बाळाला हॉस्पिटलच्या स्वच्छ कपड्यात घेण्यात आले...... पण आईची मात्र चांगलीच फजिती झाली..... हॉस्पिटलच्या सामानाव्यतिरिक्त तिला काहीच confertable असे नव्हते... कारण तिच्यासोबत प्रसुतीच्या वेळेस आणि नंतर लागणारे आवश्यक साहित्य नव्हते...... तिला तिचे सामान येईपर्यंत वाट बघावी लागली.....सामान आल्यावर त्यातही तिच्या मनासारखे सामान न आल्याने तिची नुसती चिडचिड होत होती..... हेच तिने आधी एक बॅग तयार करून ठेवली असती तर.... तिला फक्त तिच्या नातेवाईकांना बॅग सोबत घेण्यासाठी सांगता आले असते...... आणि तिला तिचे सामान येण्याची वाट बघावी लागली नसती..... तिला हवे ते योग्य सामान मिळाले असते.....
मग मला वाटले की याही गोष्टींचे प्लँनिंग व्यवस्थित केले तर अशी तिची फजिती झाली नसती..... या साठी खाली 👇तुमच्यासाठी माहिती देत आहे
प्लॅनिंग कशी आणि कधी करायची
1 )आधी प्रसुती बॅग तयार करण्यासाठीचा दिवस ठरवावा लागेल.... साधारण नववा महिना लागला की प्रसूती कळा कधीही सुरु होतात म्हणून आठवा महिना संपत आला की ही तयारी करावी.....
2)तयारी म्हणजे नेमकं काय काय करायचं?
a) एक सुटकेस /बॅग तयार करा 💼.... बॅग मध्ये
आईसाठी लागणारे साहित्य
1) प्रसूतीनंतर लागणारे सॅनिटरी नॅपकि
2)बाळाला पाजता येईल असा.... फीडिंग गाऊन( दोन )
3) फीडिंग ब्रा कमीत कमी दोन
4) अंतर्वस्त्रे कमीत कमी चार
5) स्टेराईल टॉवेल
6) ब्लॅंकेट, चादर
7)ट्रॅव्हल कीट मधील साहित्य जसे की टूथपेस्ट, टूथ ब्रश, अंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण, कंगवा,आरसा, टाल्कम पावडर, रबर बँड, पिना, तेल
7)सॉक्स.... प्रसूती कळांमध्ये कधी कधी तळपाय थंड पडतात त्यासाठी
8) न घसरणारी स्लीपर
बाळासाठी लागणारे साहित्य
1) सुती व स्वच्छ कपडे :टोपी, सुती ड्रेस हातमोजे
2)स्वच्छ लंगोट
3) बेबी डायपर्स
4) वाईप्स
5) बाळासाठी साबण
6) डेटॉल
बॅग व्यतिरिक्त लागणारे साहित्य (optional )
1)छोटी मच्छरदाणी
2)बाळासाठी लागणारी चादर
3) वाटी, चमचा, पाण्याची बॉटल
4)कार सीट हे optional आहे.... काही देशांमध्ये बाळांना घरी नेताना कारसीट मध्ये घरी नेणे बांधील आहे.. आपल्या देशात हे बांधील नाही.... आजकाल मेट्रो शहरात ह्याचा वापर केला जात आहे.
मला वाटतं ही चेकलिस्ट जर तूम्ही तुमच्या जवळ ठेवली तर तुमचा गोंधळ उडणार नाही.... हे विसरलं ते विसरलं असं होणार नाही.....
लेख आवडल्यास like करा, share करायचा असल्यास नावासहित share करा