*प्रगत विद्यार्थी*
*प्रगत विद्यार्थी*
वर्गात जर ५० च्या वर मुले असतील तर,प्रत्येक मुलाकडे शाळेच्या वेळात लक्ष देणे कठीण होते.
त्यासाठी अप्रगत मुलांना प्रगत करायचे म्हटले,किंवा सर्व वर्ग १००% प्रगत करायची म्हटले तर जरा अवघड होते.यासाठी मुलांना शाळेव्यतिरिक्त जादा वेळ द्यावा लागतो.पण मुलांची मानसिकता पण बघायला हवी.
त्यासाठी आपणआपल्याच वर्गातील हुशार,प्रगत मुलांचा इथे उपयोग करून घेवू शकतो.अध्ययन कार्डस,वाचन कार्डस,घडीचित्र,यासारख्या शै.साहित्याचा उपयोग करून प्रगत मुले अप्रगत मुलांचे अध्ययन उत्तम घेवू शकतात.
शिक्षकांचे पण काम जरा हलके होते. शिक्षकांनी मुलांना उत्तम मार्गदर्शन केले तर हा प्रयोग सक्सेस होतो.
यासाठी मात्र शिक्षकांकडे शै. साहित्याचा खजिना भरपूर हवा.
प्रगत मुले हाताशी घेवून बरेचशी कामे हातावेगळी करता येतात.
उदा...निबंध वह्या आणणे,वाटणे,गोळ्या करणे.
परीक्षेच्या वेळी नं. प्रमाणे मुलांना बसवणे.पेपर वाटप करणे.गोळा करणे.इत्यादी....
प्रगत मुलांना मात्र सतत अभ्यासाचे खाद्य पुरवावे लागते.ही मुले हुशार तर असतातच पण चपळ,अस्थिर,आगाऊ आपला अभ्यास लगेच पूर्ण करुन रिकामी होतात.त्यासाठी शिक्षकांना मुलांना सतत नवीन अभ्यास ...द्यावा लागतो.
पण अशी मुले असली की सदैव त्या मुलांची,त्यांना शिकवणार्या शिक्षकाची चर्चा स्टाफरूममधे मात्र अखंड चालू असते.