शब्दसखी सुनिता

Children Stories Inspirational Others

4.4  

शब्दसखी सुनिता

Children Stories Inspirational Others

पिंजरा

पिंजरा

2 mins
377


कोरोना आला नि सगळ जग हतबल झाल. लाॅकडाऊन जाहीर झाला. सगळे घरीच होते. मुलांच्या शाळा बंद झाल्या. घरीच त्यांची ऑनलाईन शाळा सुरू होती. आरव ही घरी राहून खुप कंटाळला होता. आईबाबा घरात काम करत होते. त्याला आजी होती सोबत तरिही त्याला आपल्या मित्रांची आठवण यायची. त्याला ऑफलाईन शाळा नको वाटायला लागली.     


आरव त्याच्या गॅलरीमध्ये उभा असतो. त्याच्या घरी पिंजर्‍यात पोपट आणि लव्हबर्ड्स होते. आरव सगळीकडे नजर जाईल तिथपर्यंत बघत होता. पण कुणीही मुले किंवा माणस त्याला बाहेर दिसत नव्हत. लाॅकडाऊनमुळे सगळे रस्ते सुनसान दिसत होते. आरवच्या अपार्टमेंटसमोर एक मोठ झाड होत. त्यादिवशी त्या झाडावर त्याला खुप वेगवेगळे पक्षी आवाज करताना दिसले. तो त्यांना कुतुहलाने बघत होता. त्यालाही कळल नाही, आज एवढे पक्षी कुठुन आले. थोड्यावेळाने तो आपल्या पिंजर्‍यात ठेवलेल्या पक्ष्यासोबत असच खेळत असतो. तो त्यांना उगाच त्रास देत असतो.


तेवढ्यात त्याला त्याच्या मित्राचा रोहीतचा फोन येतो. तो त्याच्याशी बोलत होता. शाळा आणि मित्रांची खुप आठवण येत असल्याच सांगतो. आरव त्याच्या मित्राला म्हणतो की, "या लाॅकडाऊनमुळे अस वाटत की आपण पिंजर्‍यात आहोत." तेव्हा आरव हळू आवाजात हो म्हणतो. तेवढ्यात त्याचा पोपट त्याला काहीतरी बोलत असतो. तेव्हा आरव रोहीतला बाय म्हणून काॅल ठेवतो.


आरव त्या पोपटाच्या जवळ जातो. तो पोपट त्याच्याशी बोलायला लागतो. तो आरवला म्हणत होता की, "कसं वाटतंय पिंजर्‍यात राहून तुम्हाला आनंद मिळतो का?" जर तुला आनंद नाही मिळत आहे तर तुम्ही लोक आम्हांला अस का कोंडून ठेवता ? असा तो पोपत त्याच्या आवाजात आरवशी बोलत होता. तेव्हा आरवला समजलं की मुक्या पक्ष्यांना बंदिस्त करू नये. त्यांनाही स्वच्छंदी उडू द्यावे. तो त्या पिंजर्‍यात ठेवलेल्या पक्ष्यांना सोडून देतो. त्यालाही छान आणि आनंद वाटला.


ते पक्षी इतक्या दिवस पिंजर्‍यात त्यांना कोंडल्यासारखे झाले होते. पण त्यांना पिंजर्‍यातून मुक्त केल्याने मनसोक्तपणे आकाशात उडत होते.  


Rate this content
Log in