पिझ्झा
पिझ्झा
1 min
146
"आ sss मला पिझ्झा पाहिजे... आत्ताच्या" आत्ता!
असा हट्ट धरून बसलेली मालतीबाईंची नात काही केल्या ऐकेना. बाहेरून घरपोच पिझ्झा आणून देणारे मम्मी पप्पाही समजावून थकले. कारण लॉकडाऊनमुळे सारेच बंद.
मालतीबाईंनी एक छानशी तिखटमीठाची जाड खरपूस पोळी बनवली. त्यावर कोथिंबीर, टोमॅटोचे काप, लोण्याच्या गोळ्याचे छानसे टॉपिंग केले. हा छानसा पिझ्झा पाहताच छोटी नात खुदकन हसली. आता असाच पिझ्झा रोज हवा म्हणून आजीकडे हट्ट करु लागली.
