Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

फक्त प्रेम करा

फक्त प्रेम करा

1 min
155


  सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खा काका, सख्खी काकू, सख्खा मेव्हणा नेमकं काय असतं हे सख्खं प्रकरण. सख्खा म्हणजे आपला, सख्खा म्हणजे सखा म्हणजे जवळचा, जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केव्हाही, काहीही सांगू त्याला आपलं म्हणावं, सख्खं म्हणावं.


      चालू कलियुगात आपण काय करतोय हे सख्या नातेवाईकांच्या कानावरपण पडता नये इतकी खबरदारी घेतली जाते. तिथे सध्या नसतं पक्कं असते. ज्याच्या जवळ आपल्या मनातलं सारे काही सांगू शकतो. मोठयाने हसू शकतो किंवा काळतलं दु:ख सांगून रडूू शकतो, त्याला सख्खं म्हणावं, आपलं म्हणावं ज्याच्याकडे गेल्यावर आपलं मन प्रसन्न होतं ,आपलं मन हलकं होतं आणि तोही आपलं मनापासून स्वागत करतो. 


    आपल्या अडचणींवर तो समाधान करतो, आपल्या हिताच्या गोष्टी सांंगतो. त्याला आपला सखा समजावा. ज्याला न भेटताही आपलं दु:ख त्याला समजते. त्याला आपलं म्हणावं. मी त्याचा आहे, तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात असली पाहिजे. तरच तो आपला व मी त्याचा असे समजावे. ज्याला पाहिल्याावर आपल्या डोळयात पाणी येते  व आपल्या डोळ्यातील पाण्याची किंमत ज्याला कळते त्याला आपलं, सख्खं म्हणावं. 


 तो नि:स्वार्थपणेेे आपल्यावर प्रेम करतो, माया करतो. त्याला सख्खं म्हणावं. असे प्रेम कुठेही, केव्हाही, कधीही चांगले असते. त्याला प्रेम म्हणावं.


Rate this content
Log in