Vasudha Naik

Others

1.6  

Vasudha Naik

Others

फेसबूक अकाउंट हॅकर

फेसबूक अकाउंट हॅकर

2 mins
89


    २ जून ची दुपार वेळ तीनची..माझा मोबाईल वाजला तशी मी नुकतीच दुपारची वामकुक्षीसाठी पहुडले होते.

  फोन घेतला आणि तो एक पत्रकार माझा स्नेही बोलत होता."मॅम तुम्हांला पैशांची गरज आहे का?किती हवेत?" मी ताडकन उठले .त्यांना सांगितले नाही हो.मला गरजच नाही.त्याने सांगितले "फेसबूक मेंसेंजरवरून तुमच्या अकाउंटचा ,तुमच्या फोटोचा वापर करून एकजण पैशांची मागणी करतोय." माझे डोके सुन्न झाले.हा फोन संपेपर्यंत शाळेतील एका बाईंचा मेसेज आला. माजी विद्यार्थी संदीपचा फोन आला.इतरांचे मेसेज वाचेपर्यंत बाकी माझ्या माजी विद्यार्थ्यांचे फोन येवू लागले.त्यातील योगेंद्रने तर त्या फसव्या माणसाला दोन हजार रू.दिले.व त्यांच्या समूहावर एक पोस्ट पण टाकली की "आपल्या नाईक मॅमला पैशांची गरज आहे " मग त्याने मला फोन केला सर्व सांगितले .मी त्याला ताबडतोब ती समूहावरील पोस्ट डिलीट करायला लावली .सांगितले की बाईंना गरज नाही ही बातमी फेक आहे असे सांग .

   हे होईपर्यंत मी फेसबूक,स्टेटस,माझ्या सर्व समूहावर फेसबूक अकाउंट हॅक करून पैशांची मागणी होतेय.कोणीही देवू नयेत हे सांगितले.

   तो पर्यंत माझ्या मुलींनी शोधकार्य सुरू केले कोण आहे हा माणूस?

 तसेच माझा एक विद्यार्थी योगेंद्र जोशी याने त्याने पाठवलेल्या चेकबूकच्या एफएसआय कोडवरून बँक शोधली. माझ्याच एका माजी विद्यार्थ्याला जो पी,एस.आय आहे .सदीप याला फोनवर चौकशी केली पुढे काय करू?तो म्हणाला "मॅम काही करू नका माझेही खाते चार महिन्यापूर्वी असेच हॅक झाले होते.कोणी काही करुशकत नाही.आपोआप थांबेल हे.मी बर म्हटले पण माझा शोध चालू होताच.

   माझा मुलगा आदित्य अमेरिकेला असतो सध्या.त्याला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने त्या फेसबूक अकाउंट हॅकरचा अचूक शोध लावला .त्याला भरपूर मेसेज केले.त्याला पोलीसांची धमकी देवून त्याला चांगलेच सतावले.

   आणि अगदी दोन दिवसाच्याही आत सारे शांत झाले.पण नंतर बँकअकाउंटची भीती वाटायला लागली.मग माझ्या अकाउंटमधील पैसे जरा सूनबाईच्या खात्यात ठेवले.

मनशांती तेवढीच माझी.

   असे हे २ जून ते ६ जून दिवस कठीण,अडचणीत गेले.


Rate this content
Log in